Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • पुरवठ्या वाढल्याने पामतेल, सूर्यफुल तेल दबावात | Agrowon

    जागतिक बाजारात सध्या पामतेल आणि सूर्यफुल तेलाचे दर दबावात आहेत. त्यामुळे सोयातेलाचेही दर नरमले आहेत. इंडोनेशियाने पामतेलाचे दर वाढविण्यासाठी जैव इंधानात वापर वाढवला आणि निर्यात कोट्यातही बदल केला. मात्र तरीही दर वाढले नाहीत. मग सध्या पामतेलाचे दर काय आहेत? याचा सोयातेलावर काय परिणाम होत आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • बाजारातील केळी आवक निचांकी पातळीवर | Agrowon

    देशात यंदा केळीचे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. बाजारात सध्या केळीचा तुटवडा आहे. त्यातच केळीला निर्यातीसाठी मागणीही वाढली आहे. त्यामुळे केळीचे दर तेजीत आहेत. मग सध्या केळीला काय भाव मिळत आहे? केळीचे दर पुढील काळात काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    5 min
  • Maize Market : मका उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज | Agrowon

    देशातील मका उत्पादन यंदा अंदाजापेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे. तर सध्या देशातून मका निर्यातही वेगाने सुरु आहे. दुसरीकडे खरिपातील मका सध्या बाजारात येत असून पुढील काळात रब्बीतील मका बाजारात दाखल होईल. मग या परिस्थितीत मक्याचे भाव काय राहतील? मक्याचे दर टिकून राहतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • नाफेडच्या विक्रीचा हरभरा दरावर दबाव कायम | Agrowon

    देशातील बाजारात आता नवा हरभरा दाखल होत आहे. मात्र दुसरीकडे नाफेडची हरभरा विक्री सुरुच आहे. त्याचा दबाव हरभरा बाजारावर कायम आहे. पण दुसरीकडे यंदा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मग या परिस्थितीत हरभरा बाजार कसा राहू शकतो? हरभरा दरात तेजीची शक्यता आहे का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market : तुरीचे बाजारभाव मजबूत स्थितीत | Agrowon

    देशातील बाजारात आता नव्या तुरीची आवक वाढत आहे. मात्र पुरवठा साखळीत तुरीचा ठणठणाट आहे. तर देशातील उत्पादनात यंदा मोठी घट आली. त्यामुळे बाजारात येणाऱ्या तुरीला लगेच उठाव मिळत आहे. मग या परिस्थितीत सध्या तुरीला काय भाव मिळत आहे? तुरीचे भाव यंदा काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • ऊतिसंवर्धनाचे मृगजळ |Tissue culture: Myth and reality | Agri Unplugged

     ऊतिसंवर्धनाच्या माध्यमातून वनस्पतीची रोपे मोठ्या प्रमाणावर तयार करून ती विकण्याचे धंदे अनेक तरूणांनी सुरू केले. पण ते दिवाळ्यात गेले. सध्या महाराष्ट्रांत ऊतिसंवर्धनाने गुणन केलेली फक्त केळीची रोपेच मोठ्या प्रमाणात विकली जातात.

    There was hype about Tissue culture in Maharashtra. This technique is useful to produce saplings in huge quantities. Many young graduates started the business of selling tissue culture plants. But they have failed. At present only banana plants propagated by tissue culture are sold in large quantities in Maharashtra

    AUTHOR NAME: डॉ. आनंद कर्वे

    8 min
  • Rice Market : तांदळाच्या दराला उत्पादन घटीचा आधार | Agrowon

    जागतिक पातळीवर यंदा तांदूळ उत्पादनात मोठी घट झाली. भारत, पाकिस्तान, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांमध्ये उत्पादन कमी झाले. मात्र मागणी वाढलेल्या पातळीवर कायम राहण्याचा अंदाज आहे. यामुळे सद्या तांदळाचे दर तेजीत आहेत. मग सध्या तांदळाला काय दर मिळत आहे? तांदळाचे उत्पादन नेमके का कमी झाले? तांदळाचे दर पुढील काळात कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • Wheat Market : एफसीआयनेच विकला जास्त भावात गहू | Agrowon

    देशातील बाजारात विक्रमी गहू दरवाढ झाल्यानंतर सरकराने खुल्या बाजारात गहू विक्रीचा निर्णय घेतला. भारतीय अन्न महामंडळ अर्थात एफसीआयने काल पहिल्या टप्प्यात जवळपास ९ लाख टन गहू लिलावाद्वारे विकला. मग लिलावात गव्हाला काय भाव मिळाला? सरकारच्या गहू विक्रीने दर नरमतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    5 min
  • Chana Market : बदलते वातावरण, पावसामुळे हरभऱ्याचे नुकसान वाढले | Agrowon

    देशातील बाजारात हरभरा दर आजही दबावात आहेत. काही बाजारांमध्ये नव्या हरभऱ्याची आवक आणि नाफेडच्या विक्रीचा दरावर दबाव आहे. यंदा देशात हरभरा लागवड कमी झाली. त्यातच बदलते हवामान आणि पावसाचा पिकाला फटका बसतोय. मग या स्थितीत हरभरा बाजार कसा राहील? यंदा हरभऱ्याला दराचा आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    5 min
  • Mung Market : देशातील मूग उत्पादन यंदाही घटणार | Agrowon

    खरिप हंगामात यंदा मुगाची लागवड कमी झाली होती. तसचं पिकाचं नुकसानही झाले होते. त्यामुळे यंदा मुगाचे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे मुगाची आयातही वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मग या स्थितीत मुगाला यंदा काय भाव राहू शकतो? यंदा देशातील मूग उत्पादन किती होऊ शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    5 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…