
Sign up to save your podcasts
Or


यंदा परतीचा पाऊस लांबल्याने साखर कारखाने उशिरा सुरू झाले. परंतु यंदाचा गळित हंगाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार असल्याचं बोललं जात आहे. यंदा इथेनॉलमधून गेल्या वर्षीपेक्षा जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. यंदा साखर उद्योगाची उलाढाल किती होईल, त्यात इथेनॉलचा वाटा किती असेल, त्याचा थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय फायदा होईल, हे जाणून घेऊया आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये.
Sugarcane crushing season is delayed due to late withdrawal of monsoon. But farmers could reap the higher benefits. Ethanol turnover is likely to go up.
गहू, तांदळाचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलणार असल्याच्या बातम्या येत आहेत. परंतु केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी त्याचा इन्कार केलाय. हे नेमके प्रकरण काय आहे, देशात गहू, तांदळाचा साठा नेमका किती आहे, दर पडतील की टिकून राहतील, याची माहिती जाणून घ्या आजच्या पॉडकास्टमध्ये.
Central food secretary Sanjeev Chopra ruled out the possibility of government intervention to control the prices. Inventories likely to be above buffer limits in April, he said.
बागायती भागात ऊस आणि फळबागा वाढल्यामुळे रब्बी ज्वारीच्या पिकावर भलताच परिणाम होतोय. परतीच्या पावसामुळे रब्बी ज्वारीची लागवड उशीरा झाली. त्यात आता शेतकऱ्यांना एक वेगळीच समस्या भेडसावू लागलीय. ती नेमकी काय आहे, ते पाहूया आजच्या पॉडकास्टमध्ये.
Changing cropping pattern has an adverse impact on the crop of rabi jowar. As area under sugarcane and horticulture crops rises birds are destroying the jowar crop which is in flowering stage.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने २५ नोव्हेंबर रोजी रब्बी पिकांच्या पेरणीची आकडेवारी जाहीर केलीय. देशातील रब्बी पिकांच्या लागवडीचे चित्र त्यातून स्पष्ट झालंय. रब्बी हंगामातील सगळ्यात महत्त्वाचं पीक असलेल्या गव्हाची पेरणी वाढलीय का? उत्तर प्रदेशात काय स्थिती आहे? हरियाणात पेरा घटलाय का? महाराष्ट्रातील स्थिती काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या आजच्या पॉडकास्टमध्ये.
देशात यंदा तुरीचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे सरकारने आयातीसाठी जोर लावलाय. परंतु आयात वाढली तरी तुरीच्या किंमतीतील तेजी कायम राहण्याची चिन्हे आहेत. त्याची काय कारणं आहेत ते जाणून घेऊया पॉडकास्टच्या शेवटी.
Tur output will be lower this year compared to last year. Therefore the central government has pushed for imports.But despite the increase in imports, prices will remain higher in domestic market, analysts said.
यंदा शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापूस विकायला सुरूवात केलीय. भाव वाढण्याच्या आशेने मालाचा साठा केलाय. त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव नाही. माल कमी उपलब्ध होतोय. त्यामुळे दर चढे आहेत. त्याचा निर्यातीच्या बाजारावर काय परिणाम होतोय, निर्यात वाढणार की घटणार, याविषयी जाणून घेऊ या आजच्या पॉडकास्टमध्ये.
This year farmers have started selling cotton in phases. Goods have been stocked in the hope of price increase. So there is no pressure of entry in the market. Goods are becoming less available. Hence the rates are high. In today's podcast, let's learn about its impact on the export market, whether exports will increase or decrease.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात आजही काहीशी घट झाली. मात्र देशांतर्गत बाजारात कापूस दरातील घट आज थांबली. आज अनेक बाजारांमध्ये कापसाच्या दरात सुधारणा पाहयाला मिळाली. पण कापूस दरातील चढ-उतार पुढील महिनाभर कायम राहू शकतात. मग या स्थितीत कापसाला काय दर मिळू शकतो? आज कापसाच्या दरात किती सुधारणा झाली? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात आजही चढ-उतार पाहायला मिळाले. तर देशातील बाजारातही अनेक ठिकाणी कापूस दरात नरमाई दिसून आली. कापसाचे दर नरमल्यानंतर बाजारातली आवकही घटली. मग या स्थितीत कापूस दर कसे राहू शकतात? कापूस दरातील चढ-उतार कधीपर्यंत राहतील? शेतकऱ्यांना या स्थितीत काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Fluctuations were seen in the cotton price in the international market today. In the market of the country too, the price of cotton has softened in many places. Inflows to the market also declined after cotton prices softened. So how can cotton prices stay in this situation? How long will the fluctuations in cotton prices last? What rate can farmers get in this situation? You will get this information from today's podcast.
आफ्रिकेतील देशांमधून स्वस्त तुरीची आयात वाढत आहे. तसेच या देशांमधून आयात होणारी तूर म्यानमारच्या तुरीपेक्षा स्वस्त आहे. त्यातच सरकारने आत्तापर्यंत १२ हजार टन आयात तुरीची खरेदी केली. मग देशातील तुरीच्या बाजारावर याचा काय परिणाम होत आहे? यंदा शेतकऱ्यांना तुरीसाठी काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्ट मधून मिळेल.
Imports of cheap tobacco from African countries are on the rise. Also the tur imported from these countries is cheaper than tur from Myanmar. In this, the government has so far purchased 12 thousand tons of imported pipe. So what is the impact of this on the Turi market in the country? What rate can farmers get for Turi this year? You will get this information from today's podcast.
राज्यात गेल्या काही वर्षांपासून हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक बनलं आहे. परंतु रोगराईचा प्रादुर्भाव आणि घटलेले दर यामुळे गेल्या काही हंगामांत हरभरा पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचं बनलं आहे. त्याला राजमा हे पीक चांगला पर्याय ठरू शकते का, याबद्दल जाणून घेऊ या आजच्या मार्केट पॉडकास्टमध्ये.
Chana is the major rabi crop in Maharashtra. But due to disease infestation and dip in prices farmers are incurring losses in Chana crop. Rajma will be the best option to replace Chana, experts said.
From the publisher's feed