
Sign up to save your podcasts
Or


Informative session about the important personality. Hon. Jagannath Shankarsheth Murkute (also spelled as Jugonnath "Nana" Shunkersheth [1] and Jaggannath Shankarsheth Murkute; 10 February 1803 – 31 July 1865) was an Indian philanthropist and educationalist. He was born in 1803 in the wealthy Murkute family of the Daivadnya Brahmin community in Mumbai. So high was his credit that Arabs, Afghans and other foreign merchants chose to place their treasures in his custody rather than with banks.[1] He soon acquired a large fortune, much of which he donated to the public.
List of important events from history on 10th February. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेद्वारे पदार्पण करणाऱ्या अझरुद्दीनचा लागोपाठ तीन शतकांचा विश्वविक्रम
१ फेब्रुवारी, १९८५ रोजी कानपूर येथील इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेटपटू महंम्मद अझरुद्दीन याने शतक झळकवलं आणि कसोटी पदार्पणातच एकाच मालिकेतील सलग तीन कसोटी सामन्यांत तीन शतकं झळकवण्याचा विक्रम त्याने नोंदवला.
रंगीत दूरदर्शनचं आगमन सार्थ ठरवून भारत 'बेन्सन अँड हेजेस' क्रिकेटस्पर्धेत अजिंक्य
१० मार्च, १९८५ रोजी भारतीय संघाने 'बेन्सन अँड हेजेस' क्रिकेट करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाचा पराभव करून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. १९८३चा विश्वचषक पटकवल्यावर पाठोपाठ 'बेन्सन अँड हेजेस' चषकही प्राप्त केल्यामुळे भारतीय संघाची एकदिवसीय क्रिकेटमधील लक्षणीय प्रगती पुन्हा एकवार सिद्ध झाली.
जागतिक महिला क्रिकेट इतिहासात डायना एडलजी आणि संध्या अग्रवालचे विक्रम
महिला क्रिकेट जरी फारसं लोकप्रिय ठरलं नाही, तरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय महिला कसोटी क्रिकेट संघाची पहिली कप्तान डायना एडलजी हिने चिकाटीने या खेळाची पायाभरणी केली. १९८५ मधील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तिने आपल्या करकीदीतील १०० वा बळी नोंदवला. जागतिक महिला क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम साधणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. त्याचप्रमाणे महिला फलंदाज संध्या अग्रवाल हिने १९८४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक (१३४) झळकवल्यावर, १९८६ मध्ये इंग्लंडविरुद्ध १९० ही जागतिक क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.
उपासमारीने हजारावर लोकांचे प्राण घेणारा ओडिशा राज्यातील कालाहंडीचा भीषण दुष्काळ
ओडिशा राज्यातील १९८५ साली पडलेल्या भीषण दुष्काळात या राज्यातील कालाहंडी जिल्ह्यात एक हजारांहून अधिक लोक उपासमारीने मृत्युमुखी पडले. वेळीच दखल न घेतल्यामुळे आणि सरकारी उपाययोजना न झाल्यामुळे एखाद्या नैसर्गिक आपत्तीत एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची स्वातंत्र्योत्तर काळातील ही पहिली मोठी दुर्घटना ठरली.
Informative session about the important personality. Swatantryashahir Govind's full name is Govind Trimbak Darekar Native Village - Kanher Pokhari Ta. Parner (Born: 9th February, 1874 - 28th February, 1926) Nature had given him an amazing poetic talent. Govind's father used to work as a bricklayer in Nashik. His father died when Govind was four or five years old. Govind himself developed a high fever within a few days and both his legs became paralyzed. They became disabled.
Murlidhar Devidas Amte, popularly known as Baba Amte, (26 December 1914 – 9 February 2008) was an Indian social worker and social activist known particularly for his work for the rehabilitation and empowerment of people suffering from leprosy. He has received numerous awards and prizes including the Padma Vibhushan, the Dr. Ambedkar International Award, the Gandhi Peace Prize, the Ramon Magsaysay Award, the Templeton Prize and the Jamnalal Bajaj Award. He is also known as the modern Gandhi of India.
List of important events from history on 9th February. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
असंतोष व अतिरेकी चळवळींच्या पार्श्वभूमीवर 'टाडा'सारखे अनेक कायदे संमत
आणीबाणीदरम्यान 'मिसा' सारख्या कायद्याच्या अतिरेकी गैरवापराची विरोधकांना व सामान्य कार्यकर्त्यांना झळ सोसावी लागल्यावर १९७७ मध्ये तो कायदा रद्दबातल ठरवला गेला. मात्र १९८० च्या दशकाच्या पूर्वार्धापासून भारताच्या विविध भागांतील असंतोषाच्या व अतिरेकी चळवळीच्या पार्श्वभूमीवर मिसासारखेच पोलीस व सुरक्षा दलांना व्यापक अधिकार देणारे विविध कायदे विविध भागांत लागू होत राहिले व ते 'ड्रॅकोनियन' म्हणून वादग्रस्तही होत राहिले. पंजाबमध्ये अतिरेकी चळवळ फोफावल्याच्या पार्श्वभूमीवर १९८५ मध्ये केंद्र सरकारने 'टाडा' अर्थात 'टेररिस्ट अँड डिसरप्टिव्ह अॅक्टिव्हिटीज (प्रिव्हेन्शन) अॅक्ट' हा कायदा संमत केला.
