Buddha Dhamma in Marathi

Buddha Dhamma in Marathi

By Buddha Dhamma in MarathiReligion & SpiritualityBuddhism
Download on the App Store

Buddha Dhamma in Marathi episodes

  • क्रोधीत का होऊ नये?: Buddha Dhamma in Marathi

    बुद्धांचे विचार आणि शिकवण आजच्या युगातही लागू होते. याबाबतची अनेक उदाहरण त्यांच्या लघुकथा वाचल्यास आपल्याला कळू शकेल. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक कथेतून आपल्याला जीवन जगण्यासाठी पुन्हा एकदा प्रेरणा मिळेल. अशीच हि एक कथा आहे, ज्यामुळे आपल्याला समजेल कि आपण क्रोधीत का होऊ नये.

    Voice-Over: Sagar

    Buddha Dhamma in Marathi

    2 min
  • ८) सम्यक समाधी | आर्य अष्टांगिक मार्ग

    कुशल कार्यात चित्ताची एकाग्रता होणे, म्हणजेच सम्यक समाधी होय. समाधी शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित आहेत. जसे श्‍वासोच्छवास रोकून धरणे, काही दिवस किंवा तासाकरिता जिवंतपणी स्वत:ला जमिनीत गाडून घेणे, श्‍वासोच्छवास चालू असला तरी जागृतीविहीन होणे, प्राणांत होणे इत्यादिंनाही ’समाधी’ म्हणतात. परंतु अशा समाधीशी ‘सम्यक समाधीचा’ काहीच सबंध नाही. कोणत्याही एका चांगल्या विषयावर चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सम्यक समाधी; स्वभावत: मन (चित्त) चंचल आहे. यास्तव त्याला एकाग्र-चित्त करणे म्हणजेच समाधी होय.

    Voice-Over: Sagar

    Buddha Dhamma in Marathi

    5 min
  • ७) सम्यक स्मृती | आर्य अष्टांगिक मार्ग

    सम्यक स्मृती म्हणजे मनाची जागृअकता. व्यक्तीने आपले मन नेहमी स्मृतीमान ठेवावे. नेहमी विवेक जागा ठेवुन मनाच्या छोट्या मोठ्या हालचालींवर नेहमी ताबा ठेवावा. हीच सम्यक स्मृती होय.

    Voice-Over: Sagar

    Buddha Dhamma in Marathi

    4 min
  • ६) सम्यक व्यायाम | आर्य अष्टांगिक मार्ग

    सम्यक व्यायाम म्हणजे आपल्या मनाला प्रशिक्षण देण्यासाठी करावयाचे योग्य प्रयत्न होय. व्यक्तीने आपल्या चंचल व ओढाळ मनावर नियंत्रण ठेवुन त्याला शिस्त लावावी. मन भलतीकडे जाणार नाही, मनात अनीतीने कामवासनेचे किंवा वाईट विचार उद्भवणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.

    Voice-Over: Sagar

    Buddha Dhamma in Marathi

    4 min
  • ५) सम्यक आजीविका | आर्य अष्टांगिक मार्ग

    प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेसाठी साधन असते, हे साधन योग्य असावे हा सम्यक आजीविका चा अर्थ आहे. व्यक्तीने आपली उपजीविका चांगल्या उद्योगधंद्याने करावी. सचोटीने व प्रामाणिकपणाने काम धंदा करुन त्यावर जगावे.

    Voice-Over: Sagar

    Buddha Dhamma in Marathi

    4 min
  • ४) सम्यक कर्मांत | आर्य अष्टांगिक मार्ग

    सम्यक कर्मांत म्हणजे योग्य कृती मनुष्याने आपले कर्तव्य योग्य दिशेने, योग्य वेगाने व जाणीव ठेवुन पुर्ण करावे हा 'सम्यक कर्मांत' होय.

    Voice-Over: Sagar

    Buddha Dhamma in Marathi

    5 min
  • ३) सम्यक वाचा | आर्य अष्टांगिक मार्ग

    सत्य व सभ्यतेने बोलणे, कोणाची निंदा न करणे तसेच कोणाच्या ह्रदयाला इजा होईल असे कठोर न बोलणे म्हणजेच सम्यक वाचा होय. मानवास लाभलेली वाचा ही एक परिमाणकारक शक्ती आहे. तिचा योग्य तोच उपयोग केला पाहिजे.

    Voice-Over: Sagar

    Buddha Dhamma in Marathi

    5 min
  • २) सम्यक संकल्प | आर्य अष्टांगिक मार्ग

    प्रत्येक माणवाला काही ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात. अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी, हा सम्यक संकल्पाचा आशय आहे.

    Voice-Over: Sagar

    Buddha Dhamma in Marathi

    4 min
  • १) सम्यक दृष्टी | आर्य अष्टांगिक मार्ग

    अष्टांगिक मार्ग म्हणजे स्वत:नेच स्वत:चा मार्गदर्शक बनणे होय. येथे कोणीही मध्यस्थ नाही. आपणच सर्व काही आहे. आर्य अष्टांगिक मार्गात सम्यक दृष्टीचे स्थान सर्वप्रथम आहे. तसे तिचे महत्त्व प्रथम क्रमांकाचे आहे. सम्यक दृष्टीचा लाभ झाल्याशिवाय कोणालाही बुद्धाप्रणित धम्ममार्ग समजायचा नाही.

    Voice-Over: Sagar

    Buddha Dhamma in Marathi

    5 min

About Buddha Dhamma in Marathi

From the publisher's feed

"बुद्ध धम्म इन मराठी" हा पॉडकास्ट बुद्ध धम्माच्या विचारधारेचा प्रसार करणारा एक प्रतिष्ठित मराठी पॉडकास्ट आहे. या पॉडकास्ट मधून बुद्ध धम्माच्या मूलभूत सिद्धांतांचे आणि त्यांच्या अर्थाचे मराठीत विशद प्रस्तुत केले जाते.