Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आ... more
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.
December 23, 2022Chana Market: Chana sowing may decrease this season |Agrowonदेशात हरभरा दर सध्याही दबावातच आहेत. त्यामुळे शेतकरी हरभऱ्याचा पेरा कमी करतील, असा अंदाज सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता. कारण यंदा तुरीच्या बाबतीत हा अनुभव खरिपात आला आहे. आता रब्बीची पेरणी वेगाने सुरु आहे. मग यंदा हरभऱ्याची पेरणी खरंच कमी झाली का? पुढील काळात हरभरा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. ...more6minPlay
December 22, 2022Soybean Market: Removal of future ban can support soybean market? |Agrowon केंद्र सकारने सात शेतीमालावरील वायदेबंदी एक वर्षासाठी वाढवली. याचा शेतकऱ्यांना फटका बसणारच आहे. मात्र आता प्रक्रिया दारांच्या संघटनेनेही वायदेबंदीला विरोध केला आहे. पण वायदेबंदीला विरोध करणारी ही संघटना कोणती? या संघटनेची नेमकी मागणी काय? शेतकऱ्यांना वायदे सुरु झाल्याचा काय फायदा होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. ...more6minPlay
December 21, 2022Tur Market: Tur market will get support in coming days ? |Agrowon यंदा देशातील तुरीचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे सरकारने तूर आयातीसाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. यंदाही गेल्यावर्षीऐवढी तूर आयात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आफ्रिकेतील देशांमधूनच जास्त तूर आयात केली जाते. पण आता तूर उत्पादकांना दिलासा देणारी बातमी आफ्रिकेतून येत आहे. मग काय आहे ही बातमी? याचा देशातील तूर बाजारावर काय परिणाम होईल? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. ...more5minPlay
December 20, 2022Chana Market : Will the desi chana rate increase? |Agrowon हरभऱ्याला प्रक्रिया उद्योगांकडून किमान दरात चांगला उठाव मिळतो आहे. या दरात मागणीही चांगली येत आहे. तर काबुली हरभऱ्याचे दर तेजीत आहेत. काबुली हरभऱ्याला निर्यातीसाठी मागणी वाढत आहे. मग सध्या देशी हरभऱ्याला काय दर मिळत आहे? काबुली हरभऱ्याचे दर किती वाढले? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. ...more6minPlay
December 19, 2022Tur Market : The price of tur depends on the farmers' sales |Agrowonशेतकरी तूर कशी विकतात याची चर्चा सध्या बाजारात सुरु आहे. कापूस आणि सोयाबीनचे दर नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील आवक कमी केली. परिणामी दरातील घसरण थांबली. पण शेतकरी तुरीचीही विक्री अशीच करतील का? यंदा तुरीला काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल....more6minPlay
December 17, 2022Cotton Market: Cotton Import Duty and CCI Procurement will Support the Market | Agrowonकेंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयातशुल्क काढणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच सीसीआय बाजारभावाप्रमाणे कापूस खरेदीत उतरली. याचा फायदा कापूस बाजाराला होणार आहे. मग शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळणार का? कापसाचे दर कधी मिळणार? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. ...more5minPlay
December 16, 2022Tur Market: Will farmers control tur arrival? | Agrowonदेशातील बाजारात सध्या तुरीची आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याचं बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळं यंदा शेतकरी सोयाबीन आणि कापसाप्रमाणं तुरीचीही विक्री गेरजेनुसार करतील की काय? अशी चर्चा सध्या बाजारात सुरु आहे. पण खरंच यंदा शेतकऱ्यांच्या विक्रीवरचं तुरीचे दर ठरतील का? तुरीला यंदा काय दर मिळेल? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. ...more6minPlay
December 15, 2022Cotton Market: How much cotton arrived in the market ? | Agrowon यंदा देशातील कापूस लागवड वाढली मात्र उत्पादकता कमी राहीली. कापसाचा हंगाम सुरु होऊन आता अडीच महिने झाले. मात्र यंदा बाजारातील आवक खूपच कमी आहे. मग कापसाचा साठा नेमका कुणाकडे आहे? कापूस विक्रीबाबत यंदा शेतकऱ्यांची भुमिका काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. ...more6minPlay
December 14, 2022Soybean Market: देशातील सोयाबीन बाजार स्थिर का ? | Agrowonअमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ३५५ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. तर जागतिक सोयाबीन गाळप एक हजार लाख टनाने वाढेल तसेच शिल्लक साठाही गेल्यावर्षीपेक्षा ७ लाख टनांनी अधिक राहील, असंही म्हटलंय. तसंच पामतेलाचे दरही मागील काही दिवसांपासून नरमले आहेत. मग याचा सोयाबीन बाजारावर काय परिणाम झाला? देशातील सोयाबीन बाजार कसा राहीला? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. ...more6minPlay
December 13, 2022Chana Market: देशात गुणवत्तापूर्ण हरभऱ्याचा तुटवडा? | Agrowon हरभऱ्याचा बाजार मागील रब्बी हंगामातील हरभरा बाजारात आल्यापासून दबावात आहे. मात्र आता हरभरा दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं जाणकार सांगतात. पण खरंच हरभरा दरात वाढ होऊ शकते? या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. ...more6minPlay
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.