Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Urad Market : उडदाचे उत्पादन घटले; मागणी चांगली | Agrowon

    देशात यंदा उडदाचे उत्पादन घटले. तर मागणी चांगली आहे. उडिद आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या हातून बाजारात आला. त्यामुळं आवक घटली. परिणामी उडदाचे भाव तेजीत आहेत. पुढील काळातही उडदाला मागणी वाढणार आहे. मग या काळात उडदाचे भाव कसे राहतील? उडदाची आयात यंदा वाढेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Pulses Market : तुरीच्या दरावर आवक आणि वाढत्या आयातीचा दबाव येईल का? | Agrowon

    देशातील बाजारात नव्या तुरीची आवक वाढत आहे. तर आयातीचाही वेग यंदा जास्त आहे. सरकार यंदा विक्रमी तूर आयातीचे उद्दीष्ट बाळगून आहे. त्यामुळे पुढील काळात बाजारात तुरीचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. मग या काळात तुरीचे दर दबावात येतील का? शेतकऱ्यांना तुरीसाठी यंदा काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    5 min
  • खुद को कर बुलंद इतना... |How to increase Soil fertility? | Agri Unplugged

    चार बांधाच्या आत फुकटात मिळणाऱ्या पदार्थातून जमीन उत्तमरित्या सुपीक करता येते. मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष व चालू पिकात दोन ओळीमध्ये उगविणाऱ्या तणांचा युक्तीने वापर केल्यास जमीन फुकटात सुपीक करता येते.

    Deteriorating Soil fertility is the major problem adversely affecting productivity and profitability. There are few simple measures to address this issue.

    AUTHOR NAME: प्र. र. चिपळूणकर

    14 min
  • Pulses Market : देशातील तूर, मूग आणि उडदाचे उत्पादन का घडले | Agrowon

    भारत लवरकच कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण मागील काही वर्षांपासून भारताची तूर, मूग आणि उडिद आयात वाढली आहे. यंदाही त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. मग भारताला कडधान्य आयात का वाढवावी लागली? वाढलेल्या आयातीचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Millet Market : केंद्र सरकार देशातील भरडधान्य उत्पादन वाढवणार | Agrowon

     केंद्र सरकारने देशात भरडधान्य पिकांचे उत्पादन आणि वापर वाढवण्याचा निर्णय घेतला. तर राज्य सरकारांनाही खरेदी व्यवस्था उभी करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सर्व भरडधान्य पिकांचा समावेश हमीभाव खरेदी योजनेत करण्यात येणार आहे. मग यामुळं ज्वारी, बाजारी, नाचणी, वरई, रागी या पिकांना चांगाल भाव मिळेल का? सरकार भरडधान्याची खरेदी कशी करणार ? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market : तुरीचे दर दबावात ठेण्यासाठी सरकारचा आटापीटा | Agrowon

    यंदा देशातील तूर उत्पादन ३० लाख टनांच्या दरम्यान स्थिरावेल, असा अंदाज उद्योग आणि व्यापारी संस्थांनी व्यक्त केला. त्यामुळं यंदा देशात तुरीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तुरीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने यंदा १० लाख टन तूर आयातीचे उद्दीष्ट ठेवले आहे. मग यंदा खरचं १० लाख टन तूर आयात होईल का? याचा तुरीच्या दरावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Wheat Market: सरकार यंदा गव्हाची खरेदी वाढविण्याचा अंदाज | Agrowon

    गेल्या हंगामात खुल्या बाजारात गव्हाचे दर तेजीत होते. त्यामुळं सरकारला उद्दीष्टापेक्षा कमी गहू खरेदी करता आला. तसंच खुल्या बाजारातील गहू दरवाढ आजही कायम आहे. सध्या गव्हाचे दर विक्रमी पातळीवर पोचले. पण यंदा सरकार गहू खरेदी वाढवण्याची शक्यता आहे. मग गव्हाचे दर हमीभावापेक्षा जास्त असताना सरकारला गहू मिळेल का? सरकार गव्हाला बोनस देईल का? गव्हाचे दर यंदा काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Urad Market: देशातील उडदाचे उत्पादन यंदा घटणार | Agrowon

    देशातील उडीद उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज आहे. मात्र गेल्यावर्षीपेक्षा यंदा उडीद आयात वाढणार आहे. त्यामुळं देशातील बाजारात उडदाचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त असेल. मग या परिस्थितीत उडदाला यंदा काय दर मिळू शकतो? सध्या उडीद बाजार कसा आहे? यंदा उडीद उत्पादन आणि आयात किती होऊ शकते ? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

    Listen to today's podcast to know the details. 

    6 min
  • Tur Market: काबुली हरभऱ्याचे दर का नरमले? | Agrowon

    देशातील बाजारात सध्या मागील हंगामातील काबुली हरभरा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र पुढील महिनाभरात देशातील नवा काबुली हरभरा बाजारात दाखल होईल. वाढलेल्या दरात मागणी कमी झाल्यानं दरही काहीसे नरमले आहेत. मग यंदाच्या हंगामात काबुली हरभऱ्याला काय दर मिळू शकतो? सध्या काबुली हरभऱ्याला काय दर मिळतो आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

    Listen today's podcast to know the details. 

    6 min
  • पाण्याचं गारूड | Agri Unplugged

     शेतकरी दररोज सकाळ-संध्याकाळ दोन्ही बोअरच्या पाईपजवळ कान देऊन पाण्याचे आवाज येतात का, ते पाहतो. मध्येच तो खडा टाकून बघतो. बुडूक बुडूक आवाज आला की खूष होतो. मनातल्या मनात म्हणतो की, पाणी आलंय बोअरमध्ये.  बाकी सगळं नॉर्मल आहे त्याचं. पण एवढे पैसे जाऊनही त्याचं पाण्याचं वेड काही गेलेलं नाही. 

    The farmer is crazy for water. Every morning and evening, he puts his ear near the bore pipe and listens for the sound of water. In the middle he throws stones and looks. Despite spending so much money, his obsession with water has not gone away.

    12 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…