Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Chana Market: पिवळा वाटाणा आयातीमुळे काय होईल? | Agrowon

     भारत सरकार यंदा पिवळ्या वाटाण्याच्या आयातीला परवानगी देण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे आयातदारांचा हिरमोड होताना दिसत आहे. पिवळा वाटाणा हरभऱ्याला पर्याय म्हणूनही पाहिला जातो. मग सरकारला पिवळा वाटाणा आयात का नको? सध्या हरभरा बाजारभाव काय आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Pulses Market: आयातीतून कडधान्याची गरज भागेल का? | Agrowon

    देशात सध्या तूर, मूग आणि उडदाचे दर तेजीत आहेत. तर बाजारात हरभरा आणि मसूरची आयात सुरु आहे. सध्या हरभरा आणि मसूर हमीभावापेक्षा कमी पातळीवर आहेत. पण निम्म्या अधिक कडधान्याचे भाव तेजीत असल्यानं सरकारचा आयातीवर जोर आहे. पण २०२२-२३ च्या हंगामात भारताची कडधान्य आयात कमी झाली. मग तूर आणि हरभरा आयातीचं चित्र कसं राहीलं? आयात कशामुळं कमी झाली? याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Soybean Market: बाजारातील सोयाबीन आवक कायम | Agrowon

    ब्राझीलमध्ये यंदा सोयाबीन उत्पादनात मोठी वाढ झाली. पण अर्जेंटीनात उत्पादन कमी झालं. पण ब्राझीलनं ती कसर भरून काढली. अर्जेंटीनाच्या सोयाडाॅलर धोरणामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार दिसत आहेत. तर देशातील बाजारात दर स्थिर आहेत. मग सोयाबीन दराची स्थिती काय आहे? सोयाबीनची भावपातळी कितीवर पोचली? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Red Chilli Market: लाल मिरचीला निर्यातीसाठी मागणी वाढली | Agrowon

    देशातील बाजारात गेल्या काही दिवसांपासून लाल मिरचीच्या दरात मोठी तेजी आहे. यंदा देशातील लाल मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली. गेल्या हंगामात देशात १८ लाख ३० हजार टन उत्पादन होते. मात्र यंदा पाऊस आणि कीड-रोगामुळं मिरची उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. निर्यातही जोमाने सुरु आहे. मग सध्या लाल मिरचीला काय दर मिळतोय? पुढील काळात लाल मिरचीचे दर कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Chana Market: शेतकऱ्यांची हरभरा विक्री कशी सुरु आहे? | Agrowon

    देशातील हरभरा बाजारत सध्या काहीसे चढ उतार दिसत आहेत. आज सरासरी गुणवत्तेच्या हरभरा दरात अनेक बाजारांमध्ये क्विंटलमागं ५० रुपयांची नरमाई दिसली. तर चांगल्या गुवत्तेचा हरभरा टिकून आहे. रमजान महिन्याची हरभरा मागणी आता कमी होत आहे. तसचं लग्नसराईसाठी पुढील दोन महिन्यांचाच कालावधी समजला जातो. त्यामुळं उठाव कमी राहण्याचा अंदाज आहे. मग या काळात हरभरा बाजार कसा राहील? दरात सुधारणा होऊ शकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market: तूर व्यापारी, स्टाॅकिस्टवर सरकारचा दबाव ? | Agrowon

    केंद्र सरकार तुरीच्या बाजारावर लक्ष ठेऊन आहे. सरकारने तुरीच्या स्टाॅकबाबत कठोर भुमिका घेतलीय. सरकार व्यापारी, स्टाॅकिस्ट, मिलर्स आणि आयातदारांना आपल्याकडील स्टाॅकची माहिती देण्याच्या सूचना देत आहे. चुकीची माहिती दिल्यास कारवाई करण्याचाही इशाराही सरकारनं दिलाय. मग या सर्व घडामोडींचा तूर बाजारावर काय परिणाम होतोय? तुरीला सध्या काय भाव मिळतोय? पुढील काळात तूर बाजार कसा राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • फ्रान्सचा राजा बटाटे चोरीला उत्तेजन द्यायचा | How is potato popularised in europe? | Agri Unplugged

    युरोपात बटाटा हे पशुखाद्य समजलं जात असे. अनेक युरोपिय देशात बटाटे खाण्यावर बंदीच होती. बटाटा हे फळ नाही तर जमिनीखाली वाढणारं खोड आहे, हे अनेक वर्षं युरोपला ठाऊकच नव्हतं.बटाटे कच्चे खायचे नसतात तर उकडून, सोलून खायचे असतात हे सुध्दा त्यांना माहित नव्हतं.

    Potatoes were considered animal feed in Europe for several years. There was a ban on eating potatoes in many European countries. Europe was unaware that potato is not a fruit and it should not be consumed raw.

    AUTHOR NAME: Sunil Tambe

    5 min
  • Soybean Market: स्टाॅक असतानाही खाद्यतेल आयात का वाढली? | Agrowon

    मागील वर्षभरापासून देशात खाद्यतेल आयातीचा लोंढा सुरु आहे. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन आणि मोहरी उत्पादकांना बसतोय. मागील पाच महिन्यांमध्ये भारतानं जवळपास ७० लाख टन खाद्यतेलाची आयात केली. मग याचा नेमका कसा परिणाम देशातील खाद्यतेल आणि तेलबिया बाजारावर जाणवतोय? शेतकरी आणि उद्योगांची मागणी काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Chana Market: हरभरा दरात सुधारणा होणार का ? | Agrowon

    देशात सध्या हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा कमीच आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी नाफेडला विक्री करण्याचं उद्दीष्ट बाळगून आहे. शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा देण्यासाठी माल मागं ठेवला. यामुळं खुल्या बाजारातील हरभरा आवक काहीशी कमी दिसते. दुसरीकडे नाफेडची खरेदीही ७ लाख टनांवर पोचली. पण हरभरा दर मात्र दबावातच का आहेत? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Maize Market: रब्बीत मका उत्पादन वाढणार का? | Agrowon

    देशातील बाजारात रब्बी हंगामातील मका दाखल होतोय. बिहार आणि मध्य प्रदेशात मक्याची आवक वाढत आहे. पावसाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांना मका वाळविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळं काही शेतकरी मका काढणीनंतर लगेच विक्री करत आहेत. मग याचा मक्याच्या बाजारावर काय परिणाम होतोय? सध्या मक्याचे दर काय आहेत? पुढील काळात मक्याचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…