
Sign up to save your podcasts
Or


देशातील बाजारात मागील तीन आठवड्यांपासून कांद्याचा बाजार स्थिर दिसतो. जून महिन्यापासून कांदा दरात काहीशी सुधारणा दिसली होती. पण जुलै महिन्यात कांदा भाव स्थिर दिसले. मग जुलै महिन्यात कांदा दरातील सुधारणा का थांबली? पुढील काळात कांद्याचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
देशातील बाजारात गव्हाच्या दरात पुन्हा वाढ दिसून येत आहे. सरकारने निर्यातबंदी आणि स्टाॅक लिमिट लावल्यानंतर देशात गव्हाचे भाव स्थिर दिसत होते. त्यातच सरकारने स्टाॅकमधील गहू विकण्यासही सुरुवात केली. यामुळे खुल्या बाजारात गव्हाचे भाव स्थिर दिसू शकतात, अशी आशा होती. पण बाजारात गव्हाच्या दरात वाढ झाली. मग असं का घडतंय? गव्हाचे भाव कितीपर्यंत वाढले? पुढील काळात दरातील वाढ टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
आपण कीटकनाशकांच्या विषारी जाळ्यात अडकलो आहोत. त्याला फक्त शेतात फवारलेली कीटकनाशके आणि खते जबाबदार नाहीत. काढणीपश्चात प्रक्रिया, साठवणुक, खाद्यपदार्थ प्रक्रिया, घरातली पेस्ट कंट्रोल अशा अनेक मार्गांनी ही रसायने आपल्या अन्नात येतात.
Increasing amount of toxic chemicals in food is a serious concern. Only pesticides and fertilisers are not responsible for it. These chemicals enter our food in many ways such as post-harvest processing, storage, food processing, and household pest control etc.
देशातील बाजारात सध्या तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. आजही बाजारातील आवक कमीच होती. बाजारातील आवक वाढीसाठी सरकारने अनेक प्रयत्न केले. पुढील महिन्यात आफ्रिकेतील बाजारात नवा माल येईल. मग देशात आयात वाढेल का? या आयातीचा तूर बाजारावर काय परिणाम होईल? सध्या तुरीला काय भाव मिळत आहे? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी. याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
भारत जगातील सर्वात मोठा आयातदार आहे. चालू हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यानंतर भारतात आयात वाढली. जुलै महिन्यातही देशात मोठी आयात होण्याची शक्यता आहे. पण सध्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता भारताच्या आयातीचा काय परिणाम होऊ शकतो? सोयाबीनला याचा आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
देशातील बाजारात कापसाचे भाव काहीसे वाढले आहेत. दरात आज काहीसे चढ उतार दिसले. पण भावपातळी घटली नव्हती. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही काहीसे चढ उतार सुरु आहेत. मग आज कापूस दराचं चित्र काय राहीलं? देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव काय होते? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
भारताने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या भावात मोठी वाढ झाली. पण देशातील बाजारात तांदळाचे भाव कमी झाले आहेत. मग देशात तांदळाचे भाव किती कमी झाले? आंतरराष्ट्रीय बाजारात किती वाढ झाली? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
देशातील बाजारात मागील तीन महिन्यांपासून कापसाचे भाव दबावात होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजाने कापूस विकला. आता बाजारातील कापूस आवकही घटली आहे. त्यातच मागील दोन दिवसांमध्ये कापूस दरात सुधारणा दिसून आली. मग कापसाच्या भावात कशामुळे सुधारणा झाली? कापसाला आज काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या दरात सुधारणा टिकून होती. देशातील बाजारात मात्र सोयाबीन दबावातच आहे. मात्र अमेरिकेतील सोयाबीन पिकाला फटका बसल्याने यंदाही उत्पादन वाढण्याची शक्यता कमीच आहे. मग अमेरिकेत यंदा सोयाबीनचा पुरवठा कसा राहू शकतो? सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे कसे आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स संस्थांनी मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले आहेत. या संस्था गरीब कुटुंबांना, गरजूंना १४ ते २६ टक्के दराने कर्जवाटप करतात. शिवाय कर्जाचे हप्ते थकल्यास चक्रवाढ व्याज लावण्याचे हक्क त्यांनी स्वत:कडे राखीव ठेवलेले असतात. त्यामुळे कर्जाची रक्कम वाढत जाते. मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात बऱ्याच वेळा ह्या फायनान्स संस्था २४ ते २६ टक्क्याने कर्ज देतात.
Microfinance institutions have spread a lot in rural Maharashtra. These organizations distribute loans to poor families and needy people at the rate of 14 to 26 percent. Moreover, they reserve the right to charge compound interest if the loan installments are overdue. Therefore, the loan amount increases. However, in some rural areas of Marathwada and western Maharashtra, these financial institutions often give loans at 24 to 26 percent.
From the publisher's feed