
Sign up to save your podcasts
Or


१९९६ मध्ये भूतपूर्व केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांच्या घरावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला आणि त्यांच्याकडे साडेतीन कोटीहून अधिक रोकड सापडल्याचा दावा त्यांनी केला. खासगी कंपन्यांना टेलिकॉम क्षेत्रातील कंत्राट देण्याच्या व्यवहारात माया जमवल्याचा सुखराम यांच्यावर आरोप ठेवला गेला. हे प्रकरण टेलिकॉम घोटाळा म्हणून बरंच गाजलं.काँग्रेसचे नरसिंह राव हे पंतप्रधान असताना यांच्या सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री सुखराम हेदूरसंचार खात्याचा पदभार सांभाळत होते. या पदावर असताना १३ मे, १९९४ रोजी टेलिकॉम क्षेत्र खासगी कंपन्यांना खुलं करण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार खासगी कंपन्यांना कंत्राट दिली जाऊ लागली. मात्र ही कंत्राट देण्याच्या बदल्यात कमिशन घेतल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. १९९६ मध्ये नरसिंह राव यांचे सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर सीबीआयने १९९६ मध्ये सुखराम यांच्या घरावर छापा मारला असता, त्यांच्या घरात तब्बल साडेतीन कोटी रुपयांहून अधिकरोकड सापडली. हे पैसे घरातील मोठमोठ्या बॅगांमध्ये खटला भरून ठेवल्याचं सीबीआयला आढळलं. अशा रीतीने मुद्देमालासह पकडले गेल्यानंतर त्यांच्यावर ख चालवला गेला व त्यांना दोषी ठरवण्यात आले. ३ • वर्षांचा तुरुंगवास व २ लाख रुपये दंड अशी शिक्षा त्यांना फर्मावली गेली.
Informative session about the important personality. Sachin Ramesh Tendulkar AO BR is an Indian former international cricketer who captained the Indian national team. He is regarded as one of the greatest batsmen in the history of cricket. Tendulkar took up cricket at the age of eleven, made his Test match debut on 15 November 1989 against Pakistan in Karachi at the age of sixteen, and went on to represent Mumbai domestically and India internationally for close to twenty-four years. In 2002, halfway through his career, Wisden ranked him the second-greatest Test batsman of all time, behind Don Bradman, and the second-greatest ODI batsman of all time, behind Viv Richards. Later in his career, Tendulkar was part of the Indian team that won the 2011 Cricket World Cup, his first win in six World Cup appearances for India. He had previously been named "Player of the Tournament" at the 2003 edition of the tournament. Tendulkar received the Arjuna Award in 1994 for his outstanding sporting achievements, the Khel Ratna Award, India's highest sporting honour, in 1997, and the Padma Shri and Padma Vibhushan awards in 1999 and 2008, respectively, two of India's highest civilian awards.A few hours after the end of his last match in November 2013, the Prime Minister's Office announced the decision to award him the Bharat Ratna, India's highest civilian award. As of 2021, he is the youngest recipient to date and was the first sportsperson to receive the award. In 2012, Tendulkar was nominated to the Rajya Sabha, the upper house of the Parliament of India. In 2010, Time magazine included Tendulkar in its annual Time 100 list as one of the most influential people in the world.
List of important events from history on 24th April. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
एप्रिल-मे १९९६ मध्ये अकराव्या लोकसभेसाठी निवडणूक झाली, पण या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याच पक्षाला व निवडणूकपूर्व स्थापन झालेल्या आघाडीला निश्चित कौल न दिल्याने कोणताच पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कमालीचं राजकीय अस्थैर्य निर्माण होऊन मे १९९६ ते डिसेंबर १९९७ च्या अवघ्या दीड वर्षांच्या कालखंडात देशाने तीन पंतप्रधानांची अल्पस्वल्प कारकीर्द अनुभवली. या तीन पंतप्रधानांमध्ये भाजपचे अटलबिहारी वाजपेयी (१३ दिवस), जनता दलाचे एच.डी. देवेगौडा (१० महिने) आणि इंद्रकुमार गुजराल (११ महिने) याचा समावेश होता.या काळात कोणतंच सरकार न टिकल्याने डिसेंबर १९९७ मध्ये अकरावी लोकसभा विसर्जित करण्यात आली; मार्च १९९८ पर्यंत गुजराल यांनी काळजीवाहू सरकार म्हणून कार्य केलं. फेब्रुवारी-मार्च १९९८ मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या, तरी राजकीय अस्थैर्य संपुष्टात आलं नाही. कारण या निवडणुकीतही 'फ्रॅक्चर्ड मँडेट' मिळालं. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार सत्तेवर येऊन अटलबिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले, तरी त्यांचंही सरकार केवळ तेराच महिन्यांत, म्हणजे एप्रिल १९९९ मध्ये कोसळलं आणि देशाला पुन्हा १९९९ मध्ये निवडणुकींना सामोरं जावं लागलं. (अधिक तपशील 'भाजपचे अटलबिहारी वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान १९९८ या लेखात.)
