Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Onion Market: कांदा भावावरील दबाव पुढील काळातही कायम राहील का? | Agrowon

    देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा झालेली दिसते. पण सध्याची झालेली सुधारणा शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या भावापेक्षा कमीच आहे. मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? पुढील काळात कांदा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Chana Market: हरभऱ्याचे भाव पुढील काळात कसे राहतील? | Agrowon

    हरभऱ्याच्या भावातील तेजी कायम आहे. देशात मागील काही महिन्यांपासून तूर, मूग आणि उडदाचे भाव तेजीत आहेत. याचा आधार हरभरा दरालाही मिळत आहे. तूर, मूग आणि उडदाच्या भावात तेजी आल्याने हरभराही तेजीत आला. मग सध्या हरभऱ्याला काय भाव मिळत आहे? पुढील काळात हरभरा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market: तुरीच्या बाजाराला कशाचा आधार मिळतोय? | Agrowon

    केंद्र सरकारने तुरीचे भाव कमी करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून सर्व प्रयत्न सुरु केले आहेत. पण तरीही तुरीचे भाव कमी झाले नाही. आता आफ्रिकेतून तूर आयात वाढत आहे. मग याचा तूर बाजारावर काय परिणाम होत आहे? तुरीला सध्या काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Turmeric Market: हळदीचा बाजार पुन्हा सुधारेल का? | Agrowon

    एकिकडे यंदा देशातील हळद लागवडीत घट झाली. पण वाढलेल्या भावात हळदीचा उठाव कमी झालेला दिसतो. तसेच हळद उत्पादक केंद्रांवर हळदीचा स्टाॅक पडून आहे. मग याचा हळदीच्या बाजारावर काय परिणाम होतोय? पुढील काळात हळदीचे भाव वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Tomato Market: टोमॅटोचे भाव सुधारतील की कमीच राहतील? | Agrowon

    टोमॅटो उत्पादकांची कोंडी अद्यापही कायम आहे. मागील काही दिवसांमध्ये टोमॅटोच्या किमान भावपातळीत काहिशी वाढ झाली. कमाल भावपातळीही काहिशी वाढली. मग सध्या टोमॅटोला काय भाव मिळतोय? टोमॅटोचे भाव पुढील काळात कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Jeera Market: जिऱ्याचा बाजार कशामुळे स्थिरावला? | Agrowon

    जिऱ्याच्या दरातील तेजी मागील काही दिवसांपासून कमी झालेली आहे. जिऱ्याचे वायदे उच्चांकी ६५ हजार रुपये प्रतिटनांवरून कमी झाले. जिऱ्याचे वायदे ५९ हजार ८८० रुपयांवर होते. मग जिऱ्याचे वायदे कमी का झाले? जिऱ्याला सध्या काय भाव मिळतोय? पुढील काळात जिऱ्याची भावपातळी काय राहू शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Sugar Market: साखरेतील तेजीचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल का? | Agrowon

    यंदा जागतिक साखर उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेचे भाव १२ वर्षातील उच्चांकी पातळीवर आहेत. यंदा भारत आणि थायलंडमध्येही साखर उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे. मग सध्या साखरेला काय भाव मिळतोय? पुढील काळात साखर दराची स्थिती काय राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Onion Market: कांदा बाजाराला आधार मिळेल का? | Agrowon

    देशाचे कांदा हब असलेल्या नाशिक जिल्ह्यात लिलाव सुरु झाले. पण पहिल्या दिवशी बाजारातील आवक कमीच होती. तर दरही दबावातच दिसले. मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? कांदा बाजाराला आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Jeera Market: जिऱ्याला उठाव वाढेल का? | Agrowon

    जिऱ्याच्या भावात मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल दुप्पट वाढ झाली. जिऱ्याचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. मग भावात तेजी आल्यानंतर दर कशामुळे स्थिरावले? जिऱ्याचा बाजार पुढील काळात कसा राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Turmeric Market: हळद बाजारावर कशाचा दबाव आला? | Agrowon

    गेल्यावर्षीच्या तुलनेत हळदीचे भाव तब्बल दुप्पट झाले आहेत. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हळदीचा बाजार स्थिर दिसतो. मग हळदीचे भाव कशामुळे स्थिरावले? हळदीच्या दरात सुधारणा होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.

    5 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…