Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Turmeric Market: हळदीची लागवड कमी राहण्याचा अंदाज | Agrowon

    देशात मागील दीड महिन्यापासून हळदीच्या दरात चांगली वाढ झाली. राज्यासह महत्वाच्या हळद उत्पादक राज्यांमध्ये जून महिन्यात पावासाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हळद लागवडीवर परिणाम झाला. यामुळे हळदीच्या दरातील तेजी वाढली. मग हळदीचे भाव किती वाढले? वायद्यांमध्ये काय स्थिती होती? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 

    6 min
  • Onion Market: कांद्याचे बाजारभाव टिकून राहतील का? | Agrowon

    देशातील बाजारात सध्या कांद्याची आवक सरासरीपेक्षा कमीच दिसते. आज महाराष्ट्रातील आवक जास्त दिसली. मागील काही दिवसांपासून बाजारातील कांदा आवक कमी होऊन दरात सुधारणा दिसून आली. मग आज बाजारातील कांदा आवक कशी होती? कांद्याला कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक दर मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Soybean Market: सोयाबीनचे भाव टिकतील की कमी होतील? | Agrowon

    सोयाबीनच्या दरात सकाळपासूनच चढ उतार पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात झालेली सुधारणा आज दुपारपर्यंत कमी झाली. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत जवळपास एक टक्क्याने कमी झाले होते. मग आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचे वायदे कितीवर होते? देशात सोयाबीनला काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market: तुरीचे भाव आणखी किती काळ टिकून राहतील? | Agrowon

    देशात तुरीचे भाव वाढलेले आहेत. आता सणांचा काळ सुरु होणार आहे. तूर डाळीचे भावही महागल्याने सरकार बाजारावर लक्ष ठेऊन आहे. सणांच्या काळात तूर डाळीचे भाव वाढल्यास सरकार स्टाॅकमधील तूर मिलर्सना विकू शकते. सरकारने काही राज्यांमध्ये स्टाॅकमधील तूर विकण्यास सुरुवातही केली आहे. मग सरकारने आतापर्यंत किती तूर आयात केली? तुरीला आज काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Tomato Market: देशातील बाजारात टोमॅटो आवक कशी होतेय? | Agrowon

    टोमॅटोच्या दरातील तेजी बाजारात नवनवीन उच्चांक गाठत आहे. टोमॅटोच्या भावात झालेली वाढ केवळ टिकूनच नाही तर दरात सतत वाढ दिसून येत आहे. बाजारातील आवक कमी असल्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. मग सध्या टोमॅटोला काय भाव मिळतोय? बाजारात टोमॅटोची आवक कशी होतेय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    5 min
  • Tur Market: तुरीचे भाव टिकून राहतील का? | Agrowon

    देशातील बाजारात तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. तुरीला सध्या प्रति क्विंटल ९ हजार ते साडे १० हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशात यंदा तुरीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि ब्राझिलमध्ये तूर उत्पादन घेण्याचे नियोजन व्यापारी संघटनेने केले आहे. मग याचा तुरीच्या भावावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • कीटकनाशकाच्या बाटलीचा दिल्ली ते गल्लीपर्यंतचा प्रवास| Journey of a bottle of insecticides| Agri Unplugged

     प्रयोगशाळेत किंवा फॅक्टरीत कीटकनाशकाची बाटली तयार झाल्यानंतर ती शेतकऱ्यांच्या हातात पडेपर्यंतचा प्रवास खूप लांबलचक आहे. या बाबतीत जगात सगळ्यात जास्त लालफितीचा कारभार भारतात आहे. या लांबलचक प्रवासात चार आण्याची कोंबडी बारा रुपयांपर्यंत महागते. सरकारी फाईलींवर ठेवलेल्या वजनांसह, कंपन्यांनी विक्रेत्याला थाईलंडमधे दिलेल्या मसाजचे बिल देखील शेतकऱ्याच्या खात्यातूनच वजा होते.   

    After a bottle of insecticide is produced in a laboratory or factory, it is a long journey till it reaches the hands of the farmer. Red tape is the main cause of the delay. Price of the products escalates in this long journey. Ultimately the farmer has to pay the cost.

    9 min
  • Turmeric Market: हळदीचे वाढलेले भाव टिकतील का? | Agrowon

    देशातील बाजारात हळदीचे दर सध्या तेजीत आहेत. हळदीचे भाव प्रतिक्विंटल १० हजार रुपयांच्या दरम्यान पोचले आहेत. तर वायद्यांमध्ये हळद तेजीत आहे. हळदीच्या दरातील ही तेजी टिकेल का? हळद आवकेची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट शेतमार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Soybean Market: सोयाबीन दराला कशामुळे आधार मिळू शकतो? | Agrowon

    आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये कालपासून सुधारणा सुरु आहे. देशात मात्र सोयाबीनचे भाव दबावात आहेत. सोयाबीनचा भाव मागील दोन महिन्यांपासून स्थिर दिसतो. मात्र सध्या देशातील सोयाबीन पेरणी पिछाडीवर आहे. पाऊसमानही कमी आहे. मग या सर्व स्थितीचा सोयाबीन बाजारावर परिणाम दिसेल का? सोयाबीनची भावपातळी बदलेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Cotton Market: कापसाला आज काय भाव मिळाला? | Agrowon

    आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस बाजारात काहीसे चढ उतार सुरु आहेत. तर देशात कापूस बाजार स्थिरच दिसतो. देशात मागील तीन महिन्यांपासून कापूस भाव दबावात होते. मग आज कापसाला काय भाव मिळाला? कापूस बाजारावर कोणत्या घटकांचा परिमाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

     

    6 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…