Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Chana Market: नाफेडची हरभरा खरेदी किती झाली? | Agrowon

    नाफेडची हरभरा खरेदी वेगाने सुरु आहे. नाफेडच्या  खरेदीचा आधार मात्र खुल्या बाजाराला मिळताना दिसत नाही. खुल्या बाजारात हरभरा भाव आजही हमीभावापेक्षा किमान ७०० रुपयाने कमी असल्याचं दिसतं. मग नाफेडची खेरदी वेगाने सुरु असतानाही हरभरा भाव दबावातच का आहेत? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Fertilizer Market : खतांच्या अनुदानासाठी मोठी आर्थिक तोशीस सहन करावी लागणार

    भारताची युरिया आयात २०२२-२३ या वर्षांत १७ टक्के घटलीय. परंतु परंतु डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजे डीएपी खताची आयात मात्र ३० टक्क्यांनी वाढलीय. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार खतांबाबत मोठे धोरणात्मक निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्याबद्दल सविस्तर पाहुयात बुलेटिनच्या शेवटी.  
    India's urea import has declined by 17 percent in 2022-23. But the import of di ammonium phosphate i.e. DAP fertilizer has increased by 30 percent. In this background, the central government has to take major strategic decisions regarding fertilizers. Let's see about it in detail at the end of the bulletin.

    7 min
  • मी शेतीतल्या कामांकडे थ्रील म्हणून बघतो| Agricultural work is a thrill for me| Agri Unplugged

    शेतीतली अवघड, कष्टाची कामं करताना शरीर थकतं, पण मन ताजंतवानं होतं. पर्यटनात थ्रिल, थरारकता असते. नेहमीच्या जगण्यापेक्षा वेगळा अनुभव असतो. तो अनुभव घेताना त्रास होत असला तरी त्यानंतरचा आनंद अवर्णनीय असतो. त्यामुळंच पर्यटक, ट्रेकर जीवावरच्या जोखमीचे अनुभव घेतात. त्यात त्यांना भरपूर आनंद मिळतो. ही त्यांची अपनी पसंदकी जिंदगी असते. मी शेतीतल्या कामांकडंही असंच बघतो. त्यातलं थ्रिल मी जगतो. 

    The body gets tired while doing difficult and laborious work in agriculture, but the mind gets refreshed. There is thrill in tourism. It is a different experience from the usual life. Although the experience is painful, the joy that follows is indescribable. I also look at agricultural work in the same way. I live the thrill of it.

    AUTHOR NAME: Maharudra Manganale

    14 min
  • Soybean Market: सोयाबीन दरात सुधारणा कधी होईल? | Agrowon

    आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर दबावात आले. खाद्यतेल बाजारातील नरमाईचा परिणाम तेलबियांच्या दरावरही होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल आणि पामतेलाच्या दरात १२ ते १५ टक्क्यांपर्यंत नरमाई दिसली. खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने देशात आयातही वाढली. मग याचा सोयाबीन बाजारावर काय परिणाम होतोय? सोयाबीनला सध्या काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Tur Market: तुरीची आवक अद्यापही मर्यादीतच | Agrowon

    तुरीच्या बाजारात सध्या काहीसे चढ उतार सुरु आहेत. पण सरासरी दरपातळी कायम आहे. सरकार अन्नधान्यसह खाद्यतेलाचे दर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील वर्षातील निवडणुकांच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन सरकारच्या हालचाली सुरु झाल्या. सरकार तुरीच्याबाबतीत एवढं आक्रमक झालं की अगदी जिल्हा पातळीवरही त्याचा आढावा घेतला जातोय. मग याचा बाजारावर काही परिणाम होतोय का? तुरीच्या दरात वाढ होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Potato Market: बटाटा उत्पादकांची चिंता का वाढला? | Agrowon

    देशात यंदा बटाट्याचे उत्पादन वाढले. त्यामुळे दरात मोठी नरमाई दिसून आली. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन वाढल्याने दरात किलोमागं ४ ते ५ रुपयांची घट दिसत आहे. यामुळं शेतकरी अडचणीत आले. मग सध्या बटाट्याला काय भाव मिळतोय? बटाटा उत्पादनाची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.

    6 min
  • Wheat Market: सरकारला यंदा गहू खरेदी वाढवता येईल का? | Agrowon

    यंदा सरकारने ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवलं आहे. यंदा अवकाळी पावसामुळं गहू काढणीला अनेक भागांमध्ये उशीर झाला. परिणामी सरकारची गहू खरेदी धिम्या  गतीने सुरु झाली. त्यामुळं यंदा सरकारला गहू खरेदीचं उद्दीष्ट गाठता  येईल का, याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. मग सरकारला आतापर्यंत किती गहू खरेदी करता आला? गव्हाला सध्या काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 

    7 min
  • Chana Market: देशातून किती हरभरा निर्यात झाला? | Agrowon

    यंदा हरभऱ्याचे उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगत असले तरी सरकारने मात्र यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. देशात यंदा १३६ लाख टन हरभरा उत्पादन होईल, असा सरकारचा अंदाज आहे. नाफेडने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी करूनही दर दबावात आहेत. बाजारात हरभरा दर दबावात असल्याने निर्यातही वाढली. मग आतापर्यंत देशातून किती निर्यात झाली? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 

    6 min
  • Tur Market: तुरीची बाजारातील आवक कशी आहे? | Agrowon

    तुरीचे बाजारभाव सध्या चढेच आहेत. बाजारात सध्या तुरीचा पुरवठा कमी दिसतोय. कारण यंदा देशातील तूर उत्पादनात मोठी घट झालीय. तर आयातही उद्दीष्टापेक्षा कमी आहे. त्यामुळं सरकारही डाळीचे भाव कमी करण्यासाठी अॅक्शन मोडवर आहे. सरकार बाजारावर कसा दबाव वाढवत आहे? सध्या तुरीला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

    6 min
  • चहा इंग्रजांनी भारतात आणला ही गोष्ट खोटी | Did British really introduce tea to India? | Agri Unplugged

    आसामच्या सिंगफो जमातीमध्ये चहाच्या पानांचा काढा  पिण्याची रीत होती. आसामच्या राजाचा दिवाण असलेल्या मणिराम दिवाणने ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन सिंगफो जमातीच्या गावांना भेटी दिल्या. तो काढा चहाच्या पानांचा आहे असा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला. भारतीय चहाचा शोध असा लागला.

    Manram Dewan, the secretary of the state of Assam, took an interest in discovering Tea. There was a tradition of consuming the juice of the leaves of a particular plant in the Singpho tribe. Maniram along with the officials of the East India Company visited the tribal villages and established that those plants were nothing but Tea.

    AUTHOR NAME: Sunil Tambe

    4 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…