Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • कृषी निविष्ठाच्या मागणीत वाढ होणार?

    आयएमडीने काल  २०२३ सालासाठीचा पावसाचा अंदाज जाहीर केला. यंदा सलग पाचव्या वर्षी देशात सरासरीइतका पाऊस होईल, असं हा अंदाज सांगतो. त्याची बाजारात लगेच प्रतिक्रिया उमटली. पण तरीही कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांनी म्हणजे खते, बियाणे, कृषीरसायने उत्पादक कंपन्यांनी सावध पवित्रा का घेतलाय? निविष्ठांची मागणी वाढेल की घटेल, याबद्दल त्यांना काय वाटतंय? जाणून घेऊया मार्केट बुलेटिनच्या शेवटी.  
    The IMD released the rainfall forecast for the year 2023 yesterday. This forecast says that for the fifth year in a row, there will be average rainfall in the country. It got an immediate reaction in the market. But still, why are agricultural input manufacturing companies i.e. fertilizer, seed, agrochemical manufacturing companies taking a cautious stance? What do they think about whether demand for inputs will increase or decrease? Let's find out at the end of the market bulletin.

    8 min
  • तुरीचा हमीभाव वाढवण्यासाठी व्यापाऱ्याचे केंद्र सरकारला साकडे!

    तुरीचे दर वधारल्यामुळे सरकार धास्तावलंय. तुरीचे दर पाडण्यासाठी सरकारचा आटापिटा सुरू आहे. परंतु मुळात उत्पादनच कमी असल्यामुळे दर टिकून आहेत. अशा परिस्थितीत येत्या वर्षभरात तुरीचा पुरवठा आणखी रोडावेल, अशी भीती व्यापारी आणि डाळमिल चालकांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी चक्क शेतकऱ्यांची बाजू घेत सरकारकडे काही मागण्या केल्यात. काय आहेत या मागण्या ते पाहूया मार्केट बुलेटिनच्या शेवटी.

    The government has panicked due to the increase in the price of tobacco. The government is struggling to bring down the rates of tobacco. But basically because the production is less, the prices are sustained. In such a situation, the traders and dal mill operators are afraid that the supply of turi will be more difficult in the coming year. Therefore, they have made some demands to the government taking the side of the farmers. Let's see what these demands are at the end of the market bulletin.

    8 min
  • Chana Market: नाफेडच्या खरेदीमुळं हरभरा बाजार स्थिर | Agrowon

    देशात नाफेडकडून हरभऱ्याची खरेदी वेगाने सुरु आहे. त्यातच मागील हंगामातील हरभरा साठाही मोठ्या प्रमाणात आहे. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर असल्याने नाफेडला हरभरा विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.  रमजान आणि लग्नसराईचा काळ संपल्यानंतर हरभऱ्याला उठाव कमी राहण्याची शक्यता आहे. मग आगामी काळात हरभरा बाजार कसा राहील? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? नाफेडने आतापर्यंत किती हरभरा खरेदी केला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • अमेरिकी कापसाने भारताचा देशी कापूस संपवला| Rise of American cotton in India| Agri Unplugged

    अमेरिकेतील गॉसिपियम हिर्सुटम आणि गॉसिपियम बार्बाडेन्सी या कापसाच्या जातींची जगाला माहिती होईपर्यंत जगात जे सुती कापड वापरले जाई ते भारतातल्या देशी किंवा जरिला कापूस (गॉसिपियम हर्बेशियम) आणि देवकापूस (गॉसिपियम आर्बोरियम) या जातींच्याच सुतापासून बनविले जात असे. 

    Indian cotton varieties such as Jarila cotton (Gossypium Herbaceum) and Dev Kapus (Gossypium Arboreum) were popular across the world until the rise of American cotton varieties viz. Gossypium Hirsutum and Gossypium Barbadense.

    AUTHOR NAME: डॉ. आनंद कर्वे

    8 min
  • Onion Market: बाजारांमध्ये रब्बी कांद्याचे दर स्थिर | Agrowon

    राज्यातील महत्वाच्या बाजारांमध्ये कांदा आवकेचा दबाव सध्या कमी दिसतो. राज्यातील अनेक कांदा उत्पादक पट्ट्यात पावसाचा फटका बसतोय. तर रोगांमुळेही नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यंदा लागवड काहीशी अधिक दिसत असली तरी पिकाचे होणारे नुकसान लक्षणीय आहे. मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? कांदा आवकेची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    7 min
  • सरकार कुणाच्या भल्यासाठी तूप आणि लोणी आयात करणार?

