
Sign up to save your podcasts
Or


List of important events from history on 19th March. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
१९९१ मध्ये आंध्र प्रदेशातील नालगोडा जिल्ह्यातील लंगापूर इथे युरेनियमचे मोठे साठे सापडले आणि युरेनियम कॉर्पोरेशनच्या अणुऊर्जा विकासाच्या कार्यक्रमाला अधिक चालना मिळाली. नव्वदच्या दशकात अणुऊर्जेला आवश्यक खनिजांचे साठे इतरत्रही सापडले, खाणीचे कार्य सुरू झालं व तांत्रिक प्रगतीही साध्य झाली. खालील घटनांमुळे या क्षेत्रातील विकास उत्तरोत्तर साध्य झाला:
■ १९९१ : लंबापूर इथे युरेनियमचे मोठे साठे मिळाल्यावर अॅटोमिक मिनरल्स डिव्हिजनने कुनकुरी येथील श्री कॉन्सन्ट्रेट अपग्रेडेशन प्लान्टमध्ये अपग्रेडेड झीनोटाइम कॉन्सन्ट्रेट बनवलं,
■ १९९२ : दूरवर्ती नियंत्रणाने काम करणारा पहिला रेडिओग्राफी कॅमेरा वापरण्यास सुरुवात झाली. आंध्र प्रदेशाच्या पूर्व किनाऱ्यावर जड खनिजांचे मोठे साठे सापडले.
Informative session about the important personality. Rudolf Christian Karl Diesel (18 March 1858 – 29 September 1913) was a German inventor and mechanical engineer who is famous for having invented the Diesel engine.
List of important events from history on 18th March. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
जून १९९१ मध्ये शासनाने केलेल्या पाहणीत भारतात एकूण १०२२ व्यक्तींना एड्स झाल्याचं सिद्ध झालं आणि ५,१३० व्यक्ती एचआयव्हीबाधित झाल्या असल्याचं आढळलं. याच काळात शासन आणि स्वयंसंस्था सावध झाल्या आणि एड्ससंबंधित प्रबोधनकारी कार्यक्रमांना चालना दिली गेली.
एड्स हा दक्षिण आफ्रिकेपुरताच सीमित असावा अशी ऐंशीच्या दशकात धारणा होती. पण १९८६ मध्ये चेन्नईमधील लालबत्ती भागातल्या महिलेला एड्सचा संसर्ग झाल्याचं सर्वप्रथम आढळलं. त्यानंतर भारताच्या विविध भागांत आणखी काही रुग्ण असू शकतात, हे लक्षात आल्यावर १९९० पासून केंद्र सरकारने एड्स संदर्भातला राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला. दूरदर्शनवरूनही प्रचाराचे कार्यक्रम सुरू केले गेले. भारत सरकारचं आरोग्य खातं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) व वर्ल्ड बँक यांनी या समस्येबाबत अभ्यास सुरू केले. जून १९९९ मध्ये जेव्हा ९ लाख लोकांची तपासणी केली तेव्हा उपरोक्त आकडेवारी पुढे आली.
Informative session about the important personality. Kalpana Chawla (17 March 1962 – 1 February 2003) was an Indian-born American astronaut and engineer who was the first woman of Indian origin to go to space. She first flew on Space Shuttle Columbia in 1997 as a mission specialist and primary robotic arm operator.
Vishnushastri Chiplunkar (20 May 1850 – 17 March 1882) (विष्णुशास्त्री कृष्णाशास्त्री चिपळूणकर) was a Marathi writer, whose writings have had a decisive influence on modern Marathi prose style. He was the son of the writer and scholar Krushnashastri Chiplunkar.
List of important events from history on 17th March. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
१९९१ च्या पूर्वाधपासूनच भारताच्या गंगाजळीची अवस्था खालावून परकीय चलनसाठ्याची अभूतपूर्व समस्या निर्माण झालेली होती आणि परदेशी कर्जाच्या परतफेडीचा मोठाच प्रश्न निर्माण झालेला होता. या पार्श्वभूमीवर, मे १९९१ मध्ये पंतप्रधान चंद्रशेखर यांचं काळजीवाहू सरकार सत्तेवर असताना काही सोने विकून, तर काही गहाण ठेवून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर जून १९९१मध्ये काँग्रेसचे नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर व मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्री म्हणून सूत्रं हाती घेतल्यावर २१ जुलै, १९९१ रोजी भारतीय रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलं आणि गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी पुढील पाऊल टाकण्यात आलं. स्वातंत्र्योत्तर काळात अवमूल्यन करण्याची ही तिसरी वेळ ठरली.
१९८९ मध्ये विश्वनाथ प्रताप सिंह यांचं सरकार केंद्रात स्थानापन्न झालं आणि त्यानंतर राजकीय पातळीवर अस्वस्थता निर्माण झाली. १९९१ मध्ये हे सरकार पदच्युत झालं आणि काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असलेलं चंद्रशेखर यांचं सरकार सत्तेवर आलं. पण मार्च १९९१ मध्ये त्यांचंही सरकार कोसळलं आणि जून १९९१ मध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत चंद्रशेखर यांच्याकडे काळजीवाहू सरकार म्हणून प्रभारी सूत्रं होती. या राजकीय धामधुमीच्या पार्श्वभूमीवर, देशाची आर्थिक परिस्थिती झपाट्याने खालावत होती. १९८०च्या दशकात वित्तीय उधळपट्टी वाढतच चालली होती.
Informative session about the important personality. Vitthal Sakharam Page was born on 21st July 1910 at Bagani in Satara District of Maharashtra. After his graduation, he completed his L.L.B. degree from Mumbai University. His long career covered economics, politics, education, religion, philosophy, literature, social service, culture etc.
List of important events from history on 16th March. This list is useful for students preparing for all Competitive Exams in India.
From the publisher's feed

11 Listeners