
Sign up to save your podcasts
Or


देशातील बाजारात कांदा भावात मागील दोन दिवसांपासून काहीशी सुधारणा झालेली दिसते. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कांदा भावात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची वाढ झाली. मग सध्या कांद्याला काय भाव मिळत आहे? पुढील काळात कांद्याचे भाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
गेल्या काही वर्षांत ह्या देशाच्या आर्थिक चिंतनात एक अंधश्रद्धा तयार झाली आहे. ती म्हणजे वेगवान आर्थिक वाढ हे एकच उद्दिष्ट गाठले की दारिद्र्याचा प्रश्न आपोआपच सुटतो. याला खरे तर फार पुरावा नाही. वास्तविक महाराष्ट्राला आर्थिक वाढीबरोबरच दारिद्र्य निर्मूलनाचा, विषमतेचा विचार स्वतंत्रपणे करावा लागेल.
In the past few years, a superstition has formed in the economic thinking of this country. That is, if the single goal of rapid economic growth is achieved, the problem of poverty will automatically be solved. There really isn't much evidence for this. Actually, Maharashtra will have to think about poverty eradication and inequality separately along with economic growth.
सोयाबीनच्या भावात वायद्यांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायद्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चढ उतार दिसून आले. पण सरासरी भावपातळी मात्र कायम होती. मग सोयाबीनला सध्या काय भाव मिळत आहे? आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये काय स्थिती होती? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील मसूरचा साठा घोषित करण्याची सक्ती केलीय. घोषित केलेल्या साठ्यापेक्षा जास्त माल आढळला तर कडक कारवाई करण्याची तंबीही सरकारने दिलीय. या निर्णयाचा तूर, उडीद, मसूरच्या भावावर काय परिणाम होईल, ते पाहूया मार्केट बुलेटिनच्या शेवटी.
कापूस वायद्यांमध्ये मागील काही दिवसांपासून कापूस वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायद्यांमध्ये कापसाचे भाव कमी झाले होते. तर दुसरीकडे काही बाजारांमध्ये नवा कापूस दाखल झाला. मग नवा कापूस कुठे आला? नव्या कापसाला काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
आल्याच्या दरात ऑगस्ट महिन्यात काहीशी नरमाई आली होती. पण दरात पुन्हा एकदा सुधारणा झाली. राज्याच्या सर्वच बाजारांमध्ये आल्याच्या दरात सुधारणा झाली. मग आल्याचे भाव सध्या कितीवर पोचले? पुढील काळात आल्याचे भाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यानंतर देशात आयात वाढली. मागील पाच महिन्यांपासून आयातीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. याचा दबाव देशातील तेलबिया बाजारावर आला आहे. मग सोयातेलाचे भाव वाढण्याची शक्यता आहे का? सोयातेलाकडून सोयाबीनला आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
यंदा जागितक पातळीवर आणि देशातील कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चांगलीच तेजी आली आहे. देशातील वायद्यांमध्येही चांगली तेजी आली आहे. मग वायद्यांमध्ये कापसाला काय भाव मिळाला? बाजार समित्यांमधील दराची स्थिती काय होती? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
शेतकऱ्यांना हे ही कळतं की, पाऊस काही त्याच्या मर्जीनं पडत वा थांबत नाही. निसर्गापुढे सगळेच हतबल आहेत. कोणी अतिवृष्टीमुळे परेशान आहे तर कोणी पुरेसा पाऊस झाला नाही म्हणून. वर्षानुवर्षे हे असंच चालू आहे. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्यांचं जगणं अधिक कठीण होत चाललंय. हतबलतेतून शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
Farmers know that rain does not fall or stop at their will. Everyone is helpless before nature. Some people are worried because of excessive rains and some do complain about insufficient rains. This has been going on for years. Livelihood of those who depend only on agriculture is becoming more and more difficult. Farmers are committing suicide out of desperation.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क लावल्यानंतर बाजार दबावात आला होता. नाफेडच्या खरेदीचाही बाजाराला आधार मिळाला नाही. कारण कांद्याचे भाव दबावातच आहेत. मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? कांद्याचे भाव पुढील काळात कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
From the publisher's feed