पर्व २ भाग ३ : पाहुणा - सागर चांदे
१ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा झाला. त्याच महाराष्ट्र देशाला आणि मराठी भाषेला नमन करून हा भाग सुरु झाला. गप्पा आणि कवितां मार्फत या कार्यक्रमाचा प्रवाह पोहोचला तो गुरु ठाकूर च्या 'असे जगावे' या कवितेवर. तत्पश्चात गप्पाने आयुष्य आणि जगणे या विषयावर थोडे मुक्काम मांडला आणि कार्यक्रमाचा शेवट गणपती बाप्पांच्या आठवणीने झाला. या भागातील कविता खालील प्रमाणे:
स्वागत आणि परिचय
महाराष्ट्र कोणाचा? - अभिषेक दाणी
व्यक्तिपूजा - प्रणव फडणीस
असे जगावे - गुरु ठाकूर (सादरीकरण: सागर चांदे)
हवे तसे जगावे - प्रणव फडणीस
रहाटगाडगे - अभिषेक दाणी
पर्वा भेटला बाप्पा (सादरीकरण: सागर चांदे)
---
'बिस्कीट, चहा आणि कविता सहा' हा एक गप्पा मिश्रीत कवितांचा प्रयोग आहे. प्रणव फडणीस आणि अभिषेक दाणी, ह्या कार्यक्रमात स्वलिखित आणि इतर कवींच्या कविता प्रस्तुत करतात आणि त्यावर चहा पीत-पीत (अनिवार्य) चर्चा करतात.