Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Tur Market : तुरीच्या बाजारावर सरकारचेही लक्ष | Agrowon

    देशातील बाजारात सध्या तुरीची आवक सरासरीपेक्षा कमी होत आहे. चांगल्या दराच्या अपेक्षेने शेतकरी माल मागे ठेवत आहेत. पण दुसरीकडं सरकारही तूर बाजारावर लक्ष ठेऊन आहे. मग या परिस्थितीत तूर बाजार कसा राहू शकतो? सध्या तुरीला काय दर मिळत आहे? तुरीचे दर आणखी वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    5 min
  • वनस्पतींना शिकविणे शक्य आहे का? |Can we teach plants? | Agri Unplugged

     शिकणाऱ्याच्या ठायी स्मरणशक्ती असेल तरच त्याला शिकता येते. वनस्पतींमध्ये स्मरणशक्ती असते हे प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. आनंद कर्वे यांना १९६०-६१ साली त्यांनी फुलांच्या पाकळ्यांच्या हालचालींवर केलेल्या संशोधनातून लक्षात आले. 

    Renowned scientist Dr Anand Karve conducted experiments to teach the plants. He established that the plants have the memory. So the plants can be taught, he proved.

    AUTHOR NAME: डॉ. आनंद कर्वे 

    8 min
  • हळद दरात हंगामाच्या आधीच मोठी घट | Agrowon

    देशात यंदा हळदीचे उत्पादन वाढले. मागील हंगामातील साठाही शिल्लक आहे. मात्र हळदीला उठाव कमी मिळतोय. त्यामुळं मागील महिनाभरात हळदीच्या दरात क्विंटलमागं ७०० रुपयांपर्यंत नरमाई आली. मग सध्या हळदीला काय दर मिळतोय? हळदीची आवक वाढल्यानंतर बाजारभाव काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    5 min
  • नव्या हरभऱ्याचे दर हंगामाआधीच दबावात | Agrowon

    देशात यंदा हरभरा लागवड अडीच टक्क्यांनी घटली. तर केंद्राने हरभरा उत्पादन चांगले राहील, असा अंदाज व्यक्त केला. सध्या काही बाजारांमध्ये हरभरा आवक सुरु झाली. नाफेडही स्टाॅकमधील हरभरा बाजारात आणत आहे. मग या परिस्थितीत सध्या नव्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? आवकेचा दबाव वाढल्यानंतर दर कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • खाद्यतेल आयातीमुळे तेलबिया बाजारावर दबाव | Agrowon

    देशात मागील तीन महिन्यांमध्ये खाद्यतेलाची विक्रमी आयात झाली. सोयातेल आणि सूर्यफूल तेलाची आयातही वाढली. जानेवारीत तर सूर्यफुल तेलाची आयात जवळपास तिप्पट झाली. त्यामुळं देशात खाद्यतेलाचा साठा वाढला. मग याचा सोयाबीन बाजारावर काय परिणाम होत आहे? सध्या देशात खाद्यतेलाचा साठा किती आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market : तूर उत्पादन घट आणि मागणीमुळे दर तेजीतच | Agrowon

    देशातील तूर उत्पादन यंदा घटले आहे. त्यातच तुरीला सध्या उठाव मिळत आहे. त्यामुळं गुणवत्तेच्या तुरीच्या दरात मागील दोन दिवसांमध्ये क्विंटलमागे २०० रुपयांची सुधारणा पाहायाला मिळाली. मग सध्या तुरीला काय दर मिळत आहे? तुरीचे दर टिकतील का? आवकेच्या हंगाात तुरीचे बाजारभाव काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Cotton Market : कापूस दर वाढीसाठी अनुकूल स्थिती!

     एमसीएक्स या प्लॅटफॉर्मवर कापसाचे वायदेबाजार सोमवारपासून पुन्हा सुरू झाले. वायदेबाजार सुरू झाले की, लगेच कापसाच्या भावात तेजी येईल, असा प्रचार काही मंडळींनी केला होता. त्यात काही तथ्य आहे का? वायदेबाजाराचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय? तसेच या पुढील काळात कापसाचे दर वाढतील की त्यात नरमाई येईल? याची उत्तरं जाणून घेऊया बुलेटिनच्या शेवटी.

    The cotton futures market resumed on the MCX platform from Monday. Some churches had propagated that once the futures market started, the price of cotton would rise immediately. Is there any truth to it? What is the benefit of the futures market for farmers? Also, will cotton prices increase or soften in the next period? Let's find out the answers at the end of the bulletin.

    7 min
  • Wheat Export ban : गव्हाचे दर नियंत्रणासाठी आणण्यासाठी सरकारचा खटाटोप

     केंद्र सरकारने गेल्या वर्षी मे महिन्यात गहू निर्यातीवर बंदी घातली होती. यंदा एप्रिल महिन्यात निर्यातबंदीचा आढावा घेतला जाईल. यंदा गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज सरकारी गोटातून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सरकार गहू निर्यातीवरची बंदी उठवेल की तिला मुदतवाढ देईल, याबद्दल  चर्चा रंगली आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकार नेमका काय निर्णय घेईल?  
    The central government had banned the export of wheat in May last year. This year, the export ban will be reviewed in the month of April. This year, record production of wheat has been predicted by the government. Therefore, there is a debate about whether the government will lift the ban on wheat export or extend it. what do you think What exactly will the government decide?

    7 min
  • स्वार्थी व्हा, पोटार्थी व्हा | Old is not gold | Agri Unplugged

     खेड्यांतून असलेली बलुतेदारी ही मुळात उत्पादन व्यवस्था नव्हती तर जाती व्यवस्था होती. तिथे स्केल सुद्धा नव्हती आणि नवीन कल्पना सुद्धा नव्हत्या. म्हणून इथे नवीन शोध लागले नाहीत. ह्या काळात भारतीय शेतीत झालेला एकमेव बदल म्हणजे मिरची सारखी नवीन पिके. त्याला मागणी आणि बाजारपेठा असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड केली. 

    The Twelve Balutedar system was not the production system. It was a caste system. There was a lack of scale and innovations. During that period the only change happened in Indian Agriculture was adoption of new crops like chilli. Farmers started cultivating chillies because of the demand and market for chillies.

    AUTHOR NAME: नीरज हातेकर

    5 min
  • Wheat Market: गहू दर नियंत्रणात सरकार अपयशी? | Agrowon

    देशातील गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारने बफर स्टाॅकमधील गहू खुल्या बाजारात विकण्यास सुरुवात केली. मात्र तरीही गव्हाचे दर अपेक्षेप्रमाणे कमी झाले नाहीत. त्यामुळे सरकारने गहू लिलावाची आरक्षित किंमत कमी केली. मग सरकारने गव्हाची किंमत किती कमी केली? गव्हाचे दर कमी करण्यासाठी आणखी कोणते निर्णय घेतले? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…