Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Tur Rate: तुरीचा तुटवडा नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार? | ॲग्रोवन

    देशात सध्या तुरीचा तुटवडा जाणवत आहे. तर सणांमुळे मागणी वाढण्याची शक्यता आहे. यंदा तुरीची लागवड जवळपास ६ टक्क्यांनी कमी झाली. पिकाचंही नुकसान होत आहे. मात्र असे असतानाही  तुरीचे दर सध्या काहीसे नरमले आहेत. पण तुटवडा असताना तूर का नरमली? तुरीचे दर काय राहू शकतात? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.    

     

    The Indian is facing tur shortage in the current situation. Tur demand may increase in the festival season. On the other hand, tur sowing is lagging by about 6 percent in the current season. But the tur rates are under pressure. Why is this happening? What will the rate of tur? Listen today's Podcast to know the details. 

    6 min
  • Cotton Rate: कापूस पिकाची स्थिती चांगली असल्याचा सीएआयचा दावा |ॲग्रोवन

     देशात यंदा कापसाला प्रतिकूल हवामानाचा फटका बसलाय. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पावसाचा खंड, गुलाबी बोंड अळी आणि इतर कीड-रोग यामुळे शेतकरी जेरीस आलेत. पण कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने मात्र देशातील कापूस पिकाची स्थिती सध्या चांगली असून कापूस उत्पादन मागील वर्षीपेक्षा वाढेल, असा दावा केलाय. हा नेमका काय प्रकार आहे, असोसिएशनच्या मते उत्पादन किती होईल, देशातील एकंदर कापूस चित्र काय आहे हे या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊ.   

     

    The cotton crop from the most states affected by the rain, less rain, pink bollworm and pest and disease. But the Cotton Association of India claimed that the cotton crop is in good condition and the cotton crop may be high from last year. But what is the estimate of the cotton association of India? At what rate cotton is ruling on? Listen today's podcast  to know the details. 

    7 min
  • Soybean Rate: सोपा म्हणते सोयाबीन पिकाची स्थिती चांगली |ॲग्रोवन

     देशातील सोयाबीन पीक हे सामान्य ते चांगल्या स्थितीत आहे, असा दावा सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने केला. देशातील सोयाबीन पिकाची वाढ अतिशय चांगली झालेली असून बहुतेक पीक हे फुले आणि शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. तर बहुतांश सोयाबीन पीक तणमुक्त आणि कीड-रोगापासून मुक्त आहे, असाही दावा सोपानं केला. मात्र सोपाचा हा दावा खरा आहे का? प्रत्यक्षात सोयाबीनची स्थिती काय आहे? सोयाबीनला सध्या काय दर मिळत आहे? याची माहिती आजच्या मार्केट पॉडकास्टमधून मिळेल. 


    Soybean Processors Association of India claimed that the Soybean crop all over India is in normal to good condition. Vegetative growth is excellent. Most crop is in flowering and pod formation stage. Soybean fields are mostly weed-free and there is no significant attack of insects or diseases. But is SOPAs claim true? What is a real condition on the field? Listen today's Podcast to know the details.

    7 min
  • Cotton Rate: जगातील महत्वाच्या देशांमध्ये कापूस उत्पादन घटणार ? |ॲग्रोवन

     जगातील महत्वाच्या कापूस उत्पादक देशांमध्ये यंदा कापूस पिकाला दुष्काळ, अतिपाऊस आणि कीड-रोगांचा फटका बसत आहे. त्यामुळे या देशांमधील कापूस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा पुरवठा कमी होऊ शकतो. पण कोणत्या देशांमध्ये कापूस उत्पादन घटणार आहे? याचा भारताच्या कापूस बाजारावर काय परिणाम होईल? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल. 

    The cotton crop in the important countries has been affected by the drought, Excess rain and pest and disease. In this situation cotton production may decrease in those countries. Watch today's Podcast to know the details.

    6 min
  • Soybean Rate: सोयाबीन वायद्यांवरील बंदी कायम ठेवण्याची सोपाची मागणी | ॲग्रोवन

    मागील हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनसह सोयातेलाचे दर तेजीत आले होते. त्यामुळे सरकारनं सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या वायद्यांवर बंदी घातली होती. बाजारात सोयाबीनचे दर पडले होते. आजही सोयाबीन बाजार दबावात आहे. त्यातच ही बंदी कायम राहावी अशी मागणी आता केली जातेय. ही मागणी नेमकी कुणी केली? या संघटनेचा सोयाबीन वायद्यांना विरोध का आहे? वायदे बंद असल्यास शेतकऱ्यांचं काय नुकसान होतंय ? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

    The soybean and soya oil rates were in a bullish trend in the international market in the last season. Due to price rise the government banned the futures soybean and soy meal contracts. After this government decision soybean rates are under pressure. But one association demanded that the continue the ban. But who is demanding this? Watch today's Shet Market Podcast to know the details.

