कोरोना व्हायरस.... सध्या ज्याने अवघ्या जगाला वेढीस धरले आहे, जगभरातील नागरिकांमध्ये दहशत पसरवलेली आहे अशी ही साथ. कोरोना आता आपल्या भारतात, अगदी महाराष्ट्रात येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर, अनेकांच्या मनात उद्भवणाऱ्या शंका-कुशंका दूर करण्यासाठी आरोग्यम् च्या विशेष भागामध्ये प्रसिद्ध अतिदक्षतातज्ज्ञ व रुबी हॉल क्लिनिकच्या एनटीयूचे संचालक डॉ. कपिल झिरपे यांच्याशी साधलेला हा संवाद.