Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Kabuli Chana Market: काबुली हरभऱ्याला काय भाव मिळतोय? | Agrowon

    आंतरराष्ट्रीय बाजारात काबुली हरभऱ्याचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. जगातील महत्वाचा काबुली हरभरा उत्पादक आणि निर्यातदार देश असलेल्या मेक्सिकोमध्ये सध्या वाढत्या तापमानाचा पिकाला फटका बसतोय. त्यामुळे मेक्सिकोतून यंदा काबुली हरभऱ्याची निर्यात घटण्याची चिन्हे आहेत. या स्थितीचा भारताला फायदा होईल का? काबुली हरभऱ्याचे भाव काय राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या  शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Maize Market: बाजारातील मका आवक कशी सुरु आहे? | Agrowon

    देशातील बाजारात सध्या मक्याचे भाव दबावात आहेत. मक्याला मागील काही दिवसांपासून हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहेत. खरिपातील मक्याला यंदा चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे रब्बीतील मकाही चांगला भाव खाईल, अशी शक्यता होती. पण सध्या भाव दबावात आहेत.मग मक्याच्या भावावर कशाचा दबाव आला? सध्या मक्याला काय भाव मिळतोय? मक्याचे भाव वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • मुखत्यारपत्र करताना काय काळजी घ्यावी?| Precautions to be taken while giving power of attorney?|Agri Unplugged

    कोणत्याही दस्तऐवजावर सही करण्यापूर्वी त्याचा काय अर्थ होतो हे व्यवस्थित तपासले पाहिजे. विशेषत: मुखत्यारपत्रासारखा दस्तऐवज तिऱ्हाईत व्यक्तीच्या नावे करताना अतिशय काळजी घेतली पाहिजे.

    Before signing any document, one should carefully check what it means. Special care should be taken when signing a document like a power of attorney in the name of a third party.

    4 min
  • Tur Market: तुरीची आयात सरकारच्या उद्दीष्टापेक्षा कमीच होणार | Agrowon

    देशातील तूर उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात घटले. यंदा सरकारचे १० लाख टन आयातीचे उद्दीष्ट असले तरी गेल्यावर्षीपेक्षा जास्त आयात होण्याची शक्यता कमीच असल्याचे आयातदार सांगत आहेत. म्हणजेच यंदा देशात तुरीचा तुटवडा राहणार आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीत आहेत. पण तुरीच्या दरातील तेजी पुढील काळात टिकेल का? सध्या तुरीला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Chana Market: हरभरा भावपातळी सध्या काय आहे? | Agrowon

    नाफेडने यंदा ८ राज्यांमध्ये हरभरा खरेदी केला. जवळपास ९ लाख शेतकऱ्यांकडून १० हजार ८०० कोटींचा हरभरा खरेदी झाला आहे. तर आतापर्यंत मध्य प्रदेशात सर्वाधिक खेरदी केली. मध्य प्रदेशातील हरभरा खरेदीने ७ लाख ७३ हजार टनांचा टप्पा पार केला. मग महाराष्ट्रातील हरभरा खरेदीने कितीचा टप्पा गाठला? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market: तूर बाजारात आवक वाढेल का? | Agrowon

    तुरीचे भाव सध्या तेजीत आहेत. देशात सध्या तूर डाळीला चांगला भाव मिळत आहे. लग्न सराई आणि सण समारंभामुळे तुरीच्या डाळीला उठाव आहे. पण सरकार उद्योगांवर दबाव ठेऊन आहे. सरकारला तुरीचे भाव कमी करायचे आहे. तर उद्योगांना गरजेप्रमाणेही तूर मिळत नसल्याचे उद्योगांच्या वतीने सांगण्यात आले. मग सध्या तुरीला काय भाव मिळतोय? तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

     

    6 min
  • Wheat Market: गव्हाचे भाव यंदाही वाढणार का? | Agrowon

    यंदा नाफेडने ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवले होते. सरकारला आतापर्यंत २५९ लाख टन खरेदी करता आली. तर यंदा सरकारची खरेदी २६० ते २७० लाख टनांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. मग सरकारची खरेदी यंदाही उद्दीष्टापेक्षा कमी का राहणार आहे? सध्या गव्हाला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Maize Market: मक्याच्या भावात सुधारणा होईल का? | Agrowon

    देशातील बाजारात मक्याची आवक सध्या वाढत आहे. मका उत्पादक पट्यातील बाजारात मका आवकेचा दबाव वाढत आहे. पण सध्या मक्याची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. मक्यातील ओलावाही कमी झाला. परिणामी मक्याचे भाव टिकून आहेत. मग सध्या मक्याला काय भाव मिळतोय? बाजारातील आवक कशी सुरु आहे?  याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market: तुरीला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowon

    बाजारात सध्या तुरीला गरजेप्रमाणे उठाव मिळत आहे. देशात यंदा तुरीचे उत्पादन कमी असल्याने दरात तेजी आहे. देशातील बाजारात सध्या तुरीला प्रतिक्विंटल ८ हजार ते ९ हजार १०० रुपयांचा भाव मिळतोय. तूर डाळीचे भाव अनेक बाजारात सध्या १३० रुपये प्रतिक्विंटलवर आहेत. पुढील काळात तुरीच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीचे दर कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. मग खरचं तुरीचे दर कमी होतील का? तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • वृक्षशेतीचा पर्याय फायदेशीर ठरेल|Tree plantation will be beneficial than seasonal crops| Agri Unplugged

    हवामानबदलामुळे वादळे आणि अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हंगामी पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्या शेतकऱ्यांनी हंगामी पिकांऐवजी वृक्षलागवडीचा पर्याय निवडणे योग्य ठरेल. 

    Climate change has increased the frequency of storms and unseasonal rains. It causes a huge loss of seasonal crops. Therefore, those farmers who can afford it would be wise to opt for tree planting instead of seasonal crops.

    8 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…