प्रकृती : आरोग्याचा  पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast

Download on the App Store

प्रकृती : आरोग्याचा पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast episodes

  • बसोबा ते दौडोबा couch potato to jumping jack

    तुम्ही दिवसातला किती वेळ कुठे ना कुठे बसलेले असता? ४ तासांपेक्षा जास्त वेळ जर तुम्ही बसून काढत असलात, तर लग्गेच हा एपिसोड ऐका.  बैठ्या जीवनशैलीचे परिणाम कमी करून उत्साही, जोशपूर्ण शरीर आणि मन कसं कमावता येतं, त्याचा रस्ता सांगणारा हा एपिसोड.  कोणत्याही वयाच्या, व्यवसायाच्या व्यक्तींसाठी युक्त्या सांगणारा. ऐका आणि ऐकवा. 

    For how many hours are you 'sitting' in a day? If you sit for more than 4 hours every day, this episode is for you. How to lead an active day irrespective of your sedentary job? - Listen to the episode.

    प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar  https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

    15 min
  • निसर्गोपचार दिन Natuprpathy Day

    India celebrates the National Naturopathy Day on Nov. 18 to commemorate the day in 1945, when Mahatma Gandhi became lifetime Chairman of the All India Nature Cure Foundation Trust and signed the deed with the object of making the benefits of Nature Cure available to all classes of people. The National Institute of Naturopathy has planned various exciting events to celebrate the 5th Naturopathy day at Pune.  The Director of NIN, Prof. (Dr.) K. Satya Laxmi unveils the fun and academic sessions of  the two day event.  Listen on! 

    दि. १८ व १९ नोव्हेंबर २०२२ रोजी पुण्यात एक आरोग्य मेळा होणार आहे. निमित्त आहे पाचव्या राष्ट्रीय निसर्गोपचार दिनाचे. राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थानच्या संचालक प्रा. (डॉ.) के सत्य लक्ष्मी या एपिसोडमध्ये माहिती देत आहेत या दोन दिवसीय कार्यक्रमाची. धमाल मजा पासून ते गंभीर भाषणांपर्यंत निसर्गोपचाराबद्दल सर्व काही या दोन दिवसांत सर्वांना अनुभवता येणार आहे. ऐका आणि ऐकवा! 

    website: https://ninpune.ayush.gov.in/Users/homedashboard 

    facebook : https://www.facebook.com/punenin/ 

    instagram: https://www.instagram.com/nin_pune/?hl=en&__coig_restricted=1 

    Twitter: https://twitter.com/bapubhawan?lang=en 

    25 min
  • प्रकियायुक्त अन्न Processed Food

    आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, ज्याबद्दल आपण खूपदा बोलतो. खूपदा ते पदार्थ विकत आणतो, बनवतो, खातो. त्यातल्या काहींबद्दल आपल्याला खरीखुरी काळजी वाटते. तर काही पदार्थ तसे आहेत हे लक्षातदेखील येत नाही.  ते म्हणजे प्रक्रियायुक्त पदार्थ. ते फक्त दुकानातल्या रॅकमधूनच आपल्या घरी येत नाहीत आणि ते सगळे सरसकट अपायकारकही नसतात. निसर्गोपचारात नेहमी म्हटलं जातं की नैसर्गिक अन्न खायचं, प्रक्रियायुक्त खायचं नाही. आज २०२२ सालात कसं पाळायचं हे? जिभेचे लाड पुरवावेसे वाटतातच. धावपळीच्या, दूर अंतरांच्या, गुंतागुंतीच्या जीवनशैलीत फक्त कच्चं खाणं शक्य वाटत नाही. मग काय नेहमी अपराधी वाटून घेत नाहीतर काळजी करत नाहीतर बेदरकारपणे ‘जाऊ दे मरू दे’ म्हणत खायचं?

