Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Tur Market: देशातील बाजारात तुरीला काय भाव मिळतोय? | Agrowon

    देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीत आल्यानंतर मागील काही दिवसांपासून मात्र स्थिरावलेले दिसतात. तुरीचे भाव मागील सहा महिन्यांमध्ये जवळपास दुप्पट झालेले आहेत. पण मागील काही दिवसांपासून तुरीचे भाव स्थिरावले आहेत. मग तुरीचे भाव कशामुळे स्थिरावले? सध्या तुरीला काय भाव मिळत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Jeera Market: जिऱ्याचे भाव पुढील काळात कसे राहू शकतात? | Agrowon

    मागील हंगामात घटलेले उत्पादन आणि निर्यातीला असलेली मागणी, यामुळे जिऱ्याच्या भावात चांगली तेजी आली. जिऱ्याच्या भावात चालू हंगामात सुरुवातीपासूनच वाढ होत गेली. पण मागील काही दिवसांपासून जिऱ्याच्या भावात चढ उतार सुरु आहेत. मग जिऱ्याच्या भावातील तेजी का मंदावली? जिऱ्याला सध्या काय भाव मिळतोय? पुढील काळात जिऱ्याचे भाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Onion Market: कांद्याचे भाव वाढतील की दबावातच राहतील? | Agrowon

    सध्या कांद्याचे भाव दबावात असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंदची हाक दिली. त्यामुळे शेतकऱ्यांची आणखी गोची झाली. मग याचा कांदा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? पुढील काळात कांदा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Turmeric Market: हळदीचा बाजार वाढणार की नाही? | Agrowon

    चालू हंगामात देशातील हळद लागवड घटली आहे. त्यातच दुष्काळी स्थितीचा पिकाला फटकाही बसत आहे. महत्वाच्या हळद उत्पादक राज्यांमध्ये पावसात मोठी तूट आहे. यामुळे हळद उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. यामुळे हळदीचे भाव तेजीत आले होते. पण मागील काही दिवसांपासून हळदीचे भाव स्थिरावले आहेत. मग हळदीचे भाव का स्थिरावले? पुढील काळात हळदीच्या भावात वाढ होईल की नाही? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • बेकायदेशीर एचटीबीटी कापसाला परवानगी मिळणार?| Will illegal HTBT cotton be allowed? | Agri Unplugged

    भारतात असलेली मजुरांची टंचाई आणि त्यावर होणारा मोठा खर्च लक्षात घेता एचटीबीटी कापसाला परवानगी दिली जावी, असे मत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी नुकतेच व्यक्त केले आहे.

    Considering the shortage of labour in India and the huge cost involved, HTBT cotton should be allowed, said Y. G. Prasad, Director General, Central Institute of Cotton Research.

    7 min
  • Tur Market: तुरीची लागवड खरचं ४३ लाख हेक्टरवर पोचली ? | Agrowon

    देशात तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. बाजारातील तुरीची आवक कमीच आहे. तर तुरीला बाजारात चांगलाच उठाव मिळत आहे. याचा तुरीला आधार मिळतोय. मग सध्या तुरीला काय भाव मिळतोय? सरकारच्या तूर लागवडीच्या अंदाजावर उद्योगांना संशय का आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Tomato Market: टोमॅटोचे भाव अचानक कशामुळे पडले? | Agrowon

    सध्या टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. टोमॅटो विक्रीतून वाहतुकीचा खर्चही निघत नाही. बाजारात टोमॅटोला केवळ एक रुपया प्रतिकिलोपासून भाव सुरु होतो. मग टोमॅटोचा सरासरी भाव काय आहे? टोमॅटो भावावर अचानक दबाव का आला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Chana Market: नाफेडच्या विक्रीने हरभरा भाव पडतील का? | Agrowon

    हरभरा भावातील तेजी कायम आहे. हरभरा भावात ऑगस्ट महिन्यापासून चांगली तेजी आली. देशातील बाजारात सणांसाठी जुलैपासूनच मागणी वाढू लागते. त्यातच यंदा पाऊसमान कमी आहे. नाफेडनेही विक्री सुरु केली. मग याचा हरभरा बाजारावर काय परिणाम होतोय? पुढील काळात हरभरा भाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • पोळा - बैलाच्या ऋणातून उतराई होण्याचा सण | Celebrating The Festival of "Bail Pola" | Agri Unplugged

    सर्जा-राजाला नदीवर नेऊन कुणी आंघोळ घालत असेल, कुणी सर्जा-राजा साज बाहेर काढला असला. त्याची साफसफाई सुरू असेल. तर कुठं हिरवेगार माळरानात चराईला सोडून चककणाऱ्या त्यांच्या शिंगाकडे टक लावून कुणी बसलेलं असेल. पोळा सणाची धामधूम गावोगावी सुरू झाली असेल. पोळा सण बैलाच्या ऋणातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न असतोय. याच पोळा सणाबद्दल आज तुमच्याशी थोडं बोलावं म्हणलं

    9 min
  • Cotton Market: आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस कशामुळे वाढला? | Agrowon

    अमेरिका आणि चीनमधील परिस्थितीमुळे जागतिक कापूस बाजाराला चांगलाच आधार मिळाला. तर देशात कापूस पुरवठ्याची स्थिती चांगली दिसत नाही. त्यामुळे देशातील कापूस बाजारात भाव वाढलेले दिसतात. मग सध्या कापसाला काय भाव मिळतोय? पुढील काळात कापसाला काय भाव मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…