
Sign up to save your podcasts
Or


“तुझ्या पापांची क्षमा झालीं आहे” (लूक 7:4).
परुश्याच्या घरी एक स्त्री रडत येशूजवळ येते आणि त्याचे पाय धूते. यात शंका नाहीं कीं जेव्हां शिमोनाने तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आपल्या डोळ्यांच्या खूणेने हे कळविले कीं ही स्त्री पापी आहे आणि येशूनें तिला त्यास स्पर्श करू देता कामा नये, तेव्हां तिला लाज वाटली असेल.
खरोखर, ती पापी होती. लज्जित होणे स्वाभाविक होते. पण जास्त काळ नाहीं.
येशूनें म्हटलें, “तुझ्या पापांची क्षमा झालीं आहे“ (लूक 7:48). आणि जेव्हां आमंत्रित लोक याविषयी कुरकुर करू लागले, तेव्हां त्यानें असे म्हणून तिच्या विश्वासास बळ दिलें, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा“ (लूक 7:50).
लज्जेच्या दुर्बळ प्रभावांशी लढा देण्यात येशूनें तिची कशी मदत केलीं? त्यानें तिला एक अभिवचन दिलें : “तुझ्या पापांची क्षमा झालीं आहे! तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. तुझे भविष्य शांतीपूर्ण असेल.” त्यानें घोषणा केलीं कीं मागील पापांची क्षमा आता भावी शांती उत्पन्न करील.
म्हणून, तिच्यासाठीं मुद्दा होता देवाच्या भावी कृपेत विश्वास, जो येशूच्या क्षमा करण्याच्या कार्याच्या आणि स्वतंत्र करणाऱ्या शब्दाच्या अधिकारात मुळावलेला होता. आमच्यांपैकीं प्रत्येकाने योग्य क्षमेच्या प्रभावांशी याचप्रकारे लढा दिला पाहिजे - खोटी लज्जा नाहीं, पण अशी लज्जा ज्याची आम्हांला खरोखर जाणीव असली पाहिजे, पण अशी लज्जा जी फार काळ टिकून राहण्याची आणि आम्हास निर्बळ करण्यास कारणीभूत ठरते.
आम्हीं आम्हांला लज्जापूर्ण कृत्यांच्या प्राप्त झालेंल्या क्षमेद्वारे येणाऱ्या भावी कृपा आणि शांतीच्या अभिवचनांस धरून ठेऊन दुर्बळ करणाऱ्या लज्जेच्या अविश्वासाला लढा दिला पाहिजे.
आम्हा सर्वांना पाप-क्षमेची गरज आहे. आणि आम्हांला त्याची उद्या गरज भासेल. येशू ते आज आणि उद्या देण्यासाठीं मरण पावला. आज असो वा उद्या, वास्तविकता ही आहेर : देवाची क्षमा आम्हांला आमच्यां भविष्यासाठीं स्वतंत्र करते. ती आम्हांला दुर्बळ करणाऱ्या लज्जेपासून मुक्त करते. क्षमा ही भावी कृपेने परिपूर्ण आहे.
जेव्हां आम्हीं भावी कृपेत, जी देवाच्या क्षमेत मुळावलेली आहे, विश्वासाद्वारे जगतो, तेव्हां आम्हीं त्या लज्जेच्या जी अनुभवण्यास आम्हीं पात्र आहोत, रेंगाळणाऱ्या, कमकूवत करणाऱ्या प्रभावापासून मुक्त होतो. क्षमेचा हाच अर्थ आहे.
“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, ज्या सर्वांना मी यरुशलेमेहून बंदिवान होऊन बाबेलास जायला लावले त्या सर्व बंदिवान झालेंल्यांना मी असे म्हणतो: तुम्हीं घरे बांधून त्यांत वस्ती करा; मळे लावा व त्यांची फळे खा; तुम्हांला पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे हितचिंतन करा व त्यासाठीं परमेश्वराची प्रार्थना करा; त्या नगराचे हित ते तुमचे हित” (यिर्मया 29:4,5,7).)
जर बाबेल येथील देवाच्या बंदिवासातील लोकांसाठीं ते खरे होते, तर या “बाबेलसारख्या” जगातल्या ख्रिस्ती निर्वासितांसाठीं ते आणखी खरे ठरेल. मग आपण काय करावें?
ज्या सामान्य गोष्टी करण्याची गरज आहे त्या केल्या पाहिजेत: घरे बांधणे; त्यात राहणे; बाग लावणे. हे सर्व तुम्हीं खऱ्या राजासाठीं केलेंत आणि फक्त माणसांना खूश करणाऱ्या लोकांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे तर हे तुम्हांला दूषित करत नाहीं.
देवानें तुम्हांला ज्या ठिकाणी पाठवले आहे त्या ठिकाणाचे हितचिंतन करा. देवानें तुम्हांला त्याच्या गौरवासाठीं पाठवले आहे असे आपणाविषयी माना. कारण तुम्हांला त्याच्या गौरवासाठींच पाठवले आहे.
