
Sign up to save your podcasts
Or


पुस्तकं वाचायचं वेड. मग जमवायचं. मग विकायचंही वेड! त्यापायी या माणसानं चांगली नोकरी सोडून दिली. आणि मग तर प्रकाशन काढून पुस्तकांच्या निर्मितीत उतरला. कुठून सुचतात असली भाग्यवान खुळं? कशी परवडतात? काय देतात? 'वॉल्डन प्रकाशना'च्या अभिषेक धनगर यांच्याशी याबद्दल गप्पा #पुस्तकगप्पा च्या पंचविसाव्या सत्रात.
सहभाग: अभिषेक धनगर, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य
पुस्तकगप्पा सत्र चोविसावे
या वर्षातल्या पहिल्या #पुस्तकगप्पा सानियाशी. निमित्त आहे ’भास प्रकाशना’तर्फे प्रकाशित होत असलेल्या ’स्थलांतर’ या तिच्या कादंबरीच्या इ-प्रतीचं. मांजरपावलांनी येणार्या आणि त्यांच्या वेगळेपणानं थक्क करून जाणार्या; अनाग्रही, मितभाषी आणि लखलखीत विधान करणार्या तिच्या कथा. तशाच तिच्या कादंबर्याही. त्यातही ’स्थलांतर’ विशेष आवडीची. ती प्रथम प्रकाशित झाल्याला तीस वर्षं उलटून गेली. सानियाचं मनोगत, मेघनाचं आजचं आकलन सांगणारं एक टिपण, आणि तेजस मोडकची काही सुरेख रेखाचित्रं असं घालून तिची इ-प्रत प्रकाशित करतो आहोत. https://www.amazon.com/dp/B0FQ6PS4QK
ऋषिकेश दाभोळकर हा आमचा मित्र ‘कुल्फी’ या मुलांसाठीच्या नियतकालिकाचा आणि ‘अटक मटक’ या वेबसाइटचा संपादक. अलीकडेच त्यानं ‘गोष्टदिंडी’ नावाचा अनोखा उपक्रम पार पाडला. पाठीवर पुस्तकं लादून तो चालत सुटला, वाटेत लागणार्या शाळांमधून मुलांना गोष्टी सांगितल्या आणि त्यांना पुस्तकं दाखवली, त्यांच्याशी गप्पा मारल्या. या उपक्रमामधले त्याचे अनुभव अद्भुत आणि उद्बोधक दोन्ही होते. त्यांबद्दल त्याच्याशी गप्पा.
आपण गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे, भूषण कोलते आणि श्रीपाद चौधरी पपायरस या प्रकाशन संस्थेचे संस्थापक आहेत. ते पुस्तकांचं दुकानही चालवतात. पपायरसच्या पुस्तकांची निर्मितिमूल्यंही फारच वाखाणण्यासारखी असतात. खेरीज - त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीबद्दल, कागद - रंग - टंक - बांधणी - टिकाऊपणा… याबद्दल त्यांचा स्वतःचा पुष्कळ विचार आणि ठाम मतं आहेत. मेघना आणि जितेन यांनी भूषण आणि श्रीपाद यांच्याशी त्याबद्दल केलेल्या गप्पा.
सहभाग: भूषण कोलते, श्रीपाद चौधरी, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य
पुस्तकगप्पा लिंक्स: पॉडकास्ट युट्युब ब्लॉग फेसबुक
भूषण कोलते आणि श्रीपाद चौधरी पपायरस या प्रकाशन संस्थेचे संस्थापक आहेत. ते पुस्तकांचं दुकानही चालवतात. पपायरसच्या पुस्तकांची निर्मितिमूल्यंही फारच वाखाणण्यासारखी असतात. मेघना आणि जितेन यांनी भूषण आणि श्रीपाद यांच्याशी पुस्तकांचं संपादन, प्रकाशन, वितरण आणि एकंदरच पुस्तक व्यवहार याबद्दल केलेल्या गप्पा.
सहभाग: भूषण कोलते, श्रीपाद चौधरी, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य
पुस्तकगप्पा लिंक्स: पॉडकास्ट युट्युब ब्लॉग फेसबुक
पेगी मोहन यांचं 'वाँडरर्ज, किंग्ज, ॲंड मर्चंट्स - दी स्टोरी ऑफ इंडिया थ्रू इट्स लँग्वेजेस' हे अलीकडच्या काळातलं एक महत्त्वाचं पुस्तक. भाषाविज्ञान आणि सामाजिक-सांस्कृतिक इतिहास यांचा मिलाफ साधत भारतीय भाषांचा इतिहास उलगडत नेणारं हे पुस्तक जितकं संशोधकीय शिस्तीतलं आहे, तितकंच ते एखाद्या रहस्यकथेसारखं उत्कंठावर्धक आहे. खास भारतीय पद्धतीनं भाषांची वैशिष्ट्यं उलगडणारं आहे, आणि भारताच्या वैविध्यपूर्ण इतिहासाची ग्वाही देणारंही आहे. त्याचं भाषांतर मनोविकास प्रकाशानातर्फे प्रकाशित होतंय. त्याबद्दल भाषावैज्ञानिक चिन्मय धारूरकर यांच्याशी जितेंद्र वैद्य आणि मेघना भुस्कुटे यांनी केलेल्या गप्पा.
आपल्यापर्यंत पोचणार्या रामायण-महाभारत या महाकाव्यांविषयी 'पुस्तकगप्पा'चा हा कार्यक्रम. संस्कृत भाषा, दक्षिण आशियायी धर्म आणि इतिहास या विषयांचा अभ्यासक हेमंत राजोपाध्ये आणि महाभारत-रामायण या दोन्ही महाकाव्यांशी संबंधित पुस्तकांच्या वाचक म्हणून मेघना भुस्कुटे आणि नर्मदा खरे हे या गप्पांमध्ये सामील झाले.
सहभाग : हेमंत राजोपाध्ये, नर्मदा खरे, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.
हृषीकेश गुप्ते हे सध्याचे आघाडीचे भयकथालेखक. खरंतर असं लेबल लावणं त्यांना अन्यायकारकच ठरेल. त्यांच्या गूढकथा, भयकथा, रहस्यकथा... बघता बघता नकळत मानसशास्त्रीय गुंत्यात वा अद्भुताच्या प्रांतात कधी खेचून नेतात कळत नाही.
चिन्मय दामले यांच्याशी मराठी पाकपुस्तकांबद्दल गप्पा. मराठी पाकपुस्तकांचा आर्थिक, राजकीय, सामाजिक इतिहास अतिशय मजेशीर आणि उद्बोधक आहे. त्याबद्दल आणि तिथून आजवर झालेल्या पाकपुस्तकांच्या प्रवासाबद्दल चिन्मय दामले यांच्याशी मारलेल्या गप्पा.
सहभाग : चिन्मय दामले, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.
गौरी देशपांडे यांच्या मराठी साहित्यातल्या विशेष श्रेयाविषयी, लोकप्रियतेविषयी, मर्यादांविषयी, तत्कालीन सामाजिक पार्श्वभूमीविषयी गप्पा.
सहभाग : माया पंडित, जितेंद्र वैद्य, मेघना भुस्कुटे, नंदन होडावडेकर, रंजना निकते.
From the publisher's feed