    प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar  https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

    17 min
  • वाढत्या वयाची मुलं Growing kids

    मुळातल्या ऊर्जावान बाळांना आपण काय निसर्गोपचार देणार? वाढत्या वयाच्या मुलांवर संस्कार करण्याऐवजी त्यांच्या मदतीने आपण आपलं विसरलेलं उपजत शहाणपण आठवू या. पालकांनी फक्त तीनच गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. कोणत्या, ते ऐका प्रकृती पॉडकास्टच्या या भागात. 

    प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar  https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

    13 min
  • दुधाबद्दल आणखी थोडं...

    दुधाबद्दलचा पहिला एपिसोड ऐकून खूप प्रतिक्रिया आल्या. इतक्या, की त्यांच्यातल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया, प्रश्न यांची उत्तरं सगळ्यांनाच उपयोगी पडतील असं वाटलं. त्याच प्र्तिक्रियांचं शंकासमाधान करणारा हा एक दुधाबद्दलचाच आणखी एक एपिसोड. 

    कृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar  https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

    12 min
  • दूध - सत्य/ मिथ्य Doodh Satya Mithya

    दुधाबद्दलचे नेहमीचे दहा प्रश्न/समज/गैरसमज आणि त्यांची थेट उत्तरं. त्याशिवाय दूध म्हणजे काय, ते कसं पचतं, ते का हवंसं किंवा नकोसं वाटतं त्याबद्दल सर्व काही तर्कसुसंगत. 

    शिवाय एक छानशी झटपट पाककृती -चक्क एक प्रकारच्या लाडूंची. 

    The episode giving clear answers to 10 FAQs/ concepts/misconcepts. Also everything logical about what milk is, how is it digested, why we like or dislike it... and much more.

    AND-  A recipe for Laddus in a jiffy! 

    प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar  https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

    21 min
  • घेतो झोप सुखे

    झोप महत्त्वाची का आहे? झोप नीट होत नाही म्हणजे काय काय होतं? कधी झोपावं?किती तास झोपावं? झोप चांगली यावी, पुरेशी व्हावी म्हणून काय करायला हवं? 

    आधी आपण माणसाची नॉर्मल झोप काय असते ते पाहू आणि मग त्यात काय काय बिघडत जातं आणि ते कसं दुरुस्त करता येतं ते पाहू. आजच्या काळात अनिवार्य झालेली जागरणं, कामाच्या बदलत्या वेळा इ. शी जुळवून कसं घ्यायचं आणि आपल्या शरीराला झोपेच्या कुपोषणापासून कसं वाचवायचं तेही पाहू.

    म्हणजे म्हणता येईल, घेतो झोप सुखे, फिरूनि उठतो ही ईश्वराची दया. 

    प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar  https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

    18 min
  • ब्र- ब्रेकफास्टचा Breakfast, the Natural way

    दिवसातलं पहिलं अन्न खाणं म्हणजे न्याहारी किंवा ब्रेकफास्ट. तो सर्वात चांगला असला पाहिजे. काय बरं सगळ्यात पौष्टिक, झटपट, नैसर्गिक, चविष्ट खावं ब्रेकफास्टला?  अस्सा मस्त ब्रेकफास्ट करा की दिवस छान जाणारच!

    निसर्गोपचार तज्ज्ञ माधवी गोखले उत्तम ब्रेकफास्टचं रहस्य उलगडून सांगत आहेत प्रकृती च्या या भागात- ब्र ब्रेकफास्टचा.

    पाककृती - फ्रूट क्रम्बल (मायावी खंडेलवाल, मुंबई यांना धन्यवाद!)

    साहित्य - 

    अननसाचे तीन चार काप, बारीक तुकडे करून, १ मोठं सफरचंद आणि २ केळी बारीक चौकोनी तुकडे करून, अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे, पाव कप बेदाणे ऐच्छिक, थोडास्सा लिंबाचा रस चवीसाठी.

    ६ चमचे बदामाची भरड पूड, ८ टेबलस्पून खारीक पूड, ५ टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं.

    क्रीमसाठी शहाळ्याची मलई अगदी थोडं पाणी घालून मिक्सरवर फिरवून घ्या. पाव कम बेदाणे भिजवून वाटून घ्या.