तुमच्या शहराच्या वतीने देवाकडें प्रार्थना करा. शहरासाठीं मोठ्या आणि उत्तम गोष्टी घडाव्या म्हणून प्रार्थना करा. विनंती करा कीं ते देवाच्या सामर्थ्याने आणि त्याच्या गौरवाप्रीत्यर्थ घडावे. शहराला भौतिक समृद्धीची गरज आहे त्यापेक्षा हजारपटीने जास्त ज्या अंतिम चांगल्याची गरज आहे त्याकडें कधीही दुर्लक्ष करू नका. ख्रिस्ती लोक सर्व दुःखांची पर्वा करतात - विशेषतः शाश्वत दुःख. प्रत्येक शहराला भेडसावणारा या सर्वात मोठ्या संकटास सामोरे जावें लागेल.
परंतु देव किंवा त्याचे लोक शहराचे आरोग्य, सुरक्षा आणि समृद्धी आणि स्वातंत्र्य यांबाबत बेपर्वा नाहींत. आम्हा सर्वांना या गोष्टींची गरज आहे, आणि येशूनें म्हटलें, “तू तुझ्या शेजाऱ्यावर तुझ्यासारखी प्रीति कर” (मत्तय 22:39). खरे म्हणजें, प्रभु यिर्मयामध्ये म्हणतो कीं तुमच्या शहरावर प्रीति करणे हा स्वतःवर प्रीति करण्याचा एक मार्ग आहे: “त्या नगराचे हित ते तुमचे हित.”
याचा अर्थ असा नाहीं कीं आपण या जगांत प्रवासी म्हणून आपली दिशाभिमुखता सोडतो. पेत्र म्हणतो कीं ख्रिस्ती लोक “प्रवासी आणि परदेशवासी” आहेत (1 पेत्र 2:11) आणि पौल म्हणतो, “आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे” (फिलिप्पै 3:20). वस्तुतः, या जगाच्या भुलविणाऱ्या आकर्षणांपासून स्थिरपणे दूर राहून आपण या जगाचे जास्तीत जास्त हित करू. “जे नगर पुढे येणार आहे” (इब्री 13:14) त्यातून आपली मूल्ये प्राप्त करण्याद्वारे आम्हीं आपल्या शहराची उत्तमप्रकारे सेवा करू. “वर असलेल्या यरूशलेम” चे नागरिक होण्यासाठीं आम्हीं आपल्या शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना बोलावून आम्हीं आपल्या शहराचे सर्वात हितचिंतन करू (गलती 4:26).
तर, चला जगूया – शक्य तितके हितचिंतन करूया (1 पेत्र 2:12) - कीं स्थानिकांना आमच्यां राजाला भेटावेसे वाटेल-
“हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.“ (लूक 12:32)
पैशाबद्दल किंवा जगाच्या इतर गोष्टींबद्दल आपण भिती धरता कामा नये अशी देवाची इच्छा आहे कारण ती निर्भयता - चिंतापासून मुक्ती - त्याच्याविषयी पाच महान गोष्टींत आपली वाढ करील.
प्रथम, भयभीत न होणे हे दाखवते कीं आपण देवाला आपला मेंढपाळ म्हणून मूल्यवान समझतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस.” आपण त्याचे कळप आहोत आणि तो आपला मेंढपाळ आहे. आणि जर तो आपला मेंढपाळ आहे, तर स्तोत्र 23:1 लागू होते: “परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काहीं उणे पडणार नाहीं” - म्हणजें, मला खरोखर ज्या गोष्टीची गरज आहे त्यांची उणीव भासणार नाहीं.
दुसरे, न भिणे हे दाखवते कीं आम्हीं देवाला आपला पिता म्हणून मूल्यवान समजतो. "तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे." आम्हीं फक्त त्याचे लहान कळप नाहीं; आम्हीं त्याची मुले सुद्धा आहोत आणि तो आमचा पिता आहे. त्याला खरोखर आमची काळजी आहे आणि आम्हांला काय हवे ते तो जाणतो आणि ज्याची तुम्हांला गरज आहे ते तुमच्याजवळ आहे याची खात्री करण्यासाठीं तो तुमच्यासाठीं कार्य करेल.
तिसरे, चिंता न करणे हे दाखवते कीं आपण देवाला राजा म्हणून मूल्यवान समजतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस, कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” तो आम्हांला “राज्य” देऊ शकतो कारण तो राजा आहे. जो आमची तरतूद करतो त्यात हे सामर्थ्याचा एक प्रचंड घटक जोडते. “मेंढपाळ” संरक्षण आणि तरतूद दर्शवितो. “पिता” प्रेम आणि सौम्यता आणि अधिकार आणि तरतूद आणि मार्गदर्शन. दर्शवितो. “राजा” सत्ता आणि सार्वभौमत्व आणि संपत्तीचा सूचक आहे.
