Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Wheat Market: गहू उत्पादनाला फटका बसल्याचा अंदाज | Agrowon

    वाढलेले गव्हाचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार स्टाॅकमधील गहू विकत आहे. सरकारने भारतीय अन्न महामंडळाच्या माध्यामातून आतापर्यंत ५ टप्प्यांमध्ये लिलाव केले. तर दुसरीकडे गहू पिकाला वाढती उष्णता आणि पावसाचा फटका बसत आहे. मग या स्थितीत गव्हाचे भाव कसे राहतील? गहू हमीभावाचा टप्पा पार करेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    Listen today's market bulletin to know the details. 

    6 min
  • वेळा अमावस्या अर्थात येळवस म्हणजे मातीतला उत्सव |What is Vel Amavasya? Who celebrates it ?| Agri Unplugged

    येळवस हा मातीतला अस्सल उत्सव आहे. वेळामावस्या असेही याला म्हणतात. दर्शवेळा अमावस्येला येळवस असते. कर्नाटकातून आलेला हा उत्सव आहे असे मानले जाते. या दिवशीचा स्वयंपाक वैशिष्ट्यपूर्ण असतो.

    Yelvas or Vel Amavasya is a festival celebrated by farmers. It is also called as Darsh-vela Amavasya. It is believed that the roots of this festival are in Karnataka. The special food is cooked on this day.

    Author Name: बालाजी मदन इंगळे

    7 min
  • Chana Market: हरभरा दर दबावातच का? | Agrowon

    सरकारने यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्या बाजारात हरभऱ्याला ४ हजार २०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. केंद्राने यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. पण यंदा हरभरा उत्पादकता घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. मग या परिस्थितीत हरभरा बाजार कसा राहू शकतो? उत्पादनातील घटीचा दराला आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Soybean Market: सोयाबीन दर सुधारण्यास वाव | Agrowon

    अर्जेंटीनातील उत्पादन घट आणि ब्राझीलमधील विक्रमी उत्पादन यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार दिसत आहेत. पण सरासरी दरपातळी टिकून आहे. भारतात मात्र दर दबावात आहेत. मग आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा देशातील बाजारावर परिणाम होईल का? सोयाबीनचे दर वाढतील का?  याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market: देशात तुरीचा तटवडा जाणवणार? | Agrowon

    देशातील तूर उत्पादन यंदा घटलं. त्यामुळे तुरीचे दर सध्या तेजीत आहेत. पण सरकारही तुरीच्या बाजारावर लक्ष ठेऊन आहे. सरकार तुरीची साठेबाजी आणि नफेखोरी होऊन देणार नाही, असे केंद्रीय अन्न आणि ग्राहक कल्याण विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केले. मग या स्थितीत तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? तुरीला यंदा काय भाव मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधू मिळेल

    6 min
  • Kanda Bajarbhav: नाफेडची कांदा खरेदी फक्त नावालाच | Agrowon

    लाल कांद्याचे उत्पादन वाढल्याने दर दबावात आले आहेत. महाराष्ट्रात नाफेडने कांदा सुरु केली. पण नाफेडची खरेदी केवळ नावापुरतीच सुरु असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. आता नाफेड गुजरातमध्येही कांदा खरेदी सुरु करणार आहे. मग नाफेडच्या कांदा खरेदीचा बाजाराला आधार मिळेल का? कांदा दर पुढील काळात सुधारतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Soybean Market: सरकार तेलबिया उत्पादकांना दिलासा देणार? | Agrowon

    देशात खाद्यतेल आयात वाढल्याने सोयाबीन आणि मोहरीचे दर दबावात आले आहेत. मोहरीचे दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत. मोहरीचे दर सुधारण्यासाठी सरकार पामतेल आयातशुल्क वाढविण्याची शक्यता आहे. मग याचा सोयाबीनला फायदा मिळेल का? सोयाबीनचे दर सुधारतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Tur Rate: तुरीचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज | Agrowon

    देशातील बाजारात तुरीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे दरातील तेजी टिकून आहे. पण मार्च महिन्यात बाजारात आवक वाढू शकते. तर आयातही सुरु आहे. मग या परिस्थितीत तुरीचे दर कसे राहू शकतात? मार्च महिन्यात तुरीला काय भाव मिळू शकतो? तुरीचे दर आणखी कधीपासून वाढतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल. 

    6 min
  • जर्मनीतल्या काळ्याकुट्ट मधाची कहाणी | Agri Unplugged

    जर्मनीतील श्वार्त्सवाल्डचा मध हे येथील एक खास उत्पादन आहे. तो पेटीत ठेवलेल्या पाळीव मधमाशांकडूनच निर्माण केला जातो पण तो डांबरासारखा काळाकुट्ट, अपारदर्शी आणि घणसर असतो. हा मध जर्मन लोक आवडीने खातात. काहींच्या मते तर त्यात विशेष औषधी गुणधर्म असतात.

    Honey from the Black Forest in Germany is a special product. It is produced by honeybees kept in boxes but it is black, opaque and dense like tar. Germans love to eat this honey. They believe it has special medicinal properties as well.

    डॉ. आनंद कर्वे

    9 min
  • Cotton Market: कापसाच्या दरावर दबाव कायम | Agrowon

    देशात मागील काही दिवसांपासून कापूस आवक वाढली. वाढते ऊन आणि आर्थिक गरजेमुळे कापूस विक्री वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. पण रुईचे दर टिकून आहेत. दुसरीकडे कापूस दर मात्र नरमले. मग रुईचे दर स्थिर असताना कापूस का नरमला? सध्या कापसाला काय भाव मिळत आहे? पुढील काळात कापसाचे दर सुधारतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…