कोरोनाची तिसरी लाट आता सर्वत्र पसरलेली आहे. अनेकांना त्याचे परिणाम दिसून येत आहेत. कोरोनाचाच नवा व्हेरियंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओमिक्रॉन किंवा ओमायक्रॉन इतरांना झपाट्याने बाधित करतो आहे. या पार्श्वभूमीवर, ओमायक्रॉन कितपत धोकादायक आहे, तो नेमके काय करतो, बाधित रुग्णांनी नेमके काय करावे, या संसर्गापासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, लसीकरण झाले तरीही हा संसर्ग होऊ शकतो का...या व अशा अनेक प्रश्नांची, आपल्या मनातील शंकांची उत्तरे आरोग्यम् च्या या विशेष पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत. पुण्यातील प्रसिद्ध अतिदक्षतातज्ज्ञ व रुबी हॉल क्लिनिक येथील एनटीयूचे संचालक डॉ. कपिल झिरपे यांना यासंबंधी बोलतं केलं आहे, संतोष देशपांडे यांनी. हा पॉडकास्ट आपण सर्वांनी आवर्जून ऐकावा, इतरांनाही ऐकवावा....आज त्याची खरी गरज आहे.