चौथे, न भिणे हे दर्शविते कीं देव किती मोकळ्या स्वभावाचा आणि उदार आहे. लक्ष द्या, तो राज्य देतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस, कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” तो राज्य विकत नाहीं किंवा राज्य भाड्याने देत नाहीं किंवा राज्य भाडेपट्टीवर देत नाहीं. तो अतिशय श्रीमंत आहे आणि त्याला आमच्यांकडून मोबदला देण्याची गरज नाहीं. तर, देव उदार आहे आणि विपुलतेतून मुक्तहस्ते देतो. आणि जेव्हां आपण भीत नाहीं, तर आपल्या गरजांसाठीं त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हां आपण याविषयी त्याची वाखाणणी करतो.
शेवटी, न भिणे - काळजी न करणे - हे दर्शविते कीं देव ते खरोखर करू इच्छितो यावर आपण विश्वास ठेवतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस, कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” त्यामुळे त्याला आनद होतो. तो जळफळत नाहीं. आम्हांला राज्य देऊन तो आनंदित होतो. आमच्यां सर्वांचेच पिता असे नव्हते, ज्यांना प्राप्त करण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद वाटतो. पण ते दुःख आता मुख्य गोष्ट नाहीं, कारण आता तुम्हांला असा पिता, मेंढपाळ आणि राजा मिळू शकतो.
म्हणून, या वचनाचा मुद्दा असा आहे कीं आपण देवाला आपला मेंढपाळ आणि पिता आणि राजा म्हणून आपले धन समजले पाहिजे जो उदार होऊन आम्हास देवाचे राज्य देण्यात आनंद मानतो - आम्हांला स्वर्ग देण्यासाठीं, आम्हांला सार्वकालिक जीवन आणि आनंद देण्यासाठीं, आणि आम्हांला गरज असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठीं. तेथे जाण्यासाठीं जर आपण अशाप्रकारे देवाला आपले धन समजतो तर आपण निर्भय होऊ आणि देवाची उपासना केलीं जाईल.
”माझ्यामुळे जेव्हां लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हां तुम्हीं धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.“ (मत्तय 5:11,12)
मत्तय 5:44 मधून आपल्या शत्रूंवर प्रीति करण्याविषयी संदेश देत असतांना जे प्रश्न मी विचारले त्यापैकीं एक होता, तुमचे अपहरण करणाऱ्या आणि मग तुमचा खून करणाऱ्या लोकांवर तुम्हीं कशी प्रीति कराल?
हे आम्हीं कसे करू शकतो? अशाप्रकारची प्रीति करण्याची सामर्थ्य कोठून येते? वास्तविक जगात जेव्हां ते प्रगट होते तेव्हां हे किती आश्चर्यकारक असते याचा विचार करा! ख्रिस्ताचे सत्य आणि सामर्थ्य आणि वास्तविकता प्रीतिपेक्षा इतर कुठल्या गोष्टीद्वारे दाखविली जाऊ शकतांत का?
माझा विश्वास आहे कीं येशू आम्हांला ह्या आमुलाग्र, आत्म-बलिदानात्मक प्रीतिची किल्ली देतो, जिचे वर्णन याच अध्यायात पूर्वी, मत्तय 5:44 मध्ये करण्यात आले आहे.
मत्तय 5:11 मध्ये, तो पुन्हा एकदा छळ होण्याविषयी बोलत आहे, जसा तो बोलत होता जेव्हां त्यानें मत्तय 5:44 मध्ये म्हटलें, “तुम्हीं आपल्या वैर्यांवर प्रीति करा, आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात, त्यांच्यासाठीं प्रार्थना करा.“ या वचनांविषयी उल्लेखनीय हे आहे कीं येशू म्हणतो कीं तुम्हीं केवळ शत्रूचे गैरवर्तन सहन करण्यास समर्थच होऊ नका, तर तुम्हीं त्यात आनंदहि करा. “माझ्यामुळे जेव्हां लोक तुमची निंदा व छळ करतील... तेव्हां तुम्हीं धन्य. आनंद करा व उल्लास करा.”
आनंद करनें आपल्या वैर्यांसाठीं प्रार्थना करण्यापेक्षा किंवा त्यांचे कल्याण करण्यापेक्षा आमच्यां आटोक्याबाहेरचे वाटते. जर मी ही मानवीदृष्ट्या अशक्य गोष्ट करू शकलो - म्हणजें, छळ होत असतांना आनंद करणे - तर माझा छळ करणाऱ्यांवर प्रीति करणे शक्य होईल. जर अन्याय आणि यातना आणि हानीच्या दहशतीत आनंदाचा चमत्कार घडू शकला, तर गुन्हेगारांप्रीत्यर्थ प्रीतिचा चमत्कारही घडू शकतो.
