बालकांचा मोफत व शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई)साठी जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी शिक्षण विभागाकडे माहिती पाठवून नोंदणी करणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर आतापर्यंत 297 शाळांपैकी निम्याच शाळांनी नोंदणी केली आहे. काही शाळांनी अद्यापही नोंदणी केलेली नसल्याने ज्या शाळा नोंदणी करणार नाही त्यांवर कारवाई करण्यााचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.