    कृती - सगळी फळं आणि लिंबाचा रस एकत्र मिसळा.  त्यात बाकीचे कोरड्या वस्तूही घाला.छान मिसळा.  एका पसरट काचेच्या ट्रेमध्ये फळं पसरा. ते पूर्ण झाकलं जाईल असं त्यावर सुकं मिश्रण म्हणजे बदाम, खारीक, खोबरं यांची पूड पसरा.  क्रीम तयार करण्यासाठी शहाळ्याची पेस्ट आणि बेदाण्याची पेस्ट एकत्र मिसळा.  

    What is the best menu for the most important meal of the day? What is that is nourishing, quick, tasty and natural? Here we bring you the breakfast that is guaranteed to liven up your day!

    Madhavi Gokhale, the practising naturopath reveals the secret of 'Breakfast like a King!' 

    Recipe - Fruit Crumble - Thanks to Mayavi Khandelwal, Mumbai.

    Ingredients -  3/4 slices of pineapple cut into small pieces, 1 apple and 2 bananas cut into small squares, half cup pomgranate seeds, 1/4 cup kismis optional, lemon juice to taste.

    6 spoons coarsely crushed almonds, 6 tbl sp Kharik powder, 5 tbl sp grated dried coconut.

    for cream - blend tender coconut with a little water. Add to it soaked and blended kismis 1/4 cup.

     Recipe - Mix all fruits well. spread them on a shallow tray. Cover with the mixture of powders. 

    Serve in a bowl, Top is up with the cream.

    प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर https://www.facebook.com/vidula.tokekar   or https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

    18 min
  • स्नानपुराण Snan Puran

    रोजची सकाळ जेव्हा घड्याळापेक्षा वेगाने धावत असते, तेव्हा हे आंघोळीचे लाड कसे पुरवायचे? ऐकू या निसर्गोपचार काय म्हणतो ते. 

    आंघोळ कधी करायची, पाणी थंड की गरम, ते का, साबण लावायचा का, कोणता, किती वेळ आंघोळ करायची, व्यायाम, झोप, आंघोळ यांचा काय संबंध आहे, आजारपणात आंघोळ करावी का... या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐका या स्नानपुराणात. 

    प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. 

    https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

    17 min
  • लपेट पट्टी Lapet Patti

    लपेट पट्टी हा जलोपचाराचा म्हणजे हायड्रोथेरपीचा एक प्रकार आहे. आपण म्हशींसारखं दिवसभर पाण्यात डुंबत बसू शकत नाही, म्हणून कापडात पाणी साठवून त्याचा उपचार. ही पट्टी वापरायला अशक्य सोपी आहे. पर्समधे घेऊन जाता येते, प्रवासात वापरता येते, आपलं काम करता करता लपेटून ठेवली, तरी ती आपलं काम करत रहाते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत बिनधोक वापरता येते. हर मर्ज़ की एकही दवा!

    आणि ऐका गाजर हलवा पाककृती - एकदम नवीन, बनाने में आसान, खाने में मज़ेदार.त्याची पाककृती ॲड. कांता गिडवाणींकडून - १ वाटी किसलेलं गाजर, अर्धी वाटी खोवलेलं खोबरं, १/३ वाटी खजुराचे बारीक तुकडे, अर्धी वेलची. बदाम, बेदाणे, पिस्ते यांचे काप आवडीप्रमाणे. सुके मेवे सोडून बाकी सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्या. (मिक्सर बंद-सुरू-बंद-सुरू असं करा, सलग खूप वेळ फिरवू नका.) एकजीव करा, वरून सुका मेव्याने सुशोभित करा, आस्वाद घ्या.

    प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
    तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
     तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

    प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  https://www.facebook.com/vidula.tokekar किंवा इन्स्टा पेज वर. https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en

    15 min

About प्रकृती : आरोग्याचा पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast

From the publisher's feed

Health is natural. Health is not dependency on medicines. Health is balance, equilibrium of the five elements within. Prakruti brings you learning and unlearning of our habits, food, exercise, rest…