Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Cotton Market: कापूस वायद्यांमध्ये किती सुधारणा झाली? | Agrowon

    देशातील बाजारात कापूस दर मागील आवडाभरापासून वाढलेले आहेत. कापसाला वाढलेली मागणी आणि घटत चालेली आवक यामुळे दरात वाढ झाली. मग बाजारात कापसाला काय भाव मिळाला? वायद्यांमध्ये काय स्थिती होती? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Onion Market: कांद्याच्या भावात आणखी वाढ होईल का? | Agrowon

    जुलै महिन्यापर्यंत बाजारातील आवक जास्त राहून कांद्याचे भाव दबावात आले होते. त्यातच मालाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना कांदा विकावाच लागत होता. यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. पण मागील आठवडाभरात कांदा आवक वाढलेली असतानाही भाव वाढत होते. मग आतापर्यंत कादा भावात किती वाढ झाली? कांद्याला काय भाव मिळतोय? पुढील काळात कांदा बाजाराचं चित्र काय राहू शकतं? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Soybean Market: वाढलेल्या पेरणीचा सोयाबीन बाजारावर दबाव येईल? | Agrowon

    सोयाबीन बाजारात सध्या चढ उतार सुरु आहेत. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात भाव टिकताना दिसत नाहीत. मग सोयाबीनच्या भावात चढ उतार का सुरु आहेत? अमेरिकेत काल भाव पडल्यानंतर आज का वाढले? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Cotton Market: कापूस भावात किती वाढ झाली? | Agrowon

    देशातील बाजारात मागील दोन दिवसांपासून कापूस दरात काहीशी वाढ दिसून आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ उतार सुरु आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापूस दर वाढले आहेत. मग कापूस दरात नेमकी किती वाढ झाली? वायद्यांमध्ये आज काय स्थिती होती? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market : भारतातील तूर लागवडीची स्थिती काय?  | Agrowon

    आफ्रिकेतील तूर काढणी सुरु झाली. पुढील महिन्यापासून ही तूर आपल्या बाजारात दिसेल. सरकारही तूर आयातीसाठी जोरदार प्रयत्न करत आहे. मग याचा देशातील तूर बाजारावर काही परिणाम जाणवतो का? गेल्या आठवड्यात तुरीचा बाजार कसा राहीला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • टोमॅटो आणि पक्षपाती मिडिया| Tomato and bias media | Agri Unplugged

    सहा महिने टोमॅटोची काय स्थिती होती? आजची ही दरवाढ होण्यापूर्वी टोमॅटो रस्त्यावर फेकले जात होते, ५० पैसे किलोने विकले जात होते, हे तुम्हाला आठवतंय का? तेव्हा सरकारने हे टोमॅटो किफायतशीर भावात विकत घ्यावेत, किमान शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, असं तुम्हाला वाटलं का? कितीतरी टोमॅटो उत्पादक टोमॅटोच्या या जुगारात बरबाद झालेत, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर कशाला टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या नावाने खडे फोडताय? 

    What was the condition of tomatoes six months ago? Do you remember when tomatoes were thrown on the streets, sold for 50 paise per kg? Did anyone ask if the government should buy these tomatoes at an affordable price, or at least compensate the farmers? Many tomato growers have failed measurably in this tomato gamble? Urban people, active on social media, are not aware of these facts.

    5 min
  • Wheat Market: कापूस वायद्यांमध्ये किती वाढ झाली | Agrowon

    देशातील बाजारात सध्या कापूस आवक जास्तच दिसते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला उठाव वाढला. यामुळे दरात चढ उतार दिसत आहेत. मग कापूस दराची स्थिती काय होती? वायद्यांमध्ये कापसाला काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Wheat Market: केंद्र सरकारवर गहू आयातीवर वेळ आली का? | Agrowon

    देशातील बाजारात मागील तीन महिन्यांपासून गव्हाचे भाव चांगलेच वाढले. सरकारने स्टाॅक लिमिट लावूनही बाजारातील पुरवठा वाढला नाही. तसेच सरकारकडे गव्हाच्या स्टाॅकची माहिती कमी आली. मग किती टन गहू सरकारच्या रडारबाहेर आहे? सरकारकडे किती टनांची नोंद झाली? गव्हाचे भाव सरकारला कमी करता येतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market: भारताला तूर आयात वाढवता येईल का? | Agrowon

    देशात सध्या तुरीचे भाव तेजीतच आहेत. त्यातच देशातील तूर लागवड गेल्यावर्षीपेक्षा १६ टक्क्यांनी पिछाडीवर दिसते. याचा तूर बाजाराला मजबूत आधार मिळाला. यामुळे सरकारने मोझांबिकमधून तूर आयात वाढविण्यासाठी कंबर कसली. मग सरकार मोझांबिकमधून तूर आयात वाढीसाठी कोणते प्रयत्न करत आहे? आयात वाढल्यास देशातील बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Jeera Market: जिऱ्याचा बाजार पुढील काळात कसा राहू शकतो? | Agrowon

    जिऱ्यातील तेजीला चांगला आधार आहे. मागील महिनाभरातच जिऱ्याच्या भावात १३ टक्क्यांची सुधारणा झाली. बाजारातील आवक कमी असल्याने दर वाढल्याचे व्यापारी आणि अभ्यासक सांगत आहेत. मग सध्या जिऱ्याला काय भाव मिळतोय? पुढील काळात जिऱ्याचे भाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…