आयुष्यात आहार आणि औषधं यांंचं नेमकं काय महत्त्व आहे? ते एकमेकांशी कसे निगडित आहेत आणि औषधांच्या `गोळी`बार नको असेल, तर आहाराचं `बुलेटप्रुफ जॅकेट` कसं काम करतंं....? आपल्या दैनंदिन गोष्टींना, विचारांना सहज स्पर्श करणारे आणि आहार आणि औषधांबाबत नेमकी समज, उमज आणि दृष्टी काय असावी, असे कित्येक प्रश्न मनात रुंजी घालतात. त्यांचाच वेध अगदी सहज-सुलभ पद्धतीने घेणाऱ्या `मिशन प्रिव्हेंशन` उपक्रमाचे प्रवर्तक डॉ. शिशिर जोशी आणि डॉ. प्रणिता अशोक यांचा संतोष देशपांडे यांच्याशी रंगलेला हा मुक्तसंवाद. जरुर ऐका... `मनापासून ऐकाल, तर मनासारखं जगाल!`