देशातील अत्यंत महत्त्वाच्या म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य खात्याची धुरा वाहणारे डॉ. तानाजी सावंत प्रथमच `आरोग्यम्` या आपल्या लोकप्रिय मराठी पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर खास आले अन् मनमोकळे बोलतेही झाले. राज्याच्या आरोग्याची धुरा वाहताना, त्यांना जाणवलेल्या गोष्टी, आव्हाने, त्यावर त्यांनी शोधलेली उत्तरे, अल्पकाळातच राबवलेल्या विविध संकल्पना आणि एकूणच, राज्याच्या आरोग्याविषयक त्यांचा दृष्टिकोन यांची थेट उत्तरे ऐकूया, या पॉडकास्टमधून. रोखठोक मते आणि धडक कामाची पद्धत असणारे, हे आरोग्यमंत्री राज्यातील जनतेच्या आरोग्याप्रति किती गंभीर आहेत, किंबहुना, त्यांच्या विचारांची दिशा काय आहे, याचे दर्शन घडविणारा हा आरोग्यम् चा खास भाग.