नवापूर येथील आणखी 9 पोल्ट्रीफार्ममधील पक्षांचे बर्ड फ्लू अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकुण 16 पोल्ट्रीफार्म बाधीत झाले आहेत. आतापर्यंत 4 लाख 90 हजार 485 पक्षी बाधीत झाले आहेत. यापैकी 2 लाख 31 हजार 903 पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. 2 लाख 58 हजार 582 पक्षी अद्याप शिल्लक आहेत.