Dehbhan

Dehbhan

By Niranjan MedhekarHealth & Fitness
Download on the App Store

Dehbhan episodes

  • Fitness in 40s

    चाळीशीपर्यंत व्यायामाच्या रूपानं शरीराला कोणताही 'त्रास' दिला नसेल तो देत किमान फिटनेस साधता येऊ शकतो का, मुळात चाळीशीतली तंदुरूस्ती इतकी का महत्त्वाची ठरते, व्यायामाची कास धरली तर मेनोपॉझ-अँड्रोपॉझचा प्रवास सुकर होऊ शकतो का, आईबाबांनी फिटनेसची गाडी पकडली तर त्याचा मुलांना काय फायदा होतो अशा चाळीशीतल्या कळीच्या मुद्दयांवर सर्टिफाईड फिटनेस कोच शुभांगी सदलगे यांच्यासोबत 'देहभान'च्या या ताज्या एपिसोडमध्ये मनमोकळी चर्चा केलीय. Certified fitness coach and Yoga expert Shubhangi Sadalge tells how to be fit in your 40s by remaining consistent in exercise and diet.Guest: Shubhangi Sadalge, Fitness Coach and Founder - Fitcraft Studio Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Lights: Chetan DeodharStudio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP Pune

    1 hr 9 min
  • Ironman at 18

    In this special episode of Dehbhan, Aryan Jagtap shares his unbelievable journey of finishing the prestigious and equally challenging Goa Ironman at just 18! १५ ऑगस्ट २०२१ हा दिवस माझ्या मनावर कायमचा कोरला गेलोय. पहाटेपासून धोधो पाऊस पडत होता. आणि अशा भर पावसात पहाटे पाच वाजता मी सायकल घेऊन बाहेर पडलो होतो. त्या दिवशी नोवरीज ग्रूपचे आम्ही पंचवीस एक सायकलिस्ट पुणे ते मुंबई अशी सायकल राईड करणार होतो. ही अशी इतकी मोठी राईड मी पहिल्यांदाच करत असल्यानं माझ्या मनात नाही म्हणलं तरी धाकधूक होती. पण चांदणी चौकापासून राईड सुरू झाल्यावर मला एक अगदी १५-१६ वर्षांचा मुलगा जॉइन झाला. त्याच्याकडे रोड बाईक होती आणि तो एकदम कॉन्फिडन्सनं सायकलिंग करत होता. हे पोरगं पुढे मोठी मजल मारणार हे तेव्हाच मनात येऊन गेलं होतं. झालंही तसंच! या पठ्ठ्यानं नुकतीच वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी गोवा आयर्नमॅन ही चॅलेजिंग स्पर्धा मोठ्या झोकात पूर्ण केलीय.Guest: Aryan Jagtap, Goa Ironman Finisher, Athelete Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Lights: Chetan DeodharStudio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP Pune

    38 min
  • Is Yoga Actually Good For You

    मुळच्या भारतीय आणि आज जगभरात प्रसिद्ध पावलेल्या गोष्टींमध्ये योगाचा नंबर सगळ्यात वरचा लागतो. पण जिथं पिकतं तिथं विकत नाही या न्यायानं दुर्देवानं आजही अनेकजण केवळ गैरसमजांमुळे योगासनांपासून दूर राहतात असं दिसतं. योग म्हणजे ध्यान, योग म्हणजे आसनं, योग म्हणजे प्राणायाम अशा ठराविक चष्म्यातूनच अनेकजण योगाकडे बघतात. पण खरंच योग ही जीवनशैली होऊ शकते का आणि तशी ती केली तर अनेक आजारांपासून-व्याधींपासून आपण दूर राहू शकतो का, रोजचा ताण कमी करत मनःशांतीचा अनुभव घेऊ शकतो का याविषयी आपण जागतिक योग दिनानिमित्त चर्चा करणार आहोत. Yoga Guru Suresh Thite Kaka shares how yoga helps maintain a safe distance from various ailments - from back pain and knee pain to the most common lifestyle diseases like BP and diabetes.

    42 min
  • Caring for the Caregiver

    कोणत्याही घरावर येणारं सगळ्यात मोठं संकट म्हणजे बेसावधपणे गाठणारं कुठलंही आजारपण. कधी ते वयोमानामुळे येतं, कधी अपघातामुळे तर कधी ध्यानीमनी नसताना अगदी अचानकपणे. यामध्ये सगळं लक्ष त्या रूग्णावर केंद्रीत होतं. पण दिवसरात्र त्या रूग्णाची काळजी घेणारे नातेवाईक नकळतपणे केअर गिव्हर्सच्या भूमिकेत जातात. या सगळ्या आजारपणात त्यांच्यावर प्रचंड ताण असतो, दडपण असतं. या आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या अगणित केअर गिव्हर्सची काळजी घेता येईल का? यासाठी काही यंत्रणा खरंच आहे का? वैद्यकीय क्षेत्र आणि एकूण समाजही यांच्याप्रती संवेदनशील होईल का?When an unpredictable illness strikes any family, the role of relatives suddenly changes as caregivers. However, this new responsibility is challenging, and there is a need to set up a dedicated relief mechanism for caregivers who are serving the patient 24/7. Consultant Neurologist Dr Poornima Gauri talks in detail about what needs to be done to set up such a dedicated system for caregivers. Guest: Dr Poornia Gauri, Consultant Neurologist Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP Pune

