
Sign up to save your podcasts
Or


दीर्घकाळच्या असंतोषानंतर केंद्रशासित मिझोरामला स्वतंत्र घटक राज्याचा दर्जा
१९६६च्या मिझो बंडखोरांच्या सशस्त्र उठावानंतर १९७२ मध्ये दर्शन आसाममधील मिझोबहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यावरही ईशान्य भारतातील हा भाग खदखदतच राहिल्याने १९८६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मिझो नॅशनल फ्रंटच्या नेत्यांशी शांतता करार केला. त्यानुसार शस्त्रसमर्पण केल्यावर २० फेब्रुवारी, १९८७ रोजी केंद्रशासित मिझोरामला स्वतंत्र घटक राज्याचा दर्जा दिला गेला.
केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा लाभलेलं अरुणाचल प्रदेश घटकराज्य घोषित
१९५४ मध्ये 'नेफा' विभागाची निर्मिती झाली आणि पुढे १९७२ मध्ये या जनजातिबहुल भागाचं अरुणाचल प्रदेश असं नामकरण भारताने करून त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला. त्यानंतर १५ वर्षांनी म्हणजे २० फेब्रुवारी, १९८७ रोजी या ईशान्य भारतातील प्रदेशाला स्वतंत्र घटकराज्याचा दर्जा प्रदान केला गेला. मात्र 'अरुणाचल प्रदेश’ राज्य म्हणून घोषित झाल्यावर चीनने आक्षेप घेतला व पुढील तीन महिने भारत-चीन सीमेवरील या भागात तणावाचं तयार झालं.
Informative session about the important personality. Sarojini Naidu (Chattopadhyay; 13 February 1879 – 2 March 1949) was an Indian political activist and poet. A proponent of civil rights, women's emancipation, and anti-imperialistic ideas, she was an important figure in India's struggle for independence from colonial rule. Naidu's work as a poet earned her the sobriquet 'the Nightingale of India', or 'Bharat Kokila' by Mahatma Gandhi because of colour, imagery and lyrical quality of her poetry.
List of important events from history on 13th February. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
गणितविषयक संशोधनाला चालना देण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस स्थापन
तमिळनाडूतील 'नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हायर लर्निंग इन फ्रन्टिअर डिसिलन्स ऑफ मॅथेमॅटिकल सायन्स' या संस्थेला गणितविषयक संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने १९८६ मध्ये मान्यता दिली व ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस' ही अणुऊर्जा विभागाची अनुदानित असलेली संस्था म्हणून अस्तित्वात आली.
फरिबर्ज सबाकृत सर्वधर्मसमभावी बहाई पंथाच्या 'लोटस मंदिरा'ची वास्तू साकार
जिथे कुणा देवाची मूर्ती वा प्रतिमा नाही, कर्मकांडं नाहीत, पुजारी नाहीत, धर्मोपदेशक नाही आणि तरी सर्व धर्मांच्या लोकांना आपल्या धारणेनुसार नियंत्याशी आणि परस्परांशी संवाद साधण्यासाठी पोषक असं अवकाश आहे, अशा दिल्लीतील लोटस मंदिराची वास्तू कॅनडाचे वास्तुशास्त्रज्ञ फरिबर्ज़ सबा यांनी १९८६ साली पूर्णत्वाने साकार केली.
टपाल गतिमानतेने पोहोचण्यासाठी टपाल खात्याची 'स्पीड पोस्ट' सेवा सुरू
टपालाच्या गतिमान वाहतुकीची व कालबद्ध बटवड्याची वाढती मागणी लक्षात घेऊन टपाल विभागाने ऑगस्ट १९८६ मध्ये 'स्पीड पोस्ट सेवा सुरू केली.
समूहभावनेला प्राधान्य देणारी ‘नुक्कड’ मालिका दूरदर्शनवर प्रसारित
साईद मिर्झा आणि कुंदन शहा या दिग्दर्शकद्वयाने दिग्दर्शित केलेली समूहभावनेला प्राधान्य देणारी 'नुक्कड' ही मालिका १९८६- व्हावं, यासाठी यथायोग्य ८७ मध्ये राष्ट्रीय दूरदर्शनवरून प्रसारित केली गेली.
