Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • खोबरेल तेलाच्या साबणाला सगळ्यात जास्त फेस का? | Soap made by coconut oil has special characters | Agri Unplugged

    भारतात नारळाशिवाय, भुईमूग, मोहरी, सोयाबीन, करडी, सूर्यफूल, तीळ, जवस, कारळा, सरकी, एरंडी, भाताचा कोंडा यांसारख्या कृषिजन्य स्रोतांशिवाय करंज, कडुलिंब, मोह, उंडी, जट्रोफा, पिसा, गेळा, साल, पिलू, कोकम, यांसारख्या कृषिबाह्य स्रोतांपासूनही तेल काढले जाते. पण कारखान्याच्या व्यवस्थापनात कच्च्या मालाची अशी हंगामी उपलब्धता परवडत नाही 

    In India, oil is extracted from agricultural sources such as Coconut, Groundnut, Mustard, Soybean, Safflower, Sunflower, Sesum, Karala, Rice bran, Castor etc. and from non agricultural sources such as Neem, Karanj, Jatropha, Kokam etc. 

    Author Name: डॉ. आनंद कर्वे

     

    9 min
  • Tur Market: तुरीचे भाव कितीवर पोचले? | Agrowon

    तुरीचे दर तेजीत असल्याने सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. सरकारने तुरीचा नेमका किती स्टाॅक आहे याच्या माहितीसाठी आणि हा स्टाॅक बाजारात आणण्यासाठी व्यापारी, आयातदार, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादार यांच्यावर दबाव वाढवला आहे. त्यामुळे तुरीचा व्यापार मर्यादीत होत आहे. पण बाजारातील आवकही कमी असल्याने तुरीचे दर टिकून आहेत. मग सध्या तुरीला काय भाव मिळतोय? तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकार आणखी काय करु शकते? आणि त्याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Kabuli Chana Market: देशातून काबुली हरभरा निर्यात दुप्पट झाली | Agrowon

    जागतिक पातळीवर काबुली हरभऱ्याला सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे देशातून काबुली निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढली. देशात काबुली हरभरा पिकावर बदलते वातावरण आणि पावसाचा परिणाम झाला. यंदा देशातील उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. मग पुढील काळात बाजारातील आवक वाढल्यानंतर दर कसे राहतील? निर्यात टिकून राहील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    7 min
  • Turmeric Market: हळदीला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowon

    देशात हळदीला उठाव कमी आहे. त्यामुळे हळदीचे दरात मोठी नरमाई आली होती. पण देशातून हळद निर्यात १० टक्क्यांनी वाढली आहे. निर्यात वाढल्याने दरातील नरमाई काहीशी थांबली. मात्र हळदीचे अद्यापही गेल्यावर्षीपेक्षा क्विंटलमागं एक हजार रुपयांनी कमीच आहेत. मग सध्या हळदीला काय भाव मिळतोय? आवक वाढल्यानंतर हळदीच्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती  तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Chana Market: नाफेडच्या खरेदीचा हरभऱ्याला आधार आहे का? | Agrowon

    हरभरा उत्पादकता घट्ल्याचं शेतकरी सांगत आहेत. तर देशातील बाजारात हरभरा दरात सुधारणा पाहयला मिळतेय. दुसरीकडे नाफेडची खरेदीही सुरु आहे. नाफेडची खरेदी अद्यापही चारच राज्यांमध्ये सुरु आहे. नाफेडच्या खरेदीचा हरभरा बाजाराला आधार मिळतोय. मग बाजारात हरभऱ्याला काय भाव मिळतोय? नाफेडने किती हरभरा खरेदी केला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Maize Market: मक्याचे दर का स्थिरावले? | Agrowon

    रब्बी हंगामात मक्याची लागवड ३ टक्क्यांनी वाढली आहे. त्यातच सुरुवातीच्या काळात पिकाला पोषक हवामान होते. पुढे मात्र उष्णता आणि पावसाचा फटका बसला. पुढील महिन्यात बाजारात मक्याची आवक वाढेल. मागील काही दिवसांपासून मका बाजार स्थिर आहे. मग बाजारात मक्याची आवक वाढल्यानंतर दर कसे राहतील? सध्या मक्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market: तुरीच्या दरातील तेजी वाढेल का? | Agrowon

    देशातील बाजारात तुरीचे दर चांगलेच तेजीत आहेत. बाजार समित्यांमध्ये सध्याचा काळ तसा आवकेचा आहे. पण सध्याची आवक खूपच आहे. त्यातच लग्न सराईमुळे तुरीला चांगला उठाव मिळतोय. तर सरकार बाजारात हस्तक्षेप करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग या काळात तुरीचा बाजार कसा राहू शकतो? सध्या तुरीला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • भुईमुगाच्या शेंगांची ही खासियत ठाऊक आहे का? |Groundnut is wonder nut| Agri Unplugged

    भुईमूग हे सोयाबीनप्रमाणेच फाबेसी कुटुंबातील एक जागतिक महत्त्वाचे पीक असून त्याची लागवड मुख्यतः खाद्यतेलासाठी केली जाते. या वनस्पतीच्या शेंगा जमिनीखाली लागत असल्याने तिच्या नावात भुई हा शब्द वापरला गेला आहे. जमिनीखाली शेंगा किंवा फळे धारण करणा-या इतरही काही वनस्पती आहेत, पण एक पीक म्हणून लागवड केल्या जाणा-या वनस्पतींपैकी जमिनीखाली फळे असलेली भुइमूग ही एकमेव वनस्पती आहे. 

    AUTHOR NAME: डॉ. आनंद कर्वे

    8 min
  • Ginger Market: आले दरात कशामुळे सुधारणा झाली? | Agrowon

    देशात मागील चार महिने आल्याचे दर दबावात होते. आले दराने अनेक वर्षातील निचांकी दराचा टप्पा चालू हंगामात पाहिला होता. आल्याचे भाव निचांकी २ हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षाही कमी झाले होते. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी आले लागवडीकडे पाठ फिरवली होती. पण सध्या आले उत्पादकांना दिलासा मिळताना दिसतोय. दिवाळीनंतर आले दरात काहीशी सुधारणा होत गेली. मग आले दरात नेमकी किती सुधारणा झाली? आले दरातील ही सुधारणा टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market: तूर आयात यंदा खरचं वाढेल का? | Agrowon

    देशातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. देशातील उत्पादन घटल्यानं बाजाराला आधार मिळत आहे. त्यामुळं केंद्र सराकरनं आयात करून पुरवठा वाढवण्याचं उद्दीष्ट ठेवलं. वर्षभरात १० लाख टन तूर आयात केली जाईल, असे केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले. मग खरचं सरकारला एवढी तूर आयात करता येईल का? आफ्रिकेत तूर लागवड आणि पिकाची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…