Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • The story of a toilet paper | कागज के फुल | Agri Unplugged

     रशिया हा संपूर्ण युरोपचा सर्वात मोठा 'टॉयलेट पेपर' पुरवठादार आहे. पण युक्रेन युद्धाच्या पार्शवभूमीवर संपूर्ण युरोपभर रशियावर बंदी घालायची लहर दौडतेय. त्यांच्या प्रॉडक्ट्सवर, प्रवाशांवर युरोपमध्ये बंदी घातली जातेय. पाश्चिमात्यांनीच नव्हे तर जगातील इतर देशांनी देखील त्यांचं अनुकरण करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. याचाच भाग म्हणून युरोपियन महासंघाच्या संसदेने रशियातून आयात होणाऱ्या टॉयलेट पेपरवर बंदी घालायची योजना बनवण्याचा घाट घातलाय.

    Russia is Europe's largest 'toilet paper' supplier. But in the wake of the Ukraine war, there is a wave of banning Russia across Europe. As a part of this, the Parliament of the European Union is planning to ban the import of toilet paper from Russia.

    AUTHOR NAME: डॉ. सतीलाल पाटील

    11 min
  • Maize Market: Maize export may decrease this season | Agrowon

     देशातील मका उत्पादन यंदा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र देशातील मका वापर वाढणार असल्याचंही सांगितले जात आहे. मात्र सध्या व्यक्त होत असलेल्या अंदाजापेक्षा मका उत्पादन कमीच राहील, असे शेतकरी सांगत आहेत. मग देशात मका उत्पादन किती होईल? निर्यात वाढेल की कमी होईल? मक्याला काय दर मिळेल? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट पॉडकास्टमधून मिळेल. 

     

    6 min
  • Chana Market: What is the status of chana sowing in the country? | Agrowon

     हरभऱ्याला मागील वर्षभर कमी दर मिळाल्यानं शेतकरी हरभऱ्याची लागवड कमी करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, देशातील हरभरा लागवडीचा वेग मागील काही आठवड्यांमध्ये जास्त होता. मात्र चालू आठवड्यात हरभरा लागवडीचा वेग कमी राहिला. मग देशात हरभरा लागवडीचे चित्र कसे राहिले? त्याचा हरभरा बाजारावर काही परिणाम होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

    6 min
  • Tur Market: Free tur import extended by one year | Agrowon

     केंद्र सरकारने मुक्त तूर आयातीला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे तूर आयातीला प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे यंदा गेल्यावर्षी एवढी तूर आयात होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मग याचा देशातील तूर बाजारावर काय परिणाम होईल? तुरीचा भाव काय राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट पॉडकास्टमधून मिळेल. 

    6 min
  • Urad Market: Urad availability is less in the domestic market | Agrowon

     यंदाच्या खरिपातील उडदाचे उत्पादन कमी राहीले. त्यातच सध्या बाजारातील उडदाची आवक कमी आहे. तर उडदाला उठाव चांगला मिळतो आहे. फेब्रुवारीपासून म्यानमारमधून उडीद आयात वाढू शकते. मग देशातील उडदाला सध्या काय दर मिळतोय? भविष्यात उडदाला काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

    6 min
  • Maize Market: Maize producers are waiting for price increase | Agrowon

     बाजारात मागील काही दिवसांपासून मका दर स्थिरावले आहेत. पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांनी मका निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही, मात्र त्याचा मानसिक परिणाम बाजारावर जाणवत आहे. मग सध्या मक्याला काय दर मिळत आहे? पुढील काळात मक्याचा बाजार कसा राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

    6 min
  • Tur Market: Tur arrival increasing gradually in the market | Agrowon

    देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये आता तुरीची आवक हळूहळू वाढत आहे. आता मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही नवी तूर येत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर बाजारात सध्या तुरीची आवक जास्त आहे. तर अकोला, अमरावती, लातूर आणि अकोला या बाजारांमध्ये आवक हळूहळू वाढत आहे. पण सध्या तुरीला मिळणारा दर गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे की कमी आहे? यंदा तुरीला काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

     

    6 min
  • A Biogas Plant That Does Not Require Dung | शेणाची गरज नसणारे बायोगॅस संयंत्र | Agri Unplugged

    जैव इंधनवायु म्हणजेच बायोगॅस या विषयावर संशोधन करण्यास डॉ. आनंद कर्वे यांनी २००३ सालापासून सुरुवात केली. त्यांच्या दृष्टीने हा विषय नवा होता. म्हणून कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी त्यावर उपलब्ध असणारी माहिती संकलित करू लागले. 

    To research the topic of biofuel i.e. biogas. Dr. Anand Karve started in the year 2003. According to him, this topic was new. So before starting the work, he started collecting the available information.

    11 min
  • Turmeric Market: Turmeric production may increased this season | Agrowon

     यंदा हळद पिकासाठी पोषक वातावरण असल्याने उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे.  हळदीची लागवडही यंदा मागील वर्षीपेक्षा जवळपास ६ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच पोषक वातावरण असल्याने उत्पादकता अधिक येण्याची शक्यता आहे. पण यंदा खरंच हळद उत्पादनात वाढ होईल? हळदीला सध्या काय दर मिळत आहे? हंगामात हळदीचे दर टिकतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

    6 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…