
Sign up to save your podcasts
Or


त्यांना तू भिऊ नकोस; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो. (यिर्मया 1:8)
प्रभूची सेवा करण्यात एक मोठे अडखळण, विशेषेकरून तरुणांमध्यें, म्हणजे नाकारले जाण्याची आणि विरोधाची भीती आहे.
ज्याप्रकारे आपण वागतो किंवा बोलतो हे काहीं लोकांना कसे आवडणार नाहीं याविषयी सर्व प्रकारचे विचार मनात प्रवेश करतात. लोक असहमत होऊ शकतात किंवा अडखळू शकतात. माझ्याकडून एखादी चूक होऊ शकते आणि त्यामुळे माझी टीका केलीं जाऊ शकते.
मनुष्याची भीती ही सेवाकार्यात एक मोठे अडखळण आहे.
म्हणून देव म्हणतो, भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला सोडवीन. देवाचे सान्निध्य आणि स्वीकृती मनुष्यांच्या सर्व प्रशंसापेक्षा अधिक मूल्यवान आहे. आणि देव म्हणतो कीं, तुमच्या सर्व संकटांत आणि संकटांतून मी तुम्हांला सोडवीन. शेवटी तुम्हीं विजयी व्हाल. तुम्हीं महाविजयी व्हाल.
आणि हेच अभिवचन आज ख्रिस्त येशूमध्यें आम्हा सर्वांना देण्यात आले आहेः
म्हणून देव तरुण यिर्मयाला म्हणाला, आणि देव आज तरुणांना म्हणतो ज्यांना तो त्याची सेवा करण्यासाठीं पाचारण करीत आहे - आणि आमच्यापैकीं सर्वांनाच “मी बाळ आहे असे म्हणू नकोस“ किंवा मी खूप म्हातारा आहे, किंवा मी आणखी काहीं आहे (यिर्मया 1:7). का?
ज्यानें तुम्हाआम्हांला आपल्यां गौरवासाठीं व सात्त्विकते-साठीं पाचारण केलें त्याच्या ओळखीच्या द्वारें, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्यां सर्व गोष्टी आपल्यांला दिल्यां आहेत. (2 पेत्र 1:3)
पवित्र शास्त्र ज्यां सामर्थ्याचे श्रेय ज्ञानाला देते ते पाहून मी चकित होतो.
परत एकदा वाचा 2 पेत्र 1:3 : ज्यानें तुम्हाआम्हांला आपल्यां गौरवासाठीं व सात्त्विकते-साठीं पाचारण केलें त्याच्या (देवाच्या) ओळखीच्या द्वारें, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्यां सर्व गोष्टी आपल्यांला दिल्यां आहेत.
अक्षरशः, जीवन जगण्यासाठीं आणि भक्तीमान होण्यासाठीं देवाकडून जे सामर्थ्य उपलब्ध आहे ते सर्व ज्ञानाद्वारें उपलब्ध आहे! अद्भुत! शास्त्रवचनांतील सिद्धांत आणि शिकवणीवर आपण किती जोर द्यायला पाहिजे! हा साधारण विषय नाहीं, हा जीवन व सुभक्तीचा गंभीर विषय आहे.
विषय हा नाहीं कीं ज्ञानामुळे सुभक्तीमानतेची हमी प्राप्त होते. तसे नाहीं. पण असे दिसून येते कीं अज्ञान अभक्तीची हमी देते. कारण, पेत्र म्हणतो, सात्त्विकतेकडें नेणारे ईश्वरी सामर्थ्य देवाच्या ओळखीच्या द्वारें म्हणजेच ज्ञानाद्वारें दिले जाते.
येथे तीन अर्थ, एक ताकींद, व एक उत्तेजन आहे.
1. वाचा! वाचा! वाचा! पण ईश्वरविज्ञानाच्या बाह्य फेणावर आपला वेळ वाया न घालविण्याविषयी सावध असा. “ज्यानें तुम्हाआम्हांला आपल्यां गौरवासाठीं व सात्त्विकते-साठीं पाचारण केलें” त्याच्याविषयी समृद्ध सिद्धांत विषयक पुस्तके वाचा.
2. मनन करा! मनन करा! शांतचित्त व्हां. तुम्हीं बायबल वाचता तेव्हां त्याच्या अर्थ काय, याविषयी विचार करण्यात वेळ घालवा. प्रश्न विचारा. मनन नमूद करण्यासाठीं जवळ एक दैनंदिनी ठेवा. पेचांत टाकणाऱ्या गोष्टींद्वारें स्वतःचे मन नम्रपणे विव्हळ होऊ द्या. सत्याच्या वृक्षावरील वरवर पाहता दिसणाऱ्या दोन परस्पर विरोधी शाखांचे एकत्रित करणारे मूळ पाहण्याचा प्रयत्न करण्याद्वारें सखोल अंतर्दृष्टी प्राप्त होते.
3. चर्चा करा. चर्चा करा. एका लहान गटाचा भाग बना जो सत्याची उत्कटपणे पर्वा करतो. असा गट नाहीं ज्याला फक्त बोलून समस्या उत्पन्न करणे आवडते. पण असा गट ज्याचा असा विश्वास आहे कीं बायबलच्या प्रश्नांