Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Tur Market: तूर आयात वाढल्याने बाजारावर दबाव येईल का? | Agrowon

    देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच आहेत. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ते जून या काळात गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट आयात झाली. तरीही तुरीच्या दरातील तेजी टिकून आहे. मग आयात वाढूनही भाव तेजीतच का राहीले? तूर दरातील तेजी आणखी किती दिवस टिकेल? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Soybean Market: सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळेल का? | Agrowon

    सोयाबीनचा जागतिक बाजार सध्या दबावात आहे. देशातही सोयाबीनचा भाव हंगामातील निचांकी पातळीदरम्यान कायम आहे. सोयाबीनच्या दरात काहीसे चढ उतारही दिसून येत आहे. मग सध्या आंतरराष्ट्रीय  बाजारात सोयाबीनला काय भाव मिळतोय? देशातील सोयाबीन बाजारात काय स्थिती आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Cotton Market: कापूस आवकेची काय स्थिती आहे? | Agrowon

    आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातही कापूस दरात चढ उतार कायम आहेत. सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या दरात दरातील तफावत जास्त दिसते. तर बाजारातील कापूस आवकही सध्या जास्तच आहे. मग आज कापसाला बाजार समित्यांमध्ये आणि वायद्यांमध्ये काय भाव मिळाला? कापसाची आवक किती झाली होती? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • शेतीसारखी जीवावरची जोखीम किती व्यवसायांत आहे? | Life threatening risks in Agriculture | Agri Unplugged

    शेतकरी शेती स्वत:साठी करीत असले तरी, ते अन्न काही केवळ आपल्यापुरतं पिकवत नाहीत. ते अन्न सगळेच खातात. शेतीत पावलोपावली जीवावरची जोखीम असते. ती पत्करून  पिकवलेल्या शेतमालाचे भाव पाडण्यासाठी सरकारसह सगळेच टपून बसलेले असतात. एवढ्या जीवावरच्या जोखमीचे आणखी कोणते व्यवसाय आहेत? 

    No doubt, Farming is a profession, but they do not grow food just for themselves. Everyone eats that food. Agriculture is always life-threatening. And there is no assurance to get the returns. Everyone, including the government, is trying to bring down the prices of agricultural commodities. No other profession is so life-threatening.

    14 min
  • Chana Market : हरभरा बाजारावर सरकारच्या विक्रीचा दबाव | Agrowon

    देशात सध्या सरकारच हरभऱ्याचा सर्वात मोठा स्टाॅकीस्ट आहे. सध्या सरकारकडे ३८ लाख टनांच्या दरम्यान हरभरा स्टाॅक आहे. सध्या बाजारातील हरभरा आवक खूपच कमी झाली. त्यातच गुणवत्तापूर्ण हरभऱ्याला मागणी आहे. यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून आली. मग हरभरा भाव किती वाढले? हरभरा बाजारावर कशाचा दबाव आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Maize Market: मक्याचा बाजार कशामुळे सुधारला? | Agrowon

    देशातील बाजारात मागील दोन आठवड्यांपासून मक्याच्या भावात सुधारणा पाहायला मिळत आहे. जूनच्या मध्यापर्यंत मक्याचे भाव अगदी १ हजार ६०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते. पण सध्या मक्याच्या भावात वाढ झाली आहे. मग सध्या मक्याला काय भाव मिळतोय? मका बाजाराला कशाचा आधार मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Jeera Market :जिऱ्याचे भाव कमी होतील की नाही? | Agrowon

    यंदा जिरा चांगलाच भाव खात आहे. सध्या देशात जिऱ्याचा स्टाॅक खूपच कमी आहे. तर देशांतर्गत आणि निर्यातीसाठी जिऱ्याला चांगली मागणी आहे. पण काही व्यापारी आणि स्टाॅकीस्ट नफावसुली करत असल्याने दरात दोन ते तीन हजारांचे चढ उतार दिसतात. मग यंदा जिऱ्याचे उत्पादन किती झाले? जिऱ्याचे भाव पुढील काळात वाढतील की कमी होतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    5 min
  • Cotton Market: बाजारातील कापूस आवक कमी झाली का? | Agrowon

    देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढ उतार कायम आहेत. देशातील बाजारात कापूस वायद्यांमध्ये आज नरमाई दिसून आली. मग आज बाजारातील कापूस आवक कशी होती? कापसाला आज काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • टोमॅटो दरात आली तेजी

    महिन्याभरापूर्वी भाव मिळत नसल्याने टोमॅटो फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. सध्या मात्र दर तेजीत आहेत. त्यामागची नेमकी कारणं काय, राज्यात आणि देशात टोमॅटोची स्थिती कशी आहे, सध्या दरपातळी काय आहे, हा दर किती दिवस टिकून राहील, पाहूयात मार्केट बुलेटिनच्या शेवटी.

    7 min
  • हळद बाजारात काय घडतंय ?

    हळदीचा वायदेबाजार तेजीत आहे. हजर बाजारात म्हणजे स्पॉट मार्केटला हळदीचा पुढचा कल काय राहील, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. राज्यातील आणि देशातील प्रमुख हळद उत्पादक राज्यांत पावसाची स्थिती काय आहे, त्याचा दरावर काय परिणाम होईल, पाहुयात मार्केट बुलेटिनच्या शेवटी.
    Turmeric futures market is booming. Farmers are curious about what will be the future trend of turmeric in Hajar market i.e. spot market. At the end of the market bulletin, let's see what is the rainfall status in the state and major turmeric producing states of the country, what will its effect be on the price.

    7 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…