    47 min
  • Stress Reducing Techniques

    आपल्या आजूबाजूच्या ओळखीच्या-अनोळखी लोकांकडे बघितलं तर अनेकांच्या चेहऱ्यावर उदासीची एक झाक दिसते. नजरेत काहीशी चंचलता आणि हताशा दिसते. याचं मुख्य कारण म्हणजे आज प्रत्येकजण सतत कुठल्या ना कुठल्या तरी ताणात वावरतोय. कुणाला आर्थिक ताण आहेत तर कुणाला ऑफिमधले, कुणाला घरच्यांचे तर कुणाला आजारपणांचे. या ताणांवर मात करणं अशक्य वाटत असलं तरी त्यांचं व्यवस्थापन करता येऊ शकतं का? स्ट्रेसकडे दुर्लक्ष करून तो कमी होतो की उलट त्यामुळे नवे कुठले आजार बळावू शकतात? आयुर्वेद ताणाकडे कसं बघतो? आयुर्वेदिक लाईफस्टाईलनं स्ट्रेस कमी होतो का? मुळात आयुर्वेदिक लाईफस्टाईल म्हणजे काय? जाणून घेण्यासाठी ‘देहभान’चा हा नवीन एपिसोड नक्की बघा!Stress has become part of almost everyone's daily routine. Can we effectively manage stress and anxiety? Dr Sharad Dhamdhere shares how Ayurveda helps in coping with long-lasting stress.Guest: Dr Sharad Dhamdhere, MD AyurvedHost: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP Pune

    49 min
  • Redefining Relationships 2025

    लिव्ह-इन, सिच्युएशनशीप, नॅनो रिलेशनशीप, रिबाऊंड, बॉयसोबर, स्लीप डिव्होर्स हे आजच्या पिढीचे काही बझ वर्ड्स. यामुळे प्रश्न पडतो की आजच्या तरुणाईला लग्न करायचं आहे की नाही? लग्न केल्यावरही त्यांच्या जगण्याच्या, संसार करण्याच्या तऱ्हा वेगळ्या आहेत का? जेन झी आणि मिलेनियल्सची त्यांच्या पालकांसोबतची जनरेशन गॅप वाढतीय का? हल्लीच्या मुली लग्न करताना एकत्र कुटुंबाला प्राधान्य देतायत, त्याची कारणं काय? जमलं तर टिकवा नाहीतर मिटवा म्हणत घटस्फोट आज सर्रास घेतले जातात का? लिव्हइनला ज्येष्ठ नागरिकांकडून का बरं वाढती पसंती मिळतीय? या सगळ्या ‘कळीच्या’ प्रश्नांची उत्तरं देणारा ‘देहभान’चा नवीन एपिसोड घेऊन आलोय!As we advance in the 21st century, definitions of love and romance also evolve. For Gen Z and Millennials, situationships, live-in relationships, nano relations, and sleep divorce become common buzzwords. In this episode of the Dehbhan podcast, we tried to explore the psyche of today's youth, why they are not on the same page with their parents when it comes to settling down and what the road ahead.Guest: Dr Smita Prakash Joshi, Marriage Counsellor and AuthorHost: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP Pune

    51 min
  • What is Financial Freedom

    “A person can be highly educated, professionally successful, and financially illiterate”थोडक्यात भरपूर शिकलेला, नोकरी-धंदा उ त्त म सुरू असलेला मनुष्य फायनान्शियली इलिट्रेट म्हणजेच आर्थिकदृष्ट्या निरक्षर हा असू शकतो. रीच डॅड पूअर डॅड या फेमस पुस्तकातलं हे वाक्य खरंच विचार करायला लावणारं आहे. थोडक्यात आपण किती कमावतो केवळ यावरच आपलं आर्थिक आरोग्य म्हणजेच फायनान्शियल हेल्थ अवलंबून नसते? मुळात फायनान्शियल हेल्थ म्हणजे काय? शारीरिक-मानसिक आरोग्याइतकंच आर्थिक आरोग्यही इतकं महत्त्वाचं असतं का? तसंच आर्थिक आरोग्य उत्तम ठेवत फायनान्शियल फ्रिडम साधता येतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या एपिसोडमध्ये आपण करणार आहे. CA Vipul Shah talks about financial health, why it is so important, how it is correlated with physical and mental health, and how to achieve financial freedom by ensuring financial healthy practices.For reaching out to Dehbhan Podcast: [email protected]: CA Vipul Shah, CFA and Founder Director, Bigbucks Financial Services Pvt. Ltd. Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP PuneDehbhan Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/dehabhan-thahabhana

