Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Cotton Market: कापूस बाजारातील आवक कशी होतेय? | Agrowon

    कापूस बाजार गेल्या काही दिवसांपासून स्थिर दिसतो. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये मात्र काहीसे चढ उतार सुरु आहेत. मग सध्या कापसाला बाजार समित्या आणि वायद्यांमध्ये काय भाव मिळतोय? पुढील काळात बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Tomato Market: टोमॅटो बाजारावर आवकेचा दबाव वाढेल? | Agrowon

    टोमॅटोचा बाजार आता मोठ्या प्रमाणात दबावात आला. टोमॅटोचे भावही निम्यापेक्षा कमी झाले. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांची चिंता वाढली. मग सध्या टोमॅटोला काय भाव मिळतोय? टोमॅटोची बाजारातील आवक कशी राहू शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • नेपाळमधील शेतकऱ्यांचे जगणे कष्टाचे पण आनंददायी| Life of farmers in Nepal | Agri Unplugged

    नेपाळमधील ८० टक्के जनता ग्रामीण भागात, डोंगर माथ्यावर राहते. शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आणि जगण्याचा आधार. त्यांच्या घरांची रचना, जागा, राहणीमान, जगणं हे शेतीपूरक, निसर्गपूरक आहे. या शेतीत जगणाऱ्या स्त्री-पुरुषांचं जगणं कष्टाचं आहे. 

    10 min
  • Soybean Market: सोयाबीन बाजार दबावातच का दिसतो? | Agrowon

    देशातील बाजारात मागील तीन महिन्यांपासून सोयाबीनचे भाव दबावात आहेत. भावात चढ उतारही दिसत आहेत. पण सोयाबीनच्या भावाला मागील तीन मिहिन्यांमध्ये मोठा आधार मिळालेला नाही किंवा भावात मोठी तेजी आली नाही. मग यापुढील काळात सोयाबीन बाजारात काय स्थिती राहू शकते? सोयाबीन भाव वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Maize Market: मक्याच्या भावात वाढ का होतेय? | Agrowon

    देशातील बाजारात मक्याच्या भावात  मागील काही दिवसांपासून वाढ झाली. दुसरीकडे मागील हंगामात मक्याचे उत्पादन वाढले होते. पण बाजारातील मक्याची आवक सध्या कमी दिसते. मग मक्याच्या भावात किती वाढ झाली? मका दरातील वाढ पुढील काळातही टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Cotton Market: कापूस भाव आता का वाढत आहेत? | Agrowon

    देशात कापूस लागवड १२१ लाख हेक्टरवर पोचल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे. पण कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांमध्ये पाऊस रुसून बसला. दुसरीकडे कापसाला चांगला भाव मिळत आहे. मग आज कापसाचे भाव कितीवर पोचले? कापूस दरातील सुधारणा टिकून राहील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Jeera Market: जिऱ्याचे भाव आणखी किती वाढू शकतात? | Agrowon

    देशात चालू हंगामात जिऱ्याचे भाव दुप्पट झाले. सध्या बाजारात जिऱ्याला ५७ हजार ते ५८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. दुसरीकडे जिऱ्याची लागवड दुप्पट होण्याची शक्यता आहे. मग जिऱ्याच्या भावावर याचा काय परिणाम होईल? दिवाळीत जिरा आणखी किती वाढू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Chana Market: हरभरा दरातील वाढ टिकेल का? | Agrowon

    हरभरा भावात मागील काही दिवसांपासून चांगलीच वाढ झाली. अगदी महिनाभरापुर्वी दबावात असलेल्या हरभरा भावात देशभरात सुधारणा दिसून आली. मग हरभरा भाव का वाढले? याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो का? हरभरा भाव किती वाढले? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • शेतकरी आणि कुत्र्याचं नातं अत्यंत जीवाभावाचं| Why dogs are true friends of farmers? | Agri Unplugged

    शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुत्री जीवाभावाची आणि लाखमोलाची असतात. शेतात कुत्र्यांसारखी दुसरी सोबत नाही. इतका सजगपणा, निष्ठा माणसांकडून अपेक्षित नाही. कुत्र्यांना खायला दिलं आणि थोडसं प्रेम दिलं की, ती एखाद्या अंगरक्षकाप्रमाणे आपल्या अवतीभोवती फिरत राहतात.

    Dogs are vital and valuable to farmers. There is no other companion like dogs in the field. Such alertness and loyalty is not expected from humans. When dogs are fed and given a little love, they stay around us like a bodyguard

    5 min
  • Wheat Market: गव्हाचे भाव आणखी वाढतील का? | Agrowon

    देशातील बाजारात गव्हाच्या भावात मागील काही दिवसांपासून मोठी वाढ झाली. चालू वर्षात आतापर्यंत म्हणजेच १ जानेवारी ते १० ऑगस्टपर्यंत देशातील गव्हाचे भाव जवपास ४८ टक्क्यांनी वाढले आहेत. मग देशात विक्रमी उत्पादन होऊनही गव्हाच्या भावात एवढी वाढ का झाली? गहू वाढीसाठी साठेबाजी हे एकच कारण आहे का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…