Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Chana Market: आवक घटल्याने हरभऱ्याला आधार मिळेल का? | Agrowon

    देशातील बाजारात मागील दोन आठवड्यांपासून हरभऱ्याची आवक कमी झाली. गुणवत्तापूर्ण हरभरा बाजारात नसल्याचं व्यापारी सांगत आहेत. आता हरभऱ्यासाठी विचारणा वाढली आहे. पण गरजेप्रमाणे हरभरा मिळत नसल्याची चर्चा आहे. पण मग असं का घडतं? यामुळे हरभऱ्याचे दर वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • आनंददायी शेती शक्य आहे का?| Does joyful farming make any sense?| Agri Unplugged

    शेतीचे भोग संपण्याची सध्या कुठलीच चिन्हं दिसत नाहीत. उलट यापेक्षा अधिक वाईट दिवस येतील, असाच सध्याचा रागरंग आहे. अशा काळात शेतकऱ्यांनी माझी 'आनंददायी शेती' ची कल्पना अंमलात आणण्याची गरज आहे. ही शेती आपलं जगणं आनंददायी, आरोग्यदायी करू शकते, हा माझा अनुभव आहे. 

    5 min
  • Soybean Market: ब्राझील यंदा किती सोयाबीन निर्यात करेल| Agrowon

    ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी सोयाबीन उत्पादन झाले. येथील उद्योगांच्या मते ब्राझीलचं उत्पादन १ हजार ५६० लाख टनांवर पोचलं. यामुळे स्वस्त सोयाबीन बाजारात आले. ब्राझीलचे सोयाबीन स्वस्त असल्याने यंदा निर्यातही विक्रमी पातळीवर पोचण्याचा अंदाज आहे. मग ब्राझीलच्या सोयाबीन निर्यातीचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? सध्या सोयाबीनचा बाजार कसा आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Soybean Market: बाजारात सोयाबीन आवकेची स्थिती काय आहे? | Agrowon

    देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. यंदा शेतकऱ्यांनी बाजारात सोयाबीन आवकेचा दबाव वाढू दिला नाही. त्यामुळे भावपातळी टिकून दिसते. पण शिल्लक सोयाबीनचे प्रमाणही जास्त आहे. परिणामी सध्या आवकेचा हंगाम नसतानाही सरासरीपेक्षा जास्त आहे. मग सध्या सोयाबीनला काय भाव मिळत आहे? बाजारातील सोयाबीन आवक कशी होत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Chana Market: नाफेड विकणार स्टाॅकमधील जूना हरभरा | Agrowon

    नाफेडची हरभरा खरेदी बहुतांशी ठिकाणी बंद झाली. २७ जूनपर्यंत नाफेडने देशात २३ लाख ४५ हजार टन हरभरा खरेदी केली. यंदा मध्य प्रदेशात सर्वाधिक हरभरा खरेदी झाली. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. त्यातच नाफेडने हरभरा विक्रीचा निर्णय घेतला. मग नाफेडची हरभरा विक्री कधीपासून सुरु होईल? कोणत्या राज्यांमध्ये नाफेड हरभरा विकणार आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Onion Market: कांद्याच्या दरात सुधारणा; किती झाला भाव? | Agrowon

    देशातील बाजारात मागील आठवडाभरापासून कांद्याच्या दरात काहीशी सुधाराणा झाली. पण अद्यापही भाव उत्पादन खर्चापेक्षा कमीच असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मागील आठवडाभरापासून देशभरातील कांदा आवक काहीशी कमी झाली. मग कांदा दरात झालेली सुधारणा टिकेल का? कांद्याच्या भावात किती वाढ झाली? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market: तुरीच्या दरातील तेजी टिकून राहील का? | Agrowon

    तुरीच्या दरात २०० रुपयांपर्यंत चढ उतार. म्यानमारमधून आयात होणाऱ्या तुरीच्या भावातही क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांची निरमाई दिसून येत आहे. मग तुरीच्या भावात नरमाई का दिसत आहे? बाजारात तुरीची आवक वाढली का? पुढील काळात तुरीचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • जंगलात रमलेले शेतकरी कुटुंब| Why does this farmer's family live in the forest?| Agri Unplugged

    कोकणातील नरवणमध्ये गेलो असताना जंगलात शेतीत राहणाऱ्या सोमण कुटुंबाविषयी कळलं. सोमण पुण्यातली नोकरी सोडून वडिलोपार्जित शेती कसायला म्हणून १९७५ साली ते आले. गावात त्यांना वाळीत टाकण्यात आल्याने, आपल्या जंगलालगतच्या शेतीत एक छोटी झोपडी बांधून ते राहू लागले. हा भाग वस्तीपासून बराच दूर आहे. आजुबाजुला एकही घर नाही. त्यांच्या घरापर्यंत यायचा रस्ता त्या काळात त्यांनी स्वत:च केलाय. 

    When I went to Naravane in Konkan, I came to know about the Soman family living in the forest as a farmer. Soman was employed in SKF Company in Pune. There was some ancestral land here. He came in 1975. As they were ostracised in the village, they built a small hut in their farm next to the forest and settled down. This area is far away from the habitation. There is no house around. During that time, he himself made the road to reach his house.

    11 min
  • Maize Market: आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे वायदे का पडले? | Agrowon

    देशातील बाजारात मक्याचे भाव सध्या दबावातच दिसत आहेत. मक्याला बहुतांशी बाजारात हमीभावापेक्षा कमी भाव मिळतो. तर आंतरराष्ट्रीय बाजारात एकाच दिवसात मका वायद्यांमध्ये मोठी घसरण झाली. मग देशातील मका बाजार दबावातच का आहे? मका बाजाराला आधार मिळू शकतो का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • देशात तुरीचा पुरवठा कमीच राहण्याची शक्यता | Agrowon

    देशातील बाजारात तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. सध्या देशात तुरीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे सरकारच्या प्रयत्नानंतरही भाव कमी होण्याचं नाव घेईना. सरकारने शेतकऱ्यांनी तूर लागवड वाढवावी यासाठी हमीभावाने खेरदीच्या नियमात बदल केले. हमीभावातही वाढ केली. पण आतापर्यंत तुरीची लागवड पिछावडीवर आहे. मग याचा बाजारावर काही परिणाम होईल का? तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…