Informative session about the important personality. William Shakespeare was an English playwright, poet and actor. He is widely regarded as the greatest writer in the English language and the world's greatest dramatist. He is often called England's national poet and the "Bard of Avon". His extant works, including collaborations, consist of some 39 plays, 154 sonnets, three long narrative poems, and a few other verses, some of uncertain authorship. His plays have been translated into every major living language and are performed more often than those of any other playwright. His works continue to be studied and reinterpreted. Shakespeare was born and raised in Stratford-upon-Avon, Warwickshire. At the age of 18, he married Anne Hathaway, with whom he had three children: Susanna and twins Hamnet and Judith. Sometime between 1585 and 1592, he began a successful career in London as an actor, writer, and part-owner of a playing company called the Lord Chamberlain's Men, later known as the King's Men. At age 49 (around 1613), he appears to have retired to Stratford, where he died three years later. Few records of Shakespeare's private life survive; this has stimulated considerable speculation about such matters as his physical appearance, his sexuality, his religious beliefs and whether the works attributed to him were written by others.
List of important events from history on 23th April. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
Informative session about the important personality. Ashok Ramchandra Kelkar was a linguist and critical Marathi writer from Maharashtra, India. He was honoured with the Padma Shri in 2002 and Sahitya Akademi Award for Marathi in 2010. Kelkar was born on 22 April 1929 in Pune. He did his schooling from New English School and then from Ferguson College. As he was fond of grammar and had interest in linguistic puzzles, he graduated from Ferguson in English and Philosophy. He received a master's degree in English and French literature from Pune University. He also studied Linguistics (1956–58) from Rockfeller and Comparative Literature and Review from Lily Institute in 1958 and received scholarships there. In the period of 1958–62, he served the Agra University teaching Linguistics. During 1962–67, he served as a reader at Pune University, and during the next 22 years, he served as professor of Linguistics and later as director of the Centre of Advanced Studies and Linguistics at Deccan College in Pune. He also had a PhD in Linguistics and Anthropology from Cornell University in the USA. He used to guide the students of linguistics completing their M.Phil. and PhD He took retirement from academics in 1989.
List of important events from history on 22th April. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
‘एन्रॉन कॉर्पोरेशन' या बहुराष्ट्रीय कंपनीच्या मालकीच्या दाभोळ पॉवर कंपनीच्या महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यामधील गुहागर तालुक्यातील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाला त्याच्या उभारणीपासूनच म्हणजे १९९३पासून विरोध होत होता; पुढील तीन वर्षांत या प्रकल्पाविरोधातील आंदोलन अधिकाधिक व्यापक होत गेलं आणि २७ एप्रिल, १९९६ रोजी देशभरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी सत्याग्रही इशारा परिषदेसाठी इथे जमल्यावर गुहागरला रणभूमीचं स्वरूप प्राप्त होऊन या आंदोलनाची धार तीव्र झाली.हे आंदोलन पुढे ३० जानेवारी, १९९७ रोजी प्रकल्पस्थळी झालेल्या सत्याग्रहानंतर अधिक प्रखर होत जाऊन सरकार अधिकाधिक कोंडीत पकडलं गेलं व पुढे एन्रॉन कंपनीला इथून काढता पाय घ्यावा लागला. या आंदोलनाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली व त्यातून या लढ्याला अनेक पैलू प्राप्त झाले. त्याचप्रमाणे उदारीकरणाचं नवं आर्थिक धोरण स्वीकारल्यावर एका बाजूला प्रकल्पग्रस्त जनता व अशा प्रकल्पांद्वारे विकास साधण्याच्या नीतीला मुळातच विरोध करणाऱ्या संघटना, असे देशभर दोन तट पडणार असल्याचे संकेत या आंदोलनामुळे मिळाले.
पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील काही गावांच्या शेतांमध्ये विमानातून मोठ्या प्रमाणात आधुनिक प्रकारची शस्त्रास्त्रं टाकण्याची घटना १९ डिसेंबर १९९५ मध्ये घडली. गावातील शेतामध्ये पडलेली ही आधुनिक शस्त्रास्त्रे पाहून पुरुलिया जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. ही शस्त्रं कुणी, कशासाठी आणि कुणासाठी टाकली, याचा बराच शोध घेतला गेला, मात्र अखेरपर्यंत त्याचा शोध लागला नाही • आणि अनाकलनीय गूढ आणि वैचित्र्यपूर्ण अशी ही घटना ठरली.१९ डिसेंबरच्या आधी ‘अॅटनोव्ह एएन-२६’ प्रकारचं लॅटव्हीयन विमान भारतीय हद्दीत घुसलं आणि या विमानातून शेतांमध्ये शस्त्रं टाकली गेली. भारतीय हवाई हद्दीत परदेशी विमान येतं, शस्त्रास्त्रं टाकून जातं आणि त्याचा कुणाला पत्ताही लागत नाही, असा प्रकार घडल्याने भारताच्या संरक्षण सिद्धतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यामुळेच या प्रकरणाचा कसोशीने शोध घेतला गेला. सुरुवातीला ही शस्त्रं पश्चिम बंगालमधील नक्षलवाद्यांसाठी टाकण्यात आली असावीत, असा संशय व्यक्त करण्यात आला. ईशान्य भारतातील दहशतवादी संघटनांसाठी ही शस्त्रास्त्रं बांगलादेशातून आली असावीत, असंही म्हटलं गेलं. या प्रकरणाची चौकशी आणि तपास सी.बी.आय. कडे सोपवण्यात आल्यानंतर ही शस्त्रास्त्रं 'आनंद मार्गी' या बंगालमधील हिंदू संघटनेसाठी टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. मात्र या संघटनेला ही शस्त्रास्त्रं कोणी आणि कशासाठी पाठवली याचा पत्ता सीबीआयला सुद्धा लागला नाही.
From the publisher's feed

11 Listeners