Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Chana Market: उन्हामुळे हरभरा पिकावर परिणाम | Agrowon

    देशातील अनेक भागांमध्ये दिवसाचे तापमान वाढले आहे. वाढलेल्या तापमानाचा हरभरा उत्पादकतेवर परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर सध्या हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. मग वाढलेल्या उष्णतेमुळे हरभरा उत्पादन घटेल का? हरभरा बाजार दबावातच राहणार का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल. 

    5 min
  • Tur Market: बाजारातील कमी आवकेमुळे तुरीचे दर टिकून | Agrowon

    तूर बाजारात येण्याचा हंगाम आता सुरु झाला. मात्र शेतकरी तुरीची विक्री कमी करताना दिसत आहेत. त्यामुळं तुरीच्या दरातील तेजी टिकून आहे. त्यातच यंदा देशातील उत्पादन घटणार आहे. त्यामुळं तुरीचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मग तुरीचे दर आणखी वाढतील का? सध्या तुरीला काय भाव मिळत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    5 min
  • एल-निनो आला तर शेतीवर नेमका परिणाम होईल?

    सध्या ‘एल-निनो’ची मोठी चर्चा सुरू आहे. अनेक अमेरिकी हवामान संस्थांनी यंदा मॉन्सून हंगामात एल-निनो प्रभावी ठरणार असल्याचा अंदाज दिलाय. भारतातील संस्थांनीही त्याची री ओढली आहे. एल-निनो आला तर शेतीवर नेमका काय परिणाम होईल, सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढतील की कमी होतील, या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या बुलेटिनच्या शेवटी. 
    Currently, there is a big discussion about 'El Nino'. Many American weather organizations have predicted that El Nino will be effective during the monsoon season this year. Institutions in India have also followed suit. At the end of the bulletin, find out the answers to these questions: What exactly will El Nino affect agriculture, will soybean and cotton prices rise or fall?

    7 min
  • Chana Market: हरभरा उत्पादनात घटीची शक्यता | Agrowon

    देशात अनेक भागात हरभरा काढणी सुरु झाली. पण वाढलेल्या उष्णतेचा हरभरा पिकाला फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये हरभरा उत्पादकता कमी राहिल्याचे स्पष्ट होत आहे. मग याचा बाजारावर परिणाम जाणवत आहे का? यंदा हरभरा बाजारभाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल. 

    5 min
  • मी डोंगल फोडले, कारण... | Agri Unplugged

    काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट. जिल्हा परिषदेच्या एका लहानशा शाळेत डिजिटल क्लास चालवण्यासाठी डोंगल वापरले जात होते. परंतु एके दिवशी तिसरीतल्या एका मुलीने ड्रॉवरमध्ये ठेवलेला डोंगल काढून घेतला आणि दोन दगड घेऊन तो फोडून टाकला. काय होतं त्यामागचं कारण? ते जाणून तुम्ही थक्क व्हाल.

    Few years back, a dongle was used to conduct the digital class in a small ZP school. One fine day, a girl studying in third standard got this dongle from the drawer and broke it using two big stones. What was the reason behind that? You will be amazed knowing that reason.   

    AUTHOR NAME: भाऊसाहेब चासकर

    9 min
  • Soyabean Market : खाद्यतेलामुळे सोयाबीन बाजारावर दबाव | Agrowon

    भारत सरकारने आयातशुल्क कमी केल्यामुळं खाद्यतेल आयात वाढली. त्यामुळं यंदा देशात खाद्यतेलाचा स्टाॅक वाढला. सद्याचा स्टाॅक गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट आहे. याचा दबाव सोयाबीनवर येत आहे. मग देशात खाद्यतेलाचा किती  स्टाॅक आहे? खाद्यतेल स्टाॅकमुळे सोयाबीनवर आणखी दबाव वाढेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    5 min
  • Onion Rate: कांद्याचे दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी | Agrowon

    खरिपातील कांदा उत्पादनात यंदा मोठी वाढ झाली. खरिपातील कांद्याची टिकवणक्षमता कमी असल्याने जास्त दिवस ठेवता येत नाही. इतर राज्यांतील उत्पादनही वाढले. त्यामुळे बाजारातील आवक वाढली. परिणामी कांदा बाजार दबावात आला. मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? कांदा बाजार पुढील काळात कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • सरकारच्या निर्णयावर गहू व्यापारी नाराज | Agrowon

    देशातील बाजारात सध्या गहू दरावरून मोठ्या घडामोडी घडत आहेत. सरकारनं ११ लाख ७२ हजार टन गहू विक्रीसाठी लिलाव केले. पण या लिलावात कमी व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळं केवळ ५ लाख टन गहू विकता आला. गव्हाचे भाव हमीभावापेक्षा कमी करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. मग खरंच सरकारला हे उद्दीष्ट गाठता येईल का? सध्या गव्हाला काय भाव मिळतोय? गव्हाचं उत्पादन यंदा वाढेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • भारतातून मका निर्यात वाढली | Agrowon

    जागतिक पातळीवर यंदा मका उत्पादन घटले. त्यामुळे अमेरिका, अर्जेंटीना आणि ब्राझीलच्या मक्याचे दर वाढलेले आहेत. सध्या भारतीय मका स्वस्त पडतो. भारतीय मक्याला निर्यातीसाठी मागणीही आहे. त्यामुळे दर टिकून आहेत. मग सध्या मक्याला काय भाव मिळत आहे? मक्याच्या दर टिकतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    5 min
  • Cotton Market: कापसाच्या दरात सुधारणा होईल का? | Agrowon

    देशात यंदा कापसाचे उत्पादन घटले. तर वापर कायम राहणार आहे. त्यातच देशातून कापूस निर्यातही सुरु झाली. सध्या कापसाचे भाव दबावात आहेत. मात्र पुढील काळात कापूस दर सुधारण्यास अनुकूल स्थिती आहे. मग कापसाचे भाव वाढतील का? कापसाला पुढील १५ दिवसांनंतर काय भाव मिळू शकतो? आज कापूस बाजार कसा राहिला? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…