Radio MPSC Guru - India's First Educational Internet Radio.

Radio MPSC Guru - India's First Educational Internet Radio.

By RadioMpscGuruEducation
Download on the App Store

Radio MPSC Guru - India's First Educational Internet Radio. episodes

  • असा घडला भारत भाग २२०.

    नर्मदा नदीवर आणि तिच्या उपनद्यांवर गुजरातमधील नवागाम येथे 'सरदार सरोवर' आणि मध्य प्रदेशमधील पुनासा येथे 'इंदिरा सागर' या दोन महाकाय धरणांशिवाय ३० मोठी, १३५ मध्यम आणि ३ हजार लहान धरणं बांधण्याची योजना सरकारने आखली होती. या धरणांच्या उभारणीतून नर्मदेचं पाणी अडवणं आणि सिंचन, वीज आणि पेयजलासाठी उपलब्ध करणं, अशी ही योजना होती. अशा महाकाय प्रकल्पांमुळे निर्माण होणारा विस्थापितांचा प्रश्न, त्याचप्रमाणे एकूण प्रकल्पासाठी लागणारं भांडवल, धरणामुळे होणारी पर्यावरणीय सामाजिक हानी व धरणांच्या लाभांचा खरेखोटेपणा या सर्व मुद्द्यांवर मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सरदार सरोवर प्रकल्पाला विरोध केला गेला आणि ‘कुणाचा विकास; कुणाचा बळी देऊन?' असा कळीचा मुद्दा उपस्थित केला गेला. त्यांच्या नेतृत्वाखाली १९८० च्या दशकात नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरील आदिवासी पाड्यांतून आणि निमाडच्या समृद्ध भूमीवरील शेतकरी समुदायातून पहिल्यांदा आवाज उठला.

    18 min
  • Vyakti Vishesh : Today's Personality Ashok Kamte and Gadge baba.

    Informative session about the important personality. Ashok Kamte (23 February 1965 – 26 November 2008) was an Indian police officer, serving as the Additional Commissioner of the Mumbai Police supervising the Eastern region. He was martyred in action during the 2008 Mumbai attacks. He was posthumously given the Ashoka Chakra on 26 January 2009.

    Gadge Maharaj (23 February 1876 - 20 December 1956; also known as Sant Gadge Maharaj or Sant Gadge Baba) was an Indian mendicant-saint and social reformer from the Indian state of Maharashtra. He lived in voluntary poverty and wandered to different villages promoting social justice and initiating reforms, especially related to sanitation. He is still revered by the common people in India and remains a source of inspiration for various political parties and non-government organizations.

    9 min
  • असा घडला भारत भाग २१९.

    काश्मीरमधील काही मूलतत्त्ववादी दहशतवादी संघटनांनी तेथील पूर्वीपासून वसलेल्या काश्मिरी पंडितांच्या समुदायाला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्यावर १९८९-९० दरम्यान लक्षावधी काश्मिरी पंडितांना तेथून निघून जम्मू, दिल्ली व इतर शहरांजवळ उभारलेल्या निर्वासित छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला.

    जम्मू-काश्मीरमध्ये आझाद काश्मीरवादी संघटनांनी चालवलेल्या संघर्षाला १९८९-९० मध्ये पाकिस्तानपुरस्कृत कट्टर मूलतत्त्ववादी जिहादी संघटनांच्या घुसखोरीमुळे धार्मिक विद्वेषाचा रंग चढून हजारो सर्वसामान्य माणसं दहशतवादात भरडली गेली. हिज्ब-उल् मुजाहिदीनसारख्या पाकिस्तानधार्जिण्या जिहादी दहशतवाद्यांनी आरंभलेल्या हत्या, छळ व अत्याचारांमुळे लक्षावधी काश्मिरी पंडित कुटुंबांना काश्मीर सोडण्यावाचून पर्याय राहिला नाही. विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांचं काश्मीर खोऱ्यात नंतरही पुनर्वसन न झाल्याने त्यांना दुर्दैवी जीवन नशिबी आलं.

    8 min
  • Vyakti Vishesh : Today's Personality Kasturba Gandhi and Abul Kalam Azad.

    Informative session about the important personality. Kasturbai Mohandas Gandhi born Kasturbai Gokuldas Kapadia; 11 April 1869 – 22 February 1944) was an Indian political activist. She married Mohandas Gandhi in 1883. With her husband and son, she was involved in the Indian independence movement in British India. She was, to a great extent, influenced by her husband. National Safe Motherhood Day is observed on 11 April every year. The day also marks the birth anniversary of Kasturba Gandhi. Mohandas affectionately called her 'Ba' and in letters referred to her as 'Mrs. Gandhi'.

