"राज"कारण " Rajkaran

"राज"कारण " Rajkaran

Download on the App Store

All "राज"कारण " Rajkaran episodes

  • RAJ'KARAN PODCAST : अंधारात आमदाराची निर्घृण हत्या; अंत्ययात्रेत बाळासाहेबांचं नाव अन् पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पहिला आमदार!

    ५ जून १९७० ची रात्र... अंधारात परळचे आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप झाले; मात्र त्यांचा सहभाग न्यायालयात सिद्ध झाला नाही. अंत्ययात्रेतील आरोप, गिरणगावातील कम्युनिस्ट विरुद्ध शिवसेना संघर्ष आणि त्यानंतर झालेली परळची पोटनिवडणूक यामुळे मुंबईचं राजकारण ढवळून निघालं. कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजिनी देसाई यांना १३ पक्षांचा पाठिंबा असूनही शिवसेनेचे वामनराव महाडिक विजयी झाले. शिवसेनेला पहिला आमदार मिळवून देणाऱ्या या रक्तरंजित राजकीय संघर्षाचा इतिहास जाणून घ्या सरकारनामाच्या 'राजकारण' या ऑडिओ पॉडकास्टमध्ये.


    KEYWORDS : Krishna Desai, Vamanrao Mahadik, Balasaheb Thackeray, Shiv Sena History, Mumbai Politics, Parel By Election 1970, Communist Movement, Lalbaug Parel, Maharashtra Political History, Krishna Desai Murder Case

    11 min
  • RAJ'KARAN PODCAST : एका नगरसेविकेला हरवण्यासाठी थेट इंदिरा गांधींना सभा घ्यावी लागली

    एका नगरसेविकेला पराभूत करण्यासाठी थेट देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रचारसभेसाठी यावं लागलं होतं! १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत मृणालताई गोरे यांनी इंदिरा गांधींच्या लाटेलाही आव्हान देत विजय मिळवला. पाण्याच्या प्रश्नावरून 'पाणीवाली बाई' म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या मृणालताईंनी महिलांच्या हक्कांसाठी, महागाईविरोधात आणि भ्रष्टाचाराविरोधात आयुष्यभर संघर्ष केला. हातात लाटणं घेऊन हजारो महिलांचा मोर्चा काढणं असो किंवा आणीबाणीत सहा महिने पोलिसांना गुंगारा देणं, त्यांचा प्रत्येक लढा प्रेरणादायी होता. मंत्रिपदाची ऑफर नाकारणाऱ्या या लढवय्या नेत्या नेमक्या कशा घडल्या? जाणून घ्या सरकारनामाच्या 'राजकारण' या ऑडिओ पॉडकास्टमध्ये.


    KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Mrinal Gore, Paniwali Bai, Indira Gandhi, Maharashtra Politics, Mrinal Gore Biography, 1972 Assembly Election, Lathane Morcha, Women Empowerment, Socialist Leader, Mumbai Political History

    11 min
  • RAJ'KARAN PODCAST : दोनवेळा थोडक्यात बचावले... अखेर हिकमत उढाण यांनी टोपे घराण्याचा बदला घेतलाच!

    जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघात टोपे आणि उढाण घराण्यांमधील राजकीय संघर्ष तब्बल पाच दशकांहून अधिक काळ सुरू होता. अंकुशराव टोपे आणि अण्णासाहेब उढाण यांच्यात सुरू झालेला हा राजकीय संघर्ष पुढे राजेश टोपे आणि हिकमत उढाण यांच्यापर्यंत पोहोचला. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयाने हुलकावणी दिल्यानंतर हिकमत उढाण यांनी २०२४ मध्ये अखेर बाजी मारली. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा पराभव करत त्यांनी टोपे घराण्याची २५ वर्षांची सत्ता संपवली. दोनवेळा थोडक्यात हुकलेला विजय अखेर मिळवत हिकमत उढाण यांनी जुन्या राजकीय संघर्षाचा हिशेब चुकता केला का? जाणून घ्या या पॉडकास्टमध्ये.


    KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Hikmat Udhan, Rajesh Tope, Ghansawangi Election, Maharashtra Politics, Jalna Politics, Ankushrao Tope, Annasaheb Udhan, Maharashtra Assembly Election 2024, Political Rivalry, Tope Udhan Political Conflict

    11 min
  • RAJ'KARAN PODCAST : यशवंतराव चव्हाणांचं हेलिकॉप्टर हवेतच अडवलं; पण दादा जाधवरावांच्या एका शब्दावर शांत झाला हजारोंचा जमाव

    महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्याची ताकद आमदारांची संख्या, संपत्ती किंवा पक्षाच्या बळावर ठरते. पण पुरंदरचे माजी आमदार दादा जाधवराव यांची ताकद वेगळीच होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट यशवंतराव चव्हाण यांचं हेलिकॉप्टर उतरू दिलं नव्हतं. मात्र, दादांनी केवळ एक आवाहन केलं आणि जमाव शांत झाला, असा हा चर्चेतील किस्सा! अवघ्या १६ हजार रुपयांच्या वर्गणीत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या दादांनी स्थानिक पातळीवर जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाच्या जोरावर आपलं स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केलं. नेत्याचं खरं सामर्थ्य नेमकं कशात असतं? दादा जाधवराव यांच्या राजकीय प्रवासातून जाणून घेऊया.


    KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Dada Jadhavrao, Yashwantrao Chavan, Purandar Politics, Maharashtra Politics, Political History, Maharashtra Political Leaders, Congress Politics, Political Podcast, Grassroots Leadership, Sarkarnama Podcast

    8 min
  • RAJ'KARAN PODCAST : नेहरुंच्या आदेशावर रफिक झकेरिया मराठवाड्यात गेले अन् औरंगाबाद खेड्याला शहर बनवलं...

    पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आग्रहावरून मराठवाड्यात आलेल्या डॉ. रफिक झकेरिया यांनी औरंगाबादच्या विकासाला नवी दिशा दिली. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे नेते गोविंदभाई श्रॉफ यांच्याविरोधात निवडणूक लढवून त्यांनी विजय मिळवला. पुढे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यापासून औद्योगिक विकासापर्यंत अनेक महत्त्वाच्या उपक्रमांना चालना दिली. पडझड झालेल्या ऐतिहासिक परिसरात शिक्षणाची संधी निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं आणि मौलाना आझाद एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक संकुल उभारलं. लंडनमधील उच्च शिक्षण, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील भारताची बाजू आणि धर्मनिरपेक्ष विचारांची बांधिलकी अशा अनेक पैलूंनी समृद्ध असलेला हा प्रवास जाणून घ्या. आधुनिक औरंगाबादच्या जडणघडणीत डॉ. रफिक झकेरिया यांचं योगदान नेमकं काय होतं, याचा वेध घेणारा हा विशेष ऑडिओ पॉडकास्ट!


    KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Rafiq Zakaria, Jawaharlal Nehru, Aurangabad History, Marathwada Politics, Modern Aurangabad, Maulana Azad Educational Trust, Maharashtra Politics, Indian Secularism, CIDCO Aurangabad, Political History

    10 min
  • RAJ'KARAN PODCAST : थेट अंबानींच्या प्रकल्पाला भिडले... एन. डी. पाटलांनी रायगडच्या शेतकऱ्यांसाठी असा लढा उभा केला की रिलायन्सलाही माघार घ्यावी लागली!

    एन. डी. पाटील म्हणजे सत्तेच्या खुर्चीपेक्षा शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा लढवय्या नेता. रायगडमधील SEZ प्रकल्पासाठी हजारो एकर शेतजमीन जाण्याचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा एन. डी. पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत आंदोलनाची धुरा हाती घेतली. कायदेशीर अभ्यास, मोर्चे, सभा आणि सातत्यपूर्ण संघर्षाच्या माध्यमातून त्यांनी हा लढा उभा केला. या आंदोलनामुळे सरकार आणि रिलायन्सला प्रकल्पातून माघार घ्यावी लागल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या स्रोतांनी नमूद केले आहे. या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया एन. डी. पाटील यांच्या संघर्षाची ही धगधगती कहाणी आणि त्यांच्या साध्या पण असामान्य जीवनातील काही किस्से.

    9 min
  • RAJ'KARAN PODCAST : विधानसभेच्या अध्यक्षांवरच पेपरवेट फेकला... आणि त्यानंतर विधानसभेच्या टेबलवरून पेपरवेटच गायब झाले!

    विधानसभेच्या अध्यक्षांवर पेपरवेट फेकणारा आमदार, तुरुंगातून निवडणूक जिंकणारा नेता, काँग्रेसच्या दिग्गज मंत्र्यांना थेट आव्हान देणारा राजकारणी आणि स्वतंत्र विदर्भासाठी आयुष्यभर लढणारा ‘विदर्भाचा शेर’ म्हणजे जांबुवंतराव धोटे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक धक्कादायक आणि रंजक किस्से घडले. 1964 मध्ये विधानसभेच्या अध्यक्षांवर पेपरवेट फेकल्यानंतर त्यांचं सदस्यत्व रद्द झालं; मात्र तुरुंगात असतानाही जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिलं. बाळासाहेब ठाकरे आणि नामदेव ढसाळ यांच्यासोबतचं त्यांचं राजकीय नातंही विशेष चर्चेत राहिलं. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा त्यांनी अखेरपर्यंत लावून धरला. त्यांच्या बंडखोर राजकारणाची, संघर्षाची आणि राजकीय प्रवासाची ही कहाणी.



    KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Jambuwantrao Dhote, Jambuwantrao Dhote History, Vidarbha Politics, Vidarbha Tiger, Maharashtra Politics, Jambuwantrao Dhote Biography, Maharashtra Political History, Balasaheb Thackeray, Forward Bloc, Separate Vidarbha

    9 min
  • Sakal Chya Batmya | महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय ते इराणचे चलन निचांकी पातळीवर

    १ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

    २ राज्यातील व्याघ्र प्रकल्पांचे गाभा क्षेत्र उद्यापासून उघडणार

    ३ रब्बी ज्वारीच्या मिनीकिट्स उपलब्ध करा; कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांचे केंद्राला पत्र

    ४ शेअर बाजारात ४ दिवस घसरण, लाखो कोटींचं नुकसान

    ५ इराणचे चलनमूल्य नीचांकी पातळीवर

    ६ भारताला पाचवं सुवर्ण, नीरुची एकटीची दोन गोल्ड

    ७ चित्रपट निर्मात्यांसह दिग्गज सेलिब्रिटी प्राप्तिकरच्या रडारवर


    स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव



    More podcasts: https://www.esakal.com/podcast


    Podcast Hashtags: #SakalPodcast #MaharashtraCabinet #Agniveer #FodderPolicy #TigerReserve #RabiSorghum #ShareMarket #Iran #AsianGames #IncomeTax #FilmProducers


    Podcast Tags: Sakal Podcast, Sakalchya Batmya, Maharashtra Cabinet, Agniveer, Fodder Development Policy, Tiger Reserve, Rabi Sorghum, Share Market, Iran Currency, Asian Games, Neeru Dhanda, Income Tax, Vashu Bhagnani, Kumar Mangat Pathak

    8 min
  • RAJ'KARAN PODCAST : श्रीधर नाईकांच्या हत्येने कोकण हादरलं; राणेंवर आरोप, कोर्टात खटला अन् निकालाने बदललं राजकारण!

    कोकणच्या राजकारणात एकेकाळी तरुण नेतृत्वाचा आक्रमक चेहरा म्हणून श्रीधर नाईक यांची ओळख होती. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्गात संघटन उभं केलं आणि अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेने काँग्रेसला धक्का बसला आणि त्याच काळात नारायण राणे विजयी झाले. त्यानंतर 1991 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी श्रीधर नाईकांकडे आली आणि काँग्रेसचा मोठा विजय झाला. मात्र काही महिन्यांतच कणकवली बाजारपेठेत त्यांची हत्या झाली. या प्रकरणात 13 जणांवर आरोप झाले, त्यात नारायण राणेंचाही समावेश होता. 1997 मध्ये राणेंसह नऊ जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली. या हत्याकांडानंतर कोकणातील राजकीय संघर्षाला वेगळं वळण मिळालं.


    KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Shridhar Naik, Narayan Rane, Konkan Politics, Sindhudurg Politics, Shridhar Naik Murder, Maharashtra Politics, Youth Congress, Kankavli Murder Case, Political History Maharashtra, Konkan Political Rivalry

    11 min
  • RAJ'KARAN PODCAST : कट्टर विरोधक ते काँग्रेसचा मंत्री : यशवंतराव मोहितेंच्या ‘त्या’ एका सहीमागची भन्नाट राजकीय कहाणी

    काँग्रेसच्या धोरणांना विरोध करत शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे यशवंतराव मोहिते पुढे काँग्रेसमध्ये कसे आले? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या मोहितेंना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी काय भूमिका बजावली? एप्रिल 1960 मध्ये मजदूर किसान पक्ष विसर्जित केल्यानंतर मोहिते थेट काँग्रेसमध्ये येतील, अशी अपेक्षा होती. पण त्यांचा प्रवेश वेगळ्याच पद्धतीने झाला. कोयना धरणाच्या पाहणीसाठी आलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी थेट विचारलं, ‘काँग्रेसचे सभासद कधी होणार?’ आणि त्यानंतर काही क्षणांतच मोहितेंनी काँग्रेस सदस्यत्वावर सही केली. या पॉडकास्टमध्ये जाणून घ्या मोहितेंच्या काँग्रेस प्रवेशाची संपूर्ण राजकीय कहाणी.



    KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Yashwantrao Mohite, Yashwantrao Mohite Congress Entry, Yashwantrao Chavan, Jawaharlal Nehru, Congress Maharashtra Politics, Shetkari Kamgar Paksha, Samyukta Maharashtra Movement, Maharashtra Politics History, Yashwantrao Mohite Biography, Maharashtra Congress History

    9 min