    दुधाचे दर वाढल्यामुळे खुश झालेल्या शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार घी, बटर यासारख्या उत्पादनांची आयात करण्याच्या विचारात आहे. त्याला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्र लिहून विरोध केलाय. दुधाचा प्रश्न का पेटलाय, मागणी-पुरवठ्याची स्थिती काय आहे, सरकार खरंच शेतकऱ्यांच्या दुधात मिठाचा खडा टाकणार का, दुधाचे दर वाढतील की पडतील, हे जाणून घ्या मार्केट बुलेटिनच्या शेवटी.
    The joy of the happy farmers is likely to fade due to the increase in milk prices. The central government is thinking of importing products like ghee, butter. Former Union Agriculture Minister Sharad Pawar has written a letter opposing it. Find out why the milk issue is on fire, what is the demand-supply situation, whether the government will really put salt in the milk of farmers, whether milk prices will rise or fall, at the end of the market bulletin.

    7 min
  • Maize Market: पाकिस्तानचा मका सध्या भारतापेक्षा स्वस्त | Agrowon

    पाकिस्तान सध्या भारतापेक्षा कमी दरात मका निर्यात करतोय. त्यामुळं आशियातील काही देश पाकिस्तानच्या मक्याला पसंती देत आहेत. देशात यंदा विक्रमी मका उत्पादन होण्याचा अंदाज आहे. रब्बीतील पिकाची स्थितीही चांगली आहे. रब्बीतील मक्याची बाजारातील आवक हळूहळू वाढत आहे. मग सध्या पाकिस्तान आणि भारतातील मक्याचे भाव काय आहेत? यंदा निर्यातीची स्थिती काय राहील? सध्या मक्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Kabuli Chana Market: देशातील काबुली हरभरा उत्पादनात मोठी घट | Agrowon

    जागतिक पातळीवर मागील सात महिन्यांपासून काबुली हरभऱ्याची टंचाई आहे. काबुली हरभऱ्याने विक्रमी दराचा टप्पा गाठला होता. त्यामुळे चालू हंगामात काबुली हरभरा लागवडीत ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सहाजिकच लागवड वाढल्याने बंपर उत्पादन होईल, असा अंदाज होता. पण पावसाने मोठा फटका बसला. मग देशातील उत्पादन कसं राहील? आंतरराष्ट्रीय बाजारातील टंचाई किती काळ राहील? पुढील काळात काबुली हरभऱ्याचे भाव कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market: तुरीचे उत्पादन घटल्याने शेतकरी बरोबरीतच | Agrowon

    मागील हंगामात शेतीमाल बाजारात कडधान्यांचे दर दबावात होते. मात्र यंदा कडधान्यांचे दरही वाढताना दिसातात. कडधान्यातील तेजीचं नेतृत्व तूर करताना दिसत आहे. तुरीचे दर तेजीत असल्याने महागाई वाढत असल्याची ओरड सध्या केली जात आहे. पण शेतकऱ्यांचा विचार केला तुरीतील तेजीत तेवढी फायदेशीर ठरताना दिसत नाही. मग शेतकऱ्यांसाठी तुरीचं गणित कसं आहे? सध्या तुरीला काय भाव मिळतोय? तुरीच्या दरातील तेजी किती दिवस टिकेल? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Chana Market : उत्पादनातील घटीचा हरभरा दराला आधार

    हरभरा हे रब्बी हंगामातलं प्रमुख पीक आहे. पण यंदा हंगामाच्या सुरूवातीपासूनच दर दबावात आहेत. प्रतिकूल हवामानामुळे हरभरा पिकाला मोठा फटका बसलाय. सध्या हरभऱ्याच्या दरात सुधारणा झालेली दिसतेय. हे दर टिकून राहतील की दरात पुन्हा घसरण होईल? पाहूयात मार्केट बुलेटिनमधून.
     Gram is the main crop of the Rabi season. But this year the rates are under pressure from the beginning of the season. The gram crop has been hit hard due to adverse weather conditions. At present, the price of gram seems to have improved. Will these rates hold or will rates fall again? Let's see from the market bulletin.

    8 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…