येशू या वचनांमध्ये आम्हांला आनंदाची गुरुकिल्ली देतो. तो म्हणतो, “आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे” आनंदाची गुरुकिल्ली आहे देवाच्या भावी कृपेवर विश्वास ठेवणे –म्हणजें, देव तुमच्यासाठीं जे होण्याचे अभिवचन देतो त्यात समाधानी असणे. तो म्हणतो, “आनंद करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे.” छळवनूक होत असतांना आपला आनंद म्हणजें दहशतीच्या या क्षणी परत येण्याचा आणि आम्हांला प्रीति करण्यासाठीं स्वतंत्र करण्याचा स्वर्गाचा आनंद. म्हणून, हा आनंद म्हणजें आपल्या शत्रूंवर प्रेम करण्याचे मुक्त सामर्थ्य आहे जेव्हां ते आपला छळ मांडतात.
जर ते खरे असेल, तर प्रीति करण्याची आज्ञा म्हणजें स्वर्गातील गोष्टींवर आपले मन लावण्याची आज्ञा देखील आहे - देव आपल्यासाठीं जे बनण्याचे अभिवचन देतो - पृथ्वीवरील गोष्टींवर नाहीं (कलस्सै. 3:2).
आपल्या वैर्यांवर प्रेम करण्याची आज्ञा आमची आशा आणि आमच्यां जीवाचे सखोल समाधान आणि त्याचे सर्वात मोठे प्रतिफळ - त्याची भावी कृपा देवामध्ये शोधण्याची आज्ञा आहे. आमूलाग्र प्रेमाची किल्ली भावी कृपेत विश्वास आहे. आमच्यां वेदनेत आम्हास हे कळले पाहिजे कीं देवाची प्रीति “जीवनाहून उत्तम” आहे (स्तोत्र 63:3). आपल्या वैर्यांवर प्रीति केल्याने तुम्हांला स्वर्गात प्रतिफळ प्राप्त होत नाहीं. तर स्वर्गाचे प्रतिफळ जोपासल्याने वैर्यांवर प्रीति करण्याचे सामर्थ्य तुम्हास प्राप्त होते.
तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणाऱ्यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय करणाऱ्यांसाठीं मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केलें आहेस. (स्तोत्र 31:19).
स्तोत्र 31:19 मधील दोन महत्त्वपूर्ण सत्यांवर विचार करा.
1. देवाचा चांगुलपणा
देवाचे एक विशिष्ट चांगुलपण आहे. अर्थात, फक्त देवाचे ते सामान्य चांगुलपणच नव्हे जो तो सर्व लोकांवर प्रगट करतो, तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो (मत्तय 5:45), तर जसे स्तोत्र म्हणते, एक विशिष्ट चांगुलपण, “त्याचे भय धरणाऱ्यांसाठीं”.
हे चांगुलपण अमर्याद प्रमाणात थोर आहे. ते विपुल आहे. ते कायम टिकून राहते. ते सर्वसमावेशक आहे. जे त्याचे भय धरतात फक्त त्यांच्यासाठीं हे चांगुलपण आहे. सर्व काहीं त्यांच्या भल्याकरिता एकत्र मिळून कार्य करते (रोम 8:28) - रोम 5:3 आणि 5 नुसार त्यांच्या वेदना देखील सर्व-कल्याणकारक आहेत.
पण जे त्याचे भय धरत नाहींत त्यांना तात्पुरता चांगुलपणा लाभतो. रोमकरांस 2: 4 आणि 5 याचे असे वर्णन करते: ”किंवा देवाची ममता तुला पश्चात्तापाकडें नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? कीं, आपल्या हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठीं स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?” ममता. क्षमा. सहनशीलता. चांगुलपण. पण ते परमेश्वराचे भय धरतांत म्हणून नव्हे तर त्यांच्या हटवादीपणामुळें.
हे पहिले सत्य आहेः परमेश्वराचे चांगुलपण.
2. परमेश्वराचे भय
परमेश्वराचे भय म्हणजें त्याच्यापासून भटकून दूर जाण्याचे भय आहे. त्यामुळे, ते देवाचा आश्रय घेण्यात व्यक्त होते. म्हणूनच स्तोत्र 31:19 मध्ये दोन अटींचा उल्लेख केलेंला आहे - परमेश्वराचे भय बाळगणे आणि त्याच्याठायीं आश्रय घेणे. “तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणारयांकरता तू ते 1) साठवून ठेवले आहेस, 2) तुझा आश्रय करणणाऱ्यांसाठीं मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केलें आहेस.” ते विरुद्ध असल्यासारखे वाटतात. भय दूर सारत असल्यासारखे वाटते आणि आश्रय घेणे जवळ ओढल्यासारखे वाटते. परंतु जेव्हां आपण पाहतो कीं हे भय पळून जाण्याचे भय आहे - त्याजपासून दूर भटकून जाण्याचे भय आहे - तेव्हां ते एकत्र काम करतात.