    44 min
  • Obesity In Children

    मुलांनी कसं गुटगुटीत असायला हवं! पण गुटगुटीत असणं आणि लठ्ठ असणं यात नेमका काय फरक असतो? आपलं मूल निरोगी आहे की ते त्याचं वजन प्रमाणाबाहेर वाढतंय, ते स्थूल होतंय हे कसं ओळखायचं? मुलांचा लठ्ठपणा नेमका किती काळजीचा-जोखमीचा ठरतो? आपलं मूल लठ्ठ या गटात मोडत असेल तर प्रयत्नपूर्वक वजन कमी करता येतं का? यासाठी जीवनशैलीत नेमके कोणते बदल करावे लागतात? ते करणं खरंच शक्य आहे का? असंख्य पालकांना भेडसावणाऱ्या या कळीच्या मुद्यांवर बालरोग तज्ज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला मुडगेरीकर यांच्याशी ‘देहभान’च्या नवीन एपिसोडमध्ये चर्चा केलीय.Paediatrician and Nutritionist Dr Ujjwala Mudgerikar explained in detail the causes of childhood obesity, how weight gain in childhood leads to adulthood obesity, and the harm and risk factors of childhood obesity. She also talked about how lifestyle changes can reverse obesity and what approach children and parents should have to shed excess weight.#childhoodobesity #drujjwalamudgerikar #dehbhan

    52 min
  • तुमचं लग्न खरंच मुरलंय? | overcoming intimacy issues in marriage

    लोणचं जसं मुरतं तसं लग्नही मुरायला लागतं? नेमका किती वेळ लागतो लग्न मुरायला? सासू-सुना एकमेकींविषयी इतरांशी जे बोलतात ते एकमेकींशी बोलल्या तर घराघरांतल्या कुरबुरी कमी होऊ शकतात का? नवऱ्याच्या मैत्रिणी आणि बायकोचे मित्र हे वादाचे मुद्दे का ठरतात? लग्न मग ते अॅरेंज असो की लव्ह sexual compatibility विषयी जोडप्यांनी नेमकं काय बोलायला हवं? उत्तम केमिस्ट्रीसाठी फोर प्लेचं तंत्र कसं शिकायचं? या सगळ्या कळीच्या मुद्यांवर देहभानच्या नवीन एपिसोडमध्ये विवाह समुपदेशक व लेखिका डॉ. स्मिता प्रकाश जोशी यांच्यासोबत मनमोकळी चर्चा केलीय. कमाल रंगलेला हा भाग नक्की बघा. In this episode, we discussed how to spice up marriage like pickles by avoiding all misunderstandings, making new bonds and overcoming intimacy issues.Contact Dehbhan for collaboration and other queries: [email protected]: Dr Smita Prakash Joshi, Marriage Counsellor and AuthorHost: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Reel Editor: Anjali Kumbhar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP Pune

    59 min
  • Gay Relationship | Same S*x Marriage

    एकूण लैंगिकतेचा विचार केला तर समलैंगिकतेविषयी जितके गैरसमज आहेत तितके क्वचितच इतर कुठल्या गोष्टीबद्दल असतील. समलैंगिकता ही नैसर्गिक असते का? एखाद्याला आपण समलैंगिक आहोत हे कसं कळतं? आपला समाज याकडे कसा बघतो? पाश्चात्य देशांतलं यासंदर्भातलं वातावरण कसंय? LGBTQIA+ कम्युनिटीकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टीकोन हा पूर्ण पाठिंब्याचा किंवा टोकाच्या विरोधाचा असतो. त्यामुळे सम्यक अशा दृष्टीकोनातून या विषयाकडे बघता येईल का या कुतूहलातूनही या विषयावर आज आपण मोकळेपणी चर्चा करणार आहोत. In this special episode of Dehbhan Podcast, we tried to get answers on how and when the sexuality of any person gets decided, whether it's natural or one can choose his or her sexuality, what's the legal status of gay relationships and same s*x marriage in India.

    1 hr 1 min

About Dehbhan

From the publisher's feed

Dehbhan is a Marathi podcast focusing on everything dedicated to body, mind, and soul. Hello friends! I am Niranjan Medhekar, a journalist turned writer and podcaster. In Dehbhan, which is inspired by my new book of the same name, I talk freely and frankly on topics that matter to us in daily life and that we still neglect the most—physical-mental health, fitness, wellness, and, last but not least, sexuality!