Sign up to save your podcasts
Or
सोमवार 26 ऑगस्ट, 2024 रोजी संपूर्ण कोकणात जोरदार वाऱ्यासह पाऊस सरू होता, तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणइथल्या राजकोट किल्ल्यावर उभा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.
या 28 फूट उंच पुतळ्याचं अवघ्या 9 महिन्यांपूर्वी, म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालं होतं. त्यामुळे त्यावरून राग आणि संताप राज्यभरात व्यक्त करण्यात आला.
पुतळा बांधतांना निकष पाळले गेले नाही, भ्रष्टाचार झाला, असे आरोप विरोधी पक्षांनी केले, तर सत्ताधाऱ्यांना यासाठी माफी मागावी लागली.
बांगलादेशातल्या कोटाविरोधी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं, पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावं लागलं, आणि त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या पुतळ्याची अशीच नासधूस करण्यात आली.
पण पुतळेच का? कुठल्याही संस्कृतीत हे निर्जीव, मुके पुतळे इतके महत्त्वाचे का असतात? एखाद्या ठिकाणी पुतळा का उभारला जातो? किंवा कुठल्याही आंदोलनादरम्यान, क्रांतीदरम्यान पुतळे का पाडले जातात?
आज गोष्ट दुनियेची ऐकताना याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
4.2
55 ratings

110,824 Listeners
44 Listeners
0 Listeners
2 Listeners
1 Listeners
9 Listeners