पवित्र जणांच्या अंतःकरणात खरा थरकाप असतो. ”भीत व कापत आपले तारण साधून घ्या.“ (फिलिप्पै 2:12). पण हा थरकाप त्या पित्याच्या बाहूंत वाटणारा थरकाप आहे ज्याने नुकतेच आपल्या मुलाला समुद्राच्या पृष्ठभागाखालील प्रवाहातून बाहेर काढले आहे. आम्हांला पित्याची गरज नाहीं हा विचार करण्याच्या भयंकर संभावनेचा हा थरकाप आहे.
म्हणून, देवाच्या चांगुलपणाची जोपासणूक करा. त्याच्यापासून भटकून दूर जाण्याच्या विचाराने भयभीत व्हां. प्रत्येक पापापासून पळ काढा आणि त्याच्याठायीं आश्रय घ्या. “तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणाऱ्यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय करणाऱ्यांसाठीं मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केलें आहेस!”
“भिऊ नका, हे दुष्कर्म तुम्हीं केलें आहे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडें वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा; ज्या निरर्थक वस्तूंपासून तुम्हांला काहीं लाभ किंवा तुमचा उद्धार होणे शक्य नाहीं त्यांच्यामागे लागू नका, कारण त्या केवळ निरर्थक होत. परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाहीं, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केलें आहे.” (1 शमुवेल 12:20-22).
जेव्हां इस्राएली लोकांना त्यांनी शमुवेलाला इतर राष्ट्रांप्रमाणे राजा मिळावा म्हणून अशी मागणी केल्याबद्दल भयभीत केलें केलें आणि त्यांनी केलेंल्या पापाबद्दल पश्चात्ताप करण्यास सांगितले, तेव्हां ही चांगली बातमी येतेः “भिऊ नका; हे दुष्कर्म तुम्हीं केलें आहे खरे.” ते किती उलट वाटते हे तुम्हीं ऐकता का - किती अद्भुतरित्या उलट? तुंम्हाला वाटेल त्यानें असे म्हणावयाला पाहिजे होते, “भीती बाळगा, कारण हे दुष्कर्म तुम्हीं केलें आहे.” हे घाबरण्याचे उत्तम कारण आहेः देवाशिवाय दुसरा राजा मागण्याचे मोठे दुष्कृत्य तुम्हीं केलें आहे! पण शमूवेलाने तसे म्हटलें नाहीं. “भिऊ नका; हे दुष्कर्म तुम्हीं केलें आहे खरे.”
पुढे तो असे म्हणतो, “पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडें वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा; ज्या निरर्थक वस्तूंपासून तुम्हांला काहीं लाभ किंवा तुमचा उद्धार होणे शक्य नाहीं त्यांच्यामागे लागू नका, कारण त्या केवळ निरर्थक होत.”
ही ती सुवार्ता आहे: तुम्हीं महा पाप केलें खरे, आणि परमेश्वराचा भयंकर अनादर केला खरे, जरी तुम्हांला आता एक राजा मिळाला आहे ज्याची मागणी करण्याचे दुष्कर्म तुम्हीं केलें होते, जरी त्या पापास किंवा त्याचे दुःखदायक परिणाम जे अद्याप तुमच्यावर प्रगट झालें नाहींत, परत बदलता येत नाहीं, तरीही एक भविष्य आणि आशा आहे. तुम्हांवर दया केलीं जाईल.
भिऊ नका! भिऊ नका!
मग 1 शमुवेल 12:22 मध्ये सुवार्तेचा मोठा आधार येतो - सुवार्तेचा आधार आणि पाया. हे सर्व दुष्कर्म करूनही तुम्हांला भिण्याची गरज का नाहीं? “परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाहीं, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केलें आहे.”
देवाची त्याच्या स्वतःच्या नामास्तव असलेली वचनबद्धता सुवार्तेचा आधार आहे. तुम्हांला हे कळलें का? तुम्हीं पाप केलें असले तरी भिऊ नका, “परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाहीं.” याचा तुमच्यावर दोनप्रकारे परिणाम घडून यायला पाहिजे : अंतःकरण विदारून टाकणारी नम्रता आणि पायांनी नृत्य करावा इतका आनंद. नम्रता कारण तुमच्या तारणाचा पाया तुमची योग्यता नाहीं. आनंद कारण तुमचे तारण हे देवाच्या स्वतःच्या थोर नामास्तव असलेल्या निष्ठेइतकेच खात्रीलायक आहे. हि खात्री आमच्यां कल्पनेपलीकडें आहे.
शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. ज्या सैनिकांच्या मनांस देवाकडून स्फूर्ती झालीं ते त्याच्याबरोबर गेले. (1 शमुवेल 10:26).
