जळगाव महानगरपालिकेत मार्च महिन्यात घोडेबाजार, प्रलोभने, दिशाभूल याचा वापर करून सत्तांतर झाले. सत्ताधारी पक्ष संख्याबळाने बदलला; पण विरोधी पक्षनेतेपदी महापौरपती सुनील महाजन हे मात्र खुर्ची सोडण्याची नैतिकता दाखवू शकले नाहीत. त्यांनी नैतिकता दाखवून विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जळगाव फर्स्टचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केली आहे.