Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Chana Market: नाफेड कमी भावात हरभरा विकणार का? | Agrowon

    हरभरा बाजारात सध्या नाफेडच्या हरभरा विक्रीचा मुद्दा चर्चेला येत आहे. नाफेडची खेरदी आता २३ लाख टनांपर्यंत पोचली. विशेष म्हणजे नाफेडची खेरदी इतिहासातील दुसरी विक्रमी खरेदी झाली. पण बाजारात मात्र भाव ६०० ते ८०० रुपयाने कमी राहिले. मग नाफेडची खरेदी चांगली होऊनही बाजाराला आधार का मिळाला नाही? खुल्या बाजारात सध्या हरभऱ्याला काय भाव मिळत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • भुईमुगाच्या शेंगा आणि कॅडबरी| Groundnut and Cadbury| Agri Unplugged

    शेवटी भुईमुगाचे उत्पन्न इतके घटले की एकरी चार पोत्यांवर आले. भुईमुग काढणीच्या वेळी मजुर मिळेना.ऐन काढणीच्या वेळी पावसामुळे घरच्यांची तारांबळ उडायला लागली.भुईमुगाचा पाला जनावरे आवडीने खातात.तोही पावसात भिजल्यामुळे सडू लागला.एकूण काय तर लागोपाठ काही वर्षे भुईमुग शेती तोट्यात जाऊ लागली.घरचे बियाणे मोडले.आपल्याकडच्या डॉक्टरांनी कोलेस्ट्रॉलचा बागुलबुवा केला.लोकांनी शेंगदाणा तेलाचा धसका घेऊन सोयाबीन तेल वापरायला सुरुवात केली.

    Finally the yield of groundnut crop fell to four bags per acre. Due to unavailability of labourers groundnut harvesting became problematic. Rains at the time of harvest make kaos. Groundnut leaves, which are eaten by animals,  also started to rot due to getting wet in the rain. In general, groundnut farming became a loss making affair. People, overcautious for cholesterol, started preferring Soybean oil over Groundnut oil. Over the period of time groundnut is replaced by Soybean.

    AUTHOR NAME: Shankar Bahirat

    7 min
  • Tur Market: तुरीच्या भावातील तेजी आता टिकेल का? | Agrowon

    काही बाजारांमध्ये तुरीच्या भावाने ११ हजारांचा टप्पा गाठला होता. तर खुल्या बाजारात तूर डाळीचे भाव १५० रुपयांवर पोचले होते. निवडणुकीच्या तोंडावर तुरीच्या भावातील तेजी सरकारला परवडणारी नव्हती. त्यामुळे सरकारने तुरीवर स्टाॅक लिमिट लावले, असे व्यापारी सांगत आहेत. पण या स्टाॅक लिमिटचा तुरीच्या भावावर काही परिणाम होतोय का? तुरीचे भाव सध्या काय आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Chana Market: हरभरा बाजारावर मंदीचे सावट कायम? | Agrowon

    देशातील बाजारात हरभरा आवक आता कमी झाली. नाफेडच्या केंद्रांवरही हरभरा खरेदीची गती मंद झाली. सध्या नाफेडने २३ लाख टनांपर्यंत हरभरा खरेदी केला. मागील काही दिवसांमध्ये काही बाजारात हरभरा दरात सुधारणा दिसली. मग हरभरा दरातील ही सुधारणा टिकेल का? हरभरा बाजारात तेजीची शक्यता आहे का? नाफेडच्या खेरदीचा बाजाराला आधार मिळेल की दबाव वाढेल? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Turmeric Market: हळदीचे दर पुन्हा वाढतील का? | Agrowon

    देशातील बाजारात हळदीचे भाव सध्या नरमले आहेत. वायद्यांमधील सुधारणेमुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांमध्ये बाजार समित्यांमध्येही दरवाढ झाली होती. दरात वाढ झाल्यानंतर देशात ५ ते ६ लाख टन हळदीची विक्री झाली. पण हळदीच्या भावातील सुधारणा जास्त दिवस टिकली नाही. सध्या हळदीचे भाव दबावात आले आहेत. मग सध्या हळदीला काय भाव मिळत आहे? हळदीचा पुरवठा कसा होतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Ginger Market: आल्याला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowon

    आल्याच्या दरातील वाढ गेल्या दोन महिन्यांपासून टिकून आहे. यंदा पाऊस आणि कडी-रोगामुळे आले उत्पादनात मोठी घट झाली होती. तर बाजारातील मागणी कायम आहे. त्यामुळे चालू हंगामात आले पिकाला गेल्या १० वर्षांतील चांगला भाव मिळत आहे. मग सध्या आल्याला काय भाव मिळत आहे? आले दरातील तेजी पुढील काळात टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतकमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Onion Market: कांदा आवकेचा दबाव दूर होणार का? | Agrowon

    यंदा कांदा उत्पादनाला मोठा फटका बसला. तर कांद्याची टिकवणक्षमताही कमी झाली. एरवी पाच ते सहा महीने कांदा टिकत होता. पण यंदा बहुतांशी कांद्याची टिकवणक्षमता ३ महीन्यांपेक्षा जास्त नसेल. त्यातच नाफेडने कांदा खेरदी सुरु केली. बांगलादेशने निर्यातीवरील निर्बंध काढले. या सर्व परिस्थितीचा कांदा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? कांद्याचा बाजार कसा आहे? कांदा भावात पुढील काळात सुधारणा होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    7 min
  • Tur Market: देशात तुरीचा पुरवठा सरकार वाढवू शकते का? | Agrowon

    तुरीच्या दरातील तेजी कमी करण्यासाठी सरकारने स्टाॅक लिमिट लावले. पण स्टाॅक लिमिट लावल्यानंतर त्याचा बाजारांवर फारसा परिणाम जाणवला नाही. काही बाजारांमध्ये दरात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची नरमाई आली. पण ही नरमाई सरसकट नव्हती. मग तुरीला सध्या काय भाव मिळतोय? पुढील काळात तुरीचा बाजार कसा राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • शेती यांत्रिकीकरणाचा जुगाड| Jugad in farm mechanisation| Agri Unplugged

    शेतीचे काम करताना काही तरी जुगाड करायला लागणे हे अजिबात प्रगतीचे लक्षण नाही. बहुतेक जुगाड हास्यास्पद असतात. गंमत म्हणून पेपरमध्ये, टीव्हीवर, सोशल मिडीयावर व्हायरल होतात. समाजाच्या मनोरंजनाचा भाग बनतात. 

    The labour shortage is a burning issue in Agriculture. Mechanization is required to tackle this problem. But instead of innovations and original research ideas, there is a popular trend of Jugad. But this is not a sign of progress at all. Most of the Jugads are ridiculous. But they go viral in print, electronic and social media. It has become a part of entertainment.

    11 min
  • Kabuli Chana Market: काबुली हरभरा बाजार कसा राहील? | Agrowon

    देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन घटले. काबुली हरभऱ्याला यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसला. त्यामुळं उत्पादकता कमी राहीली. यंदा सरकारने देशात ४ लाख ५० हजार टन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता. पण उत्पादन ४ लाख टनांच्या आतच स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील आवक आता कमी झाली. मग याचा दरावर काही परिणाम दिसत आहे का? काबुली हरभऱ्याला सध्या काय भाव मिळत आहे? आंतरराष्ट्रीय बाजारात काय स्थिती आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…