या वचनात काय म्हटलें आहे यावर काहीं क्षण विचार करा. देवानें त्यांना स्फूर्ती दिलीं, किंवा देवानें त्यांना स्पर्श केला. बायकोने नाहीं. मुलाने नाहीं. पालकाने नाहीं. सल्लाकाराने नाहीं. तर देवानें. देवानें त्यांना स्फूर्ती दिलीं/स्पर्श केला.
त्यानें जो जो विश्वात अपरिमित सामर्थ्याचा धनी आहे. अनंत अधिकार आणि अनंत ज्ञान आणि अमर्याद प्रेम आणि अमर्याद चांगुलपणा आणि अमर्याद पवित्रता आणि अपरिमित न्याय असलेला. त्या देवानें त्यांच्या मनांस स्फूर्ती दिलीं.
बृहस्पतिचा परिघ रेणूच्या काठास कसा स्पर्श करतो? त्याच्या नाभीत प्रवेश करणे तर दूर राहिले?
देवाचा स्पर्श किंवा त्याचे मनांस स्फूर्ती देणे अद्भुत आहे, केवळ यामुळे नाहीं कीं स्पर्श करणारा वा स्फूर्ती देणारा देव आहे, तर यामुळे देखील कीं तो स्पर्श आहे. हा एक वास्तविक संबंध आहे. त्या स्पर्शाचा संबंध आमच्यां मनांशी असणें हे अद्भुत आहे. स्पर्शाचा संबंध देवाबरोंबर आहे हे अद्भुत आहे. आणि तो वास्तविक स्पर्श आहे हे अद्भुत आहे.
शूर पुरुषांना उद्देशून फक्त बोलले जात नव्हते. त्यांच्यावर केवळ दैवी प्रभाव टाकींला जात नव्हता. त्यांची केवळ भेंट घेऊन निवड केलीं गेलेली नव्हती. देवानें, आपल्या अमर्याद कृपाळूतेने, त्यांच्या मनांस स्फूर्ती दिलीं. देव इतका जवळ होता. तरी ते भस्म झालें नाहींत.
मला तो स्पर्श आवडतो. मला तो आणखी हवा आहे. माझ्यासाठीं आणि तुम्हा सर्वांसाठीं. मी प्रार्थना करतो कीं देवानें मला त्याच्या गौरवाने आणि या गौरवाप्रीत्यर्थ नव्याने स्पर्श करावा. मी प्रार्थना करतो कीं त्यानें आम्हा सर्वांच्या मनांस स्फूर्ती द्यावी.
ओहो, देवाचा तो स्पर्श मिळावा! जर तो स्पर्श अग्नीसह करण्यांत आला, तर तसेच व्हावे. जर तो पाण्याने केला जात असेल तर असेच व्हावे. तो वाऱ्याने केला जात असेल तर तो तसाच व्हावा. जर तो मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह होत असेल, तर आपण तो समर्पित अंतकरणाने घेऊं.
हे परमेश्वरा, ये. इतक्या जवळ ये. भस्म कर आणि भिजव आणि वार कर आणि चुरगळा कर. किंवा शांत आणि मंदपणे, ये. ये. आमच्यां अंतःकरणास स्पर्श कर.
देवावर प्रीति करणे म्हणजें त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहींत कारण जे काहीं देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजें आपला विश्वास. (1 योहान 5:3-4).
लक्ष द्याः देवावर प्रीति करणे हे केवळ त्याच्या आज्ञांचे पालन करणे नव्हे. तर देवावर प्रीति करणे देवासाठीं एका विशिष्ट प्रकारचे अंतःकरण बाळगणे कीं जेणेकरून आज्ञा पाळणे कठीण असणार नाहीं. योहान हेच म्हणतो. पण मग तो हे सत्य प्रीतिच्या संदर्भात न मांडता तो ते नवा जन्म व विश्वास या संदर्भात मांडतो: “जे काहीं देवापासून जन्मलेले आहे ते जगावर विजय मिळवते. म्हणून, नवा जन्म म्हणजें देवाच्या आज्ञा त्याला बोजड वाटत नाहीं आणि आज्ञेचे पालन करतांना जगीक अडचणींवर मात करतो.
आणि शेवटी तो पुढे म्हणतो, “आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजें आपला विश्वास“ म्हणून, नवा जन्म भारमुक्त आज्ञापालनाप्रत येणाऱ्या सर्व जगीक अडचणींवर मात करतो, कारण नवा जन्म विश्वासात वाढ करतो. म्हणून, नव्या जन्माचा चमत्कार विश्वास उत्पन्न करतो, अत्यंत संतोषकारक म्हणून ख्रिस्तामध्ये आपल्यासाठीं देव जो काहीं आहे ते स्वीकारतो, जे जगाच्या परीक्षांपेक्षा देवाप्रत आज्ञाधारकतेस अधिक इच्छिण्यायोग्य बनवते. आणि देवावर प्रीति करण्याचा हाच अर्थ आहे.
