Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Tur Market: सरकारच्या हमीभाव खरेदीचा बाजाराला आधार मिळेल | Agrowon

    देशातील तूर उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज आहे. तसंच मागील हंगामातील शिल्लक साठाही नगण्य आहे. सरकारही हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळं सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या तुरीला चांगला दर मिळत आहे. मात्र हे दर पुढील काळात  टिकतील का ? तुरीला यंदा काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Jeera Market: देशातील जिरा उत्पादन घटल्यानं दर तेजीत | Agrowon

    यंदा जिरा पिकाला बदलते हवामान आणि अतिथंडीचा फटका बसत आहे. त्यामुळं यंदा देशातील जिरा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यातच जिऱ्याला पुढील काळात निर्यातीसाठी आणि देशात लग्नसराईमुळं उठाव मिळेल. मागील हंगामातील साठाही कमी प्रमाणात शिल्लक आहे. मग या स्थितीत जिऱ्याचे भाव काय राहू शकतात? जिरा यंदा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market: मागील वर्षी आतबट्ट्याची ठरलेली तूर यंदा आधार देणार | Agrowon

     यंदा देशातील तूर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. पण देशातील तूर उत्पादन कमी राहील, हे गृहीत धरुन सरकारने आयात वाढवायला सुरुवात केली आहे. यंदा देशात विक्रमी तूर आयात होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मग या काळात तुरीला काय भाव मिळू शकतो? तुरीची सरासरी दरपातळी काय राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

     

    6 min
  • Chana Market: हरभऱ्याला यंदा चांगला भाव मिळण्याचा अंदाज | Agrowon

     देशात सध्या नव्या हरभऱ्याची आवक होत आहे. मात्र दर अद्यापही दबावातच आहेत. त्यातच यंदा हरभरा उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सध्या हरभऱ्याला किमान दरात उठावही मिळत आहे. तसंच सरकार हमीभावानेही खरेदीत उतरणार आहे. मग या स्थितीत हरभरा बाजार कसा राहील? हरभरा भाव वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Cotton Market: कापूस बाजारभाव पुन्हा वाढण्याचा अंदाज | Agrowon

    कापसाचे भाव जसे रुईच्या दरावर अवलंबून असतात तसंच सरकीच्या दराचाही परिणाम होत असतो. कापसामध्ये फक्त ३५ टक्क्यांपर्यंत रुई असते. तर ६५ टक्क्यांपर्यंत सरकी असते. त्यामुळं सरकीच्या दरासोबतही कापसाचे भाव बदलत असतात. मग सध्या सरकीचा भाव काय आहे? सरकी दराचा कापूस बाजाराला आधार मिळतो का? कापूस दर वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Soybean Market: चीन यंदा सोयाबीन आयात वाढविण्याचा अंदाज | Agrowon

    जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा ग्राहक म्हणजे चीन. मात्र मागील दोन वर्षे कोरोनामुळं चीनची सोयबीन आयात कमी राहिली. पण यंदा चीन यंदा सोयाबीन आयात वाढवण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात चीनने किती सोयाबीन आयात केली? चीनची सोयाबीन आयात वाढल्यास बाजारावर काय परिणाम होईल? सोयाबीन बाजाराला आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या  पॉडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • महाराष्ट्रात संकरित बियाणे कशी रूजली? | Adoption of Hybrid Seeds in Maharashtra | Agri Unplugged

     एकेकाळी महाराष्ट्राच्या कृषी खात्याचा संकरित बियाण्यांना विरोध होता. ७२च्या दुष्काळामुळे हा आकस संपला. आज संकरित बियाण्यांच्या क्षेत्रात आपण मोठी मजल मारली आहे.

    The Maharashtra Government initially opposed Hybrid seeds. But Hybrid seeds proved very beneficial during drought in 1972. This was the turning point. 

    9 min
  • Chana Market: महाराष्ट्रात हरभरा लागवड का वाढली ? | Agrowon

    देशातील बाजारात नवा हरभरा दाखल होत आहे. सध्या हरभरा आवक कमी असली तरी मिळणारे दर हमीभावापेक्षा कमीच आहे. तर दुसरीकडे हरभरा लागवड घटली आहे. मग सध्या हरभरा लागवड किती कमी झाली? नव्या हरभऱ्याला काय दर मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

     

    6 min
  • Tur Market: नव्या तुरीची आवक वाढली का? | Agrowon

     देशातील बाजारात सध्या नव्या तुरीची आवक वाढत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही बाजारांमध्ये आवक वाढली. मात्र या तुरीला चांगला उठाव मिळत आहे. तसेच पुढील काळात आफ्रिकेतील देशांमधून आयात कमी होण्याची शक्यता आहे. मग या परिस्थितीत तुरीला काय दर मिळतील? सध्या नवी तूर काय दरानं विकली जातेय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Chana Market: New Chana has been enter in the market | Agrowon

    देशातील हरभरा उत्पादन यंदा कमी राहण्याचा अंदाज आहे. सध्या काही बाजारांमध्ये नवा हरभरा दाखल झाला. पण या हरभऱ्याला सध्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. मग नव्या हरभऱ्याला बाजारात काय दर मिळला? हरभऱ्याची दरपातळी काय राहू शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

     

    6 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…