कावलूर येथील वेधशाळेत आशियातील सर्वांत मोठ्या दुर्बिणीची स्थापना
१९८६ मध्ये तामिळनाडूतील कावलूर येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स'च्या वेधशाळेत ‘वैना बाप्पू टेलिस्कोप को स्थापना केली गेली. आशियातील ही सर्वांत मोठी व सर्वाधिक क्षमतेची टेलिस्कोप मानली जाते. वैना बाप्पू या सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचं नाव या दुर्बिणीला देण्यात आलं.
नवी दिल्लीमध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थापन
भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्ली येथील पालम विमानतळाचा वापर आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी होत होता. परंतु, नवी दिल्लीमधून आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीमध्ये सातत्याने वाढ होत गेल्याने १९८६ मध्ये पालम विमानतळाचा विस्तार करण्यात येऊन आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी स्वतंत्र टर्मिनल स्थापन करण्यात आलं. या विमानतळाचं नामकरण 'इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ' असं करण्यात आलं.
इंडियन एअरलाईन्सच्या विमानाला मुंबईजवळ भीषण अपघात
१२ ऑक्टोबर, १९८६ रोजी इंडियन एअरलाईन्सच्या विमानाने मुंबईच्या सांताक्रूज विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर पेट घेतला. वैमानिकाने विमान त्याही स्थितीत उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला आणि मुंबई विमान कोसळलं.
Informative session about the important personality. Charles Robert Darwin (12 February 1809 – 19 April 1882) was an English naturalist, geologist and biologist, best known for his contributions to evolutionary biology. His proposition that all species of life have descended from common ancestors is now widely accepted and considered a fundamental concept in science. In a joint publication with Alfred Russel Wallace, he introduced his scientific theory that this branching pattern of evolution resulted from a process that he called natural selection, in which the struggle for existence has a similar effect to the artificial selection involved in selective breeding. Darwin has been described as one of the most influential figures in human history, and he was honoured by burial in Westminster Abbey.
List of important events from history on 12th February. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
शेअरबाजाराच्या चढउताराच्या शास्त्रीय निरीक्षणासाठी 'सेन्सेक्स' अर्थात बीएसई इंडेक्स परिमाण
शेअरबाजारातील चढ-उतारांचं नियमितपणे आणि सूक्ष्मतेने निरीक्षण शक्य व्हावं, या उद्देशाने २ जानेवारी, १९८६ रोजी बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) इंडेक्स अर्थात सेन्सेक्स (निर्देशांक) हे परिमाण रुजू केलं गेलं. १८७५ साली स्थापना झालेल्या मुंबई शेअर बाजाराने (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) स्वातंत्र्यानंतर अनेक घडामोडी पहिल्या.
शेतीमालाधारित उत्पादनांच्या निर्यातवाढीसाठी 'अपेडा'ची स्थापना
भारतात उत्पादित होणाऱ्या शेतीमालाच्या तसंच शेतीमालावर आधारित प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातवाढीसाठी सर्वागीण सहकार्य व सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने डिसेंबर १९८५ मध्ये 'अॅग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्टस् एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी' (अपेडा)चा कायदा करण्यात आला व त्याला अनुसरून फेब्रुवारी १९८६ मध्ये 'अपेडा' या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली.
मोठ्या शहरांमधील दूरसंचारसेवेसाठी 'एमटीएनएल'ची स्थापना
१९८६ मध्ये दूरसंचार विभागाचं विभाजन करण्यात येऊन मोठ्या शहरांमधील दूरसंचार सेवेसाठी एमटीएनएलची अर्थात महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ही सार्वजनिक कंपनी स्थापित करण्यात आली. १ एप्रिल, १९८६ पासून दिल्ली व मुंबई येथे या कंपनीची सेवा सुरू झाली.
ओव्हरसीज कम्युनिकेशन्स सव्हिसच्या लक्षणीय विस्तारानंतर 'व्हीएसएनएल'ची स्थापना
१९७२च्या स्थापन झालेल्या ओसीएस अर्थात ओव्हरसीज कम्युनिकेशन्स सर्व्हिस या दूरसंचार खात्याच्या अखत्यारीतील आंतरराष्ट्रीय संपर्कसेवेचा उपग्रह संपर्कप्रणालीद्वारे १९८० च्या दशकात झपाट्याने विस्तार झाला आणि १९८६ मध्ये ओसीएसचं व्हीएसएनएल अर्थात विदेश संचार निगम लिमिटेड या सार्वजनिक कंपनीत रूपांतर करण्यात आलं.