अठराव्या शतकातील पाळक आणि पवित्र शास्त्राचे विद्वान जोनाथन एडवर्ड्स यांनी या वचनाशी संघर्ष केला आणि असा निष्कर्ष काढला, “तारणदायक विश्वास . . . प्रेम अभिव्यक्त करतो. . . देवावरील आमचे प्रेम आम्हांला देवाच्या आज्ञा पाळण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य देते - जे दर्शविते कीं तारणदायक विश्वासात, त्याचे जीवन आणि सामर्थ्य यात प्रेम ही मुख्य गोष्ट आहे, ज्याद्वारे ते मोठे परिणाम घडवून आणतात.”
माझ्या मते एडवर्डचे बरोबर आहे आणि बायबलमधील असंख्य वचने तो जे काहीं म्हणतो त्याचे समर्थन करतात.
असे म्हणण्याची आणखी एक पद्धत ही कीं ख्रिस्तावरील विश्वास देव आमच्यांसाठीं काय आहे याची केवळ सहमती देणेच नाहीं तर तो ख्रिस्तामध्ये आमच्यांसाठीं जो काहीं आहे त्या सर्वांचा स्वीकार करणे देखील आहे. “खरा विश्वास ख्रिस्ताचा त्याप्रकारे स्वीकार करतो ज्या प्रकारे पवित्र शास्त्र दरिद्री पापी लोकांप्रत त्यास सादर करतो” - हे एडवर्ड्सचे दुसरे उद्धरण आहे. हे “कवटाळणे” ख्रिस्तावरील एक प्रकारचे प्रेम आहे - असे प्रेम जे त्याला इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक मूल्यवान समजते.
म्हणून, एकींकडें 1 योहान 5:3, जे म्हणते देवासाठीं आमची प्रीति आम्हांला त्याच्या आज्ञांचे पालन करण्यास समर्थ बनविते, आणि दुसरीकडें, 4थे वचन जे म्हणते कीं आमचा विश्वास देवाच्या आज्ञांचे पालन करण्यापासून आम्हास रोखणाऱ्या अडखळणांवर मात करतो, यांत विरोधाभास नाहींच. देव आणि ख्रिस्त ह्यांच्यावर प्रीति विश्वासात गर्भित आहे.
मग योहान आज्ञा पाळणाऱ्या विश्वासाची अशा प्रकारे व्याख्या करतो “येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो” (1 योहान 5:5). हा विश्वास वर्तमान येशूला गौरवी दैवी व्यक्ती जो तो आहे असे म्हणून “स्वीकार करतो.” हे फक्त या सत्यास सहमति देणे नव्हे कीं येशू हा देवाचा पुत्र आहे, कारण दुरात्मेसुद्धा हे मान्य करतात. “तेव्हां पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे येशू, देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला पिडण्यास येथे आला आहेस काय?” (मत्तय 8:29). येशू हा देवाचा पुत्र आहे हा विश्वास करण्याचा अर्थ त्या सत्याचे महत्व - वास्तविकतेचे मूल्य “स्वीकार करणे” होय. याचा अर्थ देवाचा पुत्र म्हणून ख्रिस्तासोबत आणि त्याच्याठायीं देव आमच्यांसाठीं जे काहीं आहे त्यात संतुष्ट होणे होय.
“देवाचा पुत्र” म्हणजें येशू हा त्याच्या पित्याच्या उजवीकडें असलेला विश्वातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहे. म्हणून, त्यानें जे काहीं शिकवले ते खरे आहे, आणि त्यानें जे काहीं अभिवचन दिलें ते स्थिर राहील आणि आत्म्यास संतुष्ट करणारी त्याची सर्व महानता कधीही बदलणार नाहीं.
म्हणून, तो देवाचा पुत्र आहे हा विश्वास धरणे, या सर्वांवर अवलंबून राहणे, आणि त्यात संतुष्ट होणे होय.
आम्हीं भस्म झालो नाहीं ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाहीं.ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे. (विलापगीत 3:22-23).
परमेश्वराची करुणा रोज सकाळी नवी होते कारण दररोज त्या दिवसासाठीं पुरेशी करुणा मुबलक प्रमाणांत उपलब्ध असते. देव प्रत्येक दिवसाचे दुःख ठरवितो. तसेंच देव प्रत्येक दिवसासाठीं करुणा देखील ठरवितो. त्याच्या मुलांच्या जीवनात, दु:ख व करुणा परिपूर्णपणे ठरविण्यात आलेलें आहेंत. येशूनें म्हटलें, ”ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.“ (मत्तय 6:34). ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. प्रत्येक दिवशी त्याची दया किंवा करुणा ठरविली आहे. प्रत्येक दिवस दर सकाळी नवा होतो.
