
Sign up to save your podcasts
Or


पेरियार ई. व्ही. रामास्वामी यांच्या मुशीत वाढलेल्या एम. करुणानिधी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री असताना अनेक सुधारणावादी निर्णय घेतले.
अय्यूब कादरी
सभागृहात सत्ताधाऱ्यांकडून अपमान झाल्यानंतर जयललिता यांनी मुख्यमंत्री झाल्याशिवाय विधानसभेत पाऊल ठेवणार नाही, अशी शपथ घेतली होती.
अय्यूब कादरी
तेलुगु चित्रपटांतील एन. टी. रामाराव यांच्या देव-देवतांच्या भूमिका घराघरांत पोहोचल्या होत्या. राजकारणातही लोकांनी त्यांना खूप प्रेम दिलं. एका चुकीमुळं जावयानं त्यांच्याविरोधात बंड केलं आणि त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं.
अय्यूब कादरी
राजपूत जमीनदार कुटुंबात जन्मलेले, मांडा संस्थानचे राजा व्ही. पी. सिंह यांनी पंतप्रधान असताना मंडल आयोगाची अंमलबजावणीची केली. त्यामुळं त्यांना प्रस्थापित समाजांचा रोष सहन करावा लागला होता.
ज्योती बसू यांच्याकडे 1996 मध्ये पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली होती. मात्र पक्षाच्या भूमिकेमुळं ती संधी हुकली होती.
संसदीय लोकशाही आणि पक्षीय राजकारण, यात निष्ठा कुठे ठेवायची, हे सोमनाथ चटर्जी यांनी लोकसभेचे अध्यक्ष असताना दाखवून दिलं.
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी स्वातंत्र्यलढ्यात आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून महत्वाची भूमिका निभावली.
उत्तर प्रदेशात हिंदुत्व रुजवण्यात माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचा मोठा वाटा होता.
उत्तर प्रदेशासह देशाच्या राजकारणात मुलायमसिंह यादव यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
शीला दीक्षित यांनी 15 वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात दिल्लीकरांचं जगणं सुकर केलं.
From the publisher's feed