    Abul Kalam Ghulam Muhiyuddin Ahmed bin Khairuddin Al-Hussaini Azad (11 November 1888 – 22 February 1958) was an Indian independence activist, Islamic theologian, writer and a senior leader of the Indian National Congress. Following India's independence, he became the First Minister of Education in the Indian government. He is commonly remembered as Maulana Azad; the word Maulana is an honorific meaning 'Our Master' and he had adopted Azad (Free) as his pen name. His contribution to establishing the education foundation in India is recognised by celebrating his birthday as National Education Day across India.


    17 min
  • असा घडला भारत भाग २१८.

    भारतीय उपखंडातील मालदीव्हज् या द्वीपसमूहात ३ नोव्हेंबर, १९८८ या दिवशी श्रीलंकेत वास्तव्य असलेल्या दोन व्यापाऱ्यांनी तमिळ गनिमांच्या मदतीने राष्ट्राध्यक्ष मौमून अब्दुल गय्यूम यांची सत्ता उलथवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्राध्यक्ष गय्यूम यांनी भारताकडे मदत मागितल्यानंतर भारतीय लष्कराने तातडीने 'ऑपरेशन कॅक्टस्' ही मोहीम आखून कमांडो कारवाई केली आणि हा उठाव मोडून काढला.

    अरबी समुद्रातील लहान-लहान ११९१ बेटांच्या मिळून बनलेल्या मालदीव या छोट्या देशाला १९६५ मध्ये ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं व या द्वीपसमूहाचं 'मालदीव्हज्' असं नामकरण झालं. १९६८ मध्ये मालदीवमधील राजेशाही संपुष्टात येऊन प्रजासत्ताक राज्याची स्थापना झाली आणि इब्राहिम नासीर हे मालदीव्हज्चे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. पुढे १९७८ मधील निवडणुकीत त्यांना पराभूत करून अब्दुल गय्यूम राष्ट्राध्यक्ष झाले. स्वातंत्र्यानंतर अल्पावधीतच भारताने मालदीव्हज्बरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते. १९७६ मध्ये उभय देशांमध्ये परस्परसहकार्याचा करार झाला होता. अब्दुल गय्यूम यांच्या कारकीर्दीत उभय देशांमधील राजकीय आणि आर्थिक संबंध अधिक दृढ झाले.

    13 min
  • Vyakti Vishesh : Today's Personality Shanti Swaroop Bhatnagar.

    Informative session about the important personality. Sir Shanti Swaroop Bhatnagar (21 February 1894 – 1 January 1955) was an Indian colloid chemist, academic and scientific administrator. The first director-general of the Council of Scientific and Industrial Research (CSIR), he is revered as the "father of research laboratories" in India. He was also the first Chairman of the University Grants Commission (UGC).

    In 1958, to honour his name and legacy, the Indian Council of Scientific and Industrial Research (CSIR) instituted the Shanti Swarup Bhatnagar Prize for Science and Technology for scientists who have made significant contributions in various branches of science.

    7 min
  • असा घडला भारत भाग २१७.

    बोफोर्स तोफांच्या गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर संपूर्ण देशात राळ उठवल्यानंतर नोव्हेंबर १९८९च्या नवव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडीला यश मिळालं. २ डिसेंबर, १९८९ रोजी राष्ट्रीय आघाडीचं सरकार केंद्रात सत्तेवर आलं आणि विश्वनाथ प्रताप सिंह देशाचे पंतप्रधान बनले.

    विश्वनाथ प्रताप सिंह मूळचे उत्तर प्रदेशचे. त्यांनी तिथे मुख्यमंत्रिपदही भूषवलं होतं. १९८० मध्ये त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला व १९८२ मध्ये इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. १९८६ मध्ये ते राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री बनले.

    10 min

About Radio MPSC Guru - India's First Educational Internet Radio.

From the publisher's feed

Download from Play Store. Radio MPSC Guru is powered by Spectrum Academy. On this internet Radio you can listen to Educational informative content useful for the preparation of various Competitive…

More shows like Radio MPSC Guru - India's First Educational Internet Radio.

The Daily Brief by Zerodha

The Daily Brief

10 Listeners