परंतु जेव्हां आपल्याला वाटते कीं आजच्या साधनसामुग्रीवर उद्याचा भार आपल्याला सहन करावा लागू शकतो तेव्हां आपण कित्येकदा निराश होतो. देवाला वाटते कीं आपण हे जाणावे कीं असे होणार नाहीं. आजची करुणा आजच्या दुःखांसाठीं आहे. उद्याची करुणा ही उद्याच्या दुःखांसाठीं असणार आहे.
कधीकधी आपण विचार करतो कीं भयंकर परीक्षेत स्थिर उभे राहण्यासाठीं आम्हांवर करुणा केलीं जाईल कीं नाहीं. होय, केलीं जाईल. पेत्र म्हणतो, ”ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्हीं धन्य आहात; कारण गौरवाचा आत्मा म्हणजें ‘देवाचा आत्मा’ तुमच्यावर येऊन ‘राहिला आहे.’ त्यांच्याकडून त्याची निंदा होते, पण तुमच्याकडून तो गौरविला जातो“ (1 पेत्र 4:14). जेव्हां निंदा होते, तेव्हां गौरवाचा आत्मा येतो. स्तेफनाला दगडमार होत असतांना असे घडले. तुमच्यासाठीं देखील असेंच घडेल. जेव्हां आत्म्याची आणि गौरवाची गरज भासेल, तेव्हां ते येतील.
रानात मान्ना एका दिवसाला एकदाच दिला जात असे. साठवणूक करायची नव्हती. देवाच्या दयेवर आपण अशाच प्रकारे अवलंबून राहिले पाहिजे. उद्याची ओझी उचलण्याचे बळ तुम्हांला आज प्राप्त होणार नाहीं. आजच्या दुःखांसाठीं तुम्हांला करुणा देण्यात आली आहे.
उद्या करुणा नवी होईल. ”ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे.“ (1 करिंथ 1:9).
“निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका; त्यांना आवरण्यासाठीं लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ येणार नाहीं.” (स्तोत्र 32:9).
असे कल्पनाचित्र रंगवा कीं देवाचे लोक सर्व प्रकारच्या प्राण्यांचे खळे आहे. देव त्याच्या प्राण्यांची काळजी घेतो, त्यांना कोठे जायचे आहे ते दाखवतो, आणि त्यांच्या जीवनासाठीं धान्याचे कोठार बांधतो.
परंतु प्राण्यांच्या ह्या खळ्यांत एक जनावर आहे जे देवाला भयंकर त्रास देते, ते म्हणजें खेचर. ते मूर्ख आहे आणि ते हट्टी आहे आणि यांपैकीं कोणता अवगुण प्रथम आहे हे तुम्हीं ओळखू शकत नाहीं - हट्टीपणा कीं मूर्खपणा.
आता देव ज्या प्रकारे त्याच्या प्राण्यांना अन्न देण्यासाठीं आणि त्यांना निवारा देण्यासाठीं कोठारात नेतो ते हे शिकवून कीं त्यांना सर्वांना एक वैयक्तिक नाव आहे आणि नंतर त्यांना नावाने हाक मारणे. ”मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन” (स्तोत्र 32:9).
पण खेचर त्या प्रकारच्या बोधाला किंवा मार्गदर्शनाला प्रतिसाद देणार नाहीं. त्याला समज नाहीं. म्हणून देव त्याच्या पिक-अप ट्रकमध्ये बसतो आणि शेतात जातो, खेचराच्या तोंडात ओठाळी आणि लगाम घालतो, त्याला ट्रकला जुंपतो आणि त्याला ओडत खळ्यात नेतो जेथे तो ताठ पायांनी आणि फुरफुरत जातो.
देवाची अशी पद्धत नाहीं कीं त्याच्या प्राण्यांनी त्याच्याकडें आशीर्वाद आणि संरक्षणासाठीं अशाप्रकारे यावे.
पण एक दिवस असा येईल जेव्हां त्या खेचराला खूप उशीर झालेंला असेल. त्याच्यावर गारांचा वार होणार आहे आणि विजेचा कडकडाट होणार आहे, आणि जेव्हां तो धावत येईल तेव्हां खळ्याचे दार बंद झालेंलें असेल.
म्हणून, खेचरांसारखे होऊ नका. “निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका; त्यांना आवरण्यासाठीं लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ येणार नाहींत.”
त्याऐवजी, देव पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने त्याला प्रार्थना करावी (स्तोत्र 32:6).
खेचरासारखे न होणें म्हणजें स्वतःला नम्र करणे, प्रार्थनेत देवाकडें येणे, आपली पापे कबुल करणे आणि शेतातील गरजू लहान पिल्लांप्रमाणे त्याच्या संरक्षणाच्या आणि तरतूदीच्या खळ्यात जाण्यासाठीं देवाचे मार्गदर्शन स्वीकारणे.