संगणक क्षेत्राच्या विकासासाठी नवं धोरण घोषित होऊन सॉफ्टवेअर उद्योगाच्या गतिमान विकासाला प्रारंभ
१९८५ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आधुनिक प्रगत तंत्रज्ञानाच्या विकासाला प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून संगणकीय क्षेत्राच्या विकासाला चालना देणारं धोरण घोषित केलं. या धोरणानुसार संगणकविषयक सामग्रीवरील (हार्डवेअर-सॉफ्टवेअर) आयात करात मोठ्या प्रमाणात घट करण्यात आली. याशिवाय निर्यातीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाला आयकरातून सूट देण्यात आली, त्याचप्रमाणे १०० टक्के निर्यात करणाऱ्या परदेशी कंपन्यांना भारतात उद्योग सुरू शक्य झालं. करण्यास अनुमती देण्यात आली.
शहरातील झोपडपट्ट्यांच्या समस्येवरील लघुपट आनंद पटवर्धनकृत 'हमारा शहर' प्रदर्शित
१९८०च्या दशकाच्या पूर्वार्धात मुंबईत अनधिकृत झोपडपट्ट्या आग फूटपाथवरील रहिवासी यांच्याविरुद्ध शासनाने कठोर मोहीम हाती घेतली होती. या पार्श्वभूमीवर, या समस्येचा विविध अंगांनी वेध घेणारा हमारा शहर' हा आनंद पटवर्धन यांचा हिंदी लघुपट १९८५ साली प्रदर्शित झाला.
Informative session about the important personality. Zakir Husain Khan (8 February 1897 – 3 May 1969) was an Indian economist and politician who served as the third president of India, from 13 May 1967 until his death on 3 May 1969.
He previously served as the governor of Bihar from 1957 to 1962 and as the second vice president of India from 1962 to 1967. He was also the co-founder of Jamia Milia Islamia, serving as its vice-chancellor from 1928. Under Husain, Jamia became closely associated with the Indian freedom movement. He was awarded the Bharat Ratna (India's highest civilian honour) in 1963.
List of important events from history on 8th February. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
देशातील शिक्षितांचं प्रमाण वाढवण्यासाठी अभिनव अशा इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना
२० सप्टेंबर, १९८५ रोजी देशातील सर्वांत मोठ मुक्त विद्यापीठ म्हणून ज्याची गणना होते, अशा इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
विधिनिषेधशून्य पक्षांतरावर आळा घालण्यासाठी पक्षांतरविरोधी कायदा लागू
दर निवडणुकीनंतर निवडून आलेले उमेदवार विधिनिषेध न बाळगता लक्षणीय प्रमाणात आपला राजकीय पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात सहभागी होतात, असं चित्र वारंवार दिसून येत होतं. या घटनांमुळे संसदीय प्रणालीची प्रतिष्ठा व प्रतिमा डागाळल्याचं दिसून येत होतं. या पार्श्वभूमीवर राजीव गांधी पंतप्रधान असताना पक्षांतरावर अंकुश ठेवण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यासाठी 'कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट (फिफ्टी सेकंड) अॅक्ट १९८५' हा कायदा संसदेने १५ फेब्रुवारी १९८५ रोजी संमत केला.
मुस्लीम स्त्रियांच्या पोटगीबाबतचा वादग्रस्त 'शहाबानो खटला'
सर्वोच्च न्यायालयात मोहम्मद अहमद खान विरुद्ध शहाबानो बेगम या खटल्यासंदर्भातील अपिलात निकाल देताना बासष्टवर्षीय घटस्फोटित मुस्लीम महिला शहाबानो हिला क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या १२५व्या कलमाखाली पोटगी मागण्याचा हक्क आहे, असा निकाल २३ एप्रिल १९८५ रोजी दिला. प्रस्तुत निकालात सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम वैयक्तिक कायद्यांचा उहापोह करून त्यासोबतच राज्यघटनेच्या कलम ४४ नुसार भारतीय नागरिकांकरता समान नागरी संहिता असावी, अशी भावनाही व्यक्त केली.
Informative session about the important personality. Sarvadnya Shri Chakradhar Swami (also known as Kunwar Haripaladeva) was a spiritual master, and one of the most important exponents of the Vaishnavism tradition within Hinduism. He is the founder of Mahanubhava Sampradaya of Krishnaite Vaishnavism. Shree Chakradhar Swami advocated worship of Lord Krishna and preached Dvaita. He did not recognize caste distinctions, and like Buddha had only two others viz the householder and recluses. Some sources claim that Chakrapani Prabhu and Govinda Prabhu as the originators of Mahanubhava doctrine and Chakradhara as the first apostle who systematized Mahanubhava as a school of Bhakti philosophy.
From the publisher's feed

10 Listeners