    7 min
  • Soybean Market: पावसामुळे सोयाबीन पिकाची वाढ धीम्या गतीने होत असल्याचा दावा |ॲग्रोवन

     देशात सध्या सोयाबीनचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा काहीसा घटला आहे. पण सततचा पाऊस आणि कीड-रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर होत आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची उत्पादकता कमी राहू शकते असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला. तर उद्योगाच्या मते यंदा सोयाबीन बाजारात उशीरा येऊ शकते. पण सोयाबीनला यंदा उशीर का होईल? कोणत्या भागात सोयाबीन पिकाला पावसाचा फटका बसत आहे? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल. 

    The soybean sowing decreased in the country compared to last season till now. But the continuous rain and pest and disease are also affecting the crop. In this situation soybean productivity may be affected. Also in some parts soybean corp may delay this season. But why will this happen? What is the condition of the soybean crop in the country? Watch today's podcast to know the details.

    7 min
  • Cotton Market: यंदा कापसाची उत्पादकता वाढल्याचा अजब दावा | ॲग्रोवन

     देशात यंदा कापसाची लागवड काही प्रमाणात वाढली. मात्र कापसाला पाऊस आणि कीड-रोगांचा मोठा फटका बसतोय. त्यामुळे उत्पादकता घटण्याचा अंदाज आहे. मात्र पंजाबमधील काॅटन असोसिएशन लिमिटेड या संघटनेने यंदा कापूस उत्पादन २३ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला. या अंदाजात कितपत तथ्य आहे? जाणकारांना याविषयी काय वाटत? कापसाचे दर काय राहतील? जाणून घ्या मार्केट पॉडकास्टमधून.  

    The cotton sowing increased in the country in the current season. But the cotton crop is suffering from the losses due to the rain and pest and disease. But the industry body from the Punjab has predicted a rise in production by 23 percent. But why is this industry body predicted to increase in production? Is this prediction true? How experts reacted to this? Watch today's Shet Market Podcast to know the details.

    7 min
  • Tur Market: सरकारने तुरीवर स्टाॅक लिमिट लावल्यावर काय दर राहील? |ॲग्रोवन

    सध्या तुरीच्या दरातील तेजी कमी झाली. देशात तुरीचा पुरवठा कमी असतानाही दर कमी झाले. तर चालू हंगामातही तूर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मात्र सरकारच्या स्टाॅक लिमिटच्या भीतीमुळं दर दबावात आल्याचं व्यापाऱ्यांंचं म्हणण आहे. मग तुरीला सध्या काय दर मिळत आहे? पुढील काळात दर किती वाढू शकतात? सरकारने स्टाॅक लिमिट लावलं तर दर किती घसरतील? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 


    Bullish trend of tur has been down in the country. The tur rate slashed even though demand has increased. On the other hand, production in the current season may decrease. Traders said that the tur rate has a pressure of fear of stock limit. So, what rate is tur getting in the markets? Watch today's Podcast to know the details.

    7 min
  • Onion Market: बाजारात कांदा आवक घटेल का? |ॲग्रोवन

    बाजारात अद्यापही कांद्याचे दर नरमच आहेत.  सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत आहे. त्यामुळे कांदा दर घसरल्याचे व्यापारी सांगतात. सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तिहेरी फटका बसत आहे. पण तो कसा? बाजारात कांदा आवक का वाढली? सध्या कांद्याला काय दर मिळत आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

    The onion rates are under pressure in the markets. The supply is more than the demand. Traders are saying that due to excess supply rates slashed. In this situation onion producers and farmers are getting a setback. Then what are the onion rates in the markets? Watch today's Podcast to know the details.

    6 min
  • Chana Market: देशात सध्या हरभरा दर दबावात |ॲग्रोवन

    देशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले. तर नाफेडकडे यंदाची खरेदी आणि मागील शिल्लक असा एकूण ३२ लाख टन साठा असल्याचा अंदाज आहे. नाफेडने खुल्या बाजारात विक्रीही सुरु केली. त्यामुळे बाजारात हरभरा दर दबावात आहेत. सणांच्या काळात हरभऱ्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे. मग या काळात हरभरा दर सुधारतील का? हरभऱ्याचा बाजारभाव काय राहू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 
    . 
    The country has produced record chana production in the last season. NAFED has approximately 32 lakh tonnes of chana stock including current season procurement and last season. NAFED started selling chana in the open market. Due to NAFED, the chana market is under pressure. Chana demand may increase in the festival season in the coming days. In this situation will the chance rate increase? Watch today's Podcast to know the details.

    7 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…