ग्राहकांच्या तक्रारींचं जलद गतीने निवारण करण्यासाठी ग्राहक मंचाची स्थापना
स्वातंत्र्य प्राप्त होऊन चार दशकं पूर्ण होत आली असताना म्हणजे १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ हा कायदा संसदेने संमत केला. २४ डिसेंबर १९८६ मध्ये हा कायदा देशभरात लागू झाला.
स्त्रियांचं असभ्य स्वरूपात चित्रण करण्यावर प्रतिबंध
विविध प्रकारे स्त्रियांचे असभ्य स्वरूपात चित्रण करण्यावर प्रतिबंध घालणारा 'इन्डिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमेन (प्रोहिबिशन) अॅक्ट, १९८६' हा कायदा केंद्र सरकारने १९८६ मध्ये संमत केला.
Informative session about the important personality. Thomas Alva Edison (February 11, 1847 – October 18, 1931) was an American inventor and businessman. He developed many devices in fields such as electric power generation, mass communication, sound recording, and motion pictures.These inventions, which include the phonograph, the motion picture camera, and early versions of the electric light bulb, have had a widespread impact on the modern industrialized world.He was one of the first inventors to apply the principles of organized science and teamwork to the process of invention, working with many researchers and employees. He established the first industrial research laboratory.
List of important events from history on 11th February. This list is useful for students preparing for all competitive exams in India.
आण्विक निःशस्त्रीकरण साधण्यासाठी गोर्बाचेव्ह-राजीव गांधी यांचा 'दिल्ली जाहीरनामा'
सोव्हिएत रशियाचे राष्ट्रप्रमुख मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी नोव्हेंबर १९८६ मध्ये भारताचा दौरा केला व भारताचे तत्कालीन पंतप्रधान यांच्यासोबत आण्विक निःशस्त्रीकरणाबाबतची अंतिम चर्चा करून उभय नेत्यांनी जागतिक राजकारणात महत्त्वाचं ठरलेलं व 'दिल्ली जाहीरनामा' म्हणून प्रसिद्ध असलेलं असं या विषयावरील संयुक्त घोषणापत्र जारी केलं. या जाहीरनाम्याद्वारे या नेत्यांनी आण्विक निःशस्त्रीकरणाची योजना मांडून अहिंसावादी नव्या जगाच्या रचनेचं आवाहन केलं.
ब्लू स्टार ऑपरेशनचा सूड घेण्यासाठी पुणे शहरात जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या
अमृतसरच्या सुवर्णमंदिरात दहशतवाद्यांविरुद्ध जून १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार अंतर्गत केलेल्या कारवाईत भारताचे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य सहभागी होते. या कारवाईचा सूड म्हणून जनरल अरुणकुमार वैद्य यांची त्यानंतर सुमारे दोन वर्षांनी म्हणजे १० ऑगस्ट, १९८६ रोजी महाराष्ट्रातील पुणे इथे हत्या करण्यात आली.
बिलंदर व कुविख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्ल्स शोभराजचा नाट्यमय 'जेल ब्रेक'
आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारी व त्याचप्रमाणे खून, फसवणूक, दरोडे, चोऱ्या, तस्करी, गॅम्बलिंग अशा नाना प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेला चार्ल्स शोभराज पूर्व युरोप आणि आशियातील अनेक देशांसाठी 'मोस्ट वॉन्टेड' होता. काही गुन्ह्यांच्या प्रकरणांत त्याला अटक झालेली होती आणि बिहारच्या तिहार येथील तुरुंगात त्याला बंदिस्त करण्यात आलेलं होतं. मात्र कमालीचा बिलंदर व धूर्त म्हणून कुविख्यात असलेला आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्ल्स शोभराज याने तुरुंगाधिकाऱ्यांना गुंगारा देऊन १६ मार्च, १९८६ रोजी तुरुंगातून पलायन केलं आणि या अटक झाली. नाट्यमय घटनेमुळे देशभर खळबळ उडाली.
From the publisher's feed

10 Listeners