Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Tur Market: तुरीच्या दरातील तेजी किती दिवस टिकेल? | Agrowon

    देशातील बाजारातील चर्चा सध्या तुरीभोवती फिरत आहे. यंदाही भाव दबावात ठेवण्याच्या सरकारच्या मनसुब्यावर यंदा तुरीने पाणी फेरले. सरकारने व्यापारी, स्टाॅकिस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांवर दबाव वाढवला. तरीही तुरीच्या दरातील तेजी कमी झाली नाही. त्यामुळे सरकार स्वतः तुरीची आयात करू शकते, असा इशारा अन्न सचिवांनी दिला होता. मग सरकारला खरचं स्वस्त तूर आयात करता येईल का? सरकारला स्वस्त तूर मिळू शकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Chana Market: हरभरा बाजारात आवक कशी होतेय? | Agrowon

    देशातील बाजारात हरभरा सध्या दबावात आहेत. बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी आहे. पण सरकारच्या धोरणांचा बाजारावर दबाव असल्याचे व्यापारी सांगत आहेत. खुल्या बाजारात सध्या हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहेत. मग सध्या हरभरा बाजारात काय स्थिती आहे? हरभऱ्याला सध्या काय भाव मिळतोय? बाजारातील आवक कशी आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Onion Market: कांदा भाव शेतकऱ्यांना परवडत आहेत का? | Agrowon

    देशातील बाजारात रब्बी हंगामातील कांदा आवक वाढत आहे. पण कांद्याला पावसाचा फटका बसत आहे. देशभरातील कांदा उत्पादक पट्ट्यात पाऊस पडत आहे. ऐन कांदा काढणीच्या काळात पाऊस दणका देत असल्याने कांद्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतोय. कांद्याची गुणवत्ता कमी झाल्याचा फटका दराला बसतो. मग सध्या कांद्याला काय भाव मिळत आहे? पुढील काळात कांद्याचे भाव वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market: निर्यातदार देशांमध्ये तुरीचे भाव का वाढले? | Agrowon

    देशात यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे केंद्र सरकार आयातीवर जोर देत आहे. पण भारताची गरज लक्षात घेऊन आफ्रिका आणि म्यानमार या देशांमध्येही तुरीच्या दरात वाढ झाली. मग आयात तुरीचे दर काय आहेत? देशाती तुरीला सध्या काय भाव मिळतोय? तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    7 min
  • Chana Market: हरभरा बाजारात आवक कशी सुरु आहे? | Agrowon

    नाफेडच्या हरभरा खरेदीचा वेग मागील चार दिवसांपासून कमी झाला. या काळात नाफेडने देशभरात केवळ दोन लाख टनांच्या दरम्यान हरभरा खरेदी केल्याचं दिसतं. नाफेडने चालू हंगामातही हरभऱ्याची चांगली खरेदी केली. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मग खुल्या बाजारात हरभऱ्याला काय भाव मिळतोय? नाफेडने किती हरभरा खरेदी केला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    7 min
  • Ginger Market: आल्याच्या दरातील तेजी टिकेल का? | Agrowon

    आल्याच्या दरात सध्या तेजी आली आहे. मागील काही वर्षे उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात विकल्या जाणाऱ्या आले पिकाने यंदा शेतकऱ्यांना दिलासा दिला. आल्याच्या भावाने अनेक बाजारांमध्ये १० वर्षांतील उच्चांकी भावाचा टप्पा गाठलेला दिसतो. मग सध्या आलेल्या काय भाव मिळतोय? आल्याचे दर तेजीत का आले? आल्याच्या दरातील तेजी टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी हातात रूमणेच घ्यावे?|First registered farmer suicide| Agri Unplugged

    साहेबराव करपे यांनी कुटुंबासह जीवन संपवलं, त्याला ३७ वर्षे पूर्ण झाली. कृषिसंस्कृती हाच जिथल्या जगण्याचा मुख्य आधार आहे त्या महाराष्ट्रात अधिकृतपणे नोंदली गेलेली ही पहिली ‘शेतकरी आत्महत्या’. त्यानंतर ३७ वर्षे शेतकरी आत्महत्यांच्या नोंदी वाढतच गेल्या. समाज म्हणून आपण या सगळ्याकडं कसं बघायला हवं? 

    Sahebrao Karpe ended his life with his family 37 years ago. This is the first 'farmer suicide' officially recorded in Maharashtra where agriculture is the primary source of livelihood. The issue of farmers' suicide has been further aggravated. How should we as a society look at all this?

    AUTHOR NAME: Balaji Sutar

    9 min
  • सोयाबीन बाजाराचं लक्ष ब्राझीलकडे का? | Agrowon

    ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन विक्रमी पातळीवर पोचल्यानं सोयाबीन बाजारातील समिकरणच बदललं. ब्राझीलचं सोयाबीन बाजारात आल्याबरोबर दरावर दबाव आला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात मोठी घट मागच्या माहिनाभरात पाहायला मिळाली. ब्राझील यंदा विक्रमी सोयाबीन निर्यात आणि गाळप करण्याचीही शक्यता आहे. मग सध्या ब्राझीलची सोयाबीन निर्यात कशी सुरु आहे? सोयाबीन बाजाराची स्थिती पुढील काळात कशी राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    7 min
  • Maiz Market: कोणत्या राज्यात मक्याची आवक वाढली? | Agrowon

    देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून मक्याची आवक वाढत आहे. त्यातच अनेक भागात पावसाचीही हजेरी दिसत आहे. सध्या महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील बाजारात आवक वाढतेय. मग सध्या मक्याला काय भाव मिळतोय? मक्याचे भाव सुधारतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Wheat Market: गहू खरेदीचं उद्दीष्ट यंदा पूर्ण होईल का? | Agrowon

    सरकारची गहू खरेदी यंदा वेगाने सुरु आहे. पण खुल्या बाजारात सध्या गव्हाचे भाव हळूहळू सुधारताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर गव्हाच्या दरानं हमीभावाचाही टप्पा पार केला. त्यामुळं गहू उत्पादनात महत्वाच्या उत्तर प्रदेशात शेतकरी खुल्या बाजारातील विक्रीला पसंती देत असल्याचं दिसतं. मग सध्या खुल्या बाजारात गव्हाला काय भाव मिळतोय? यंदा सरकारला खेरदीचं उद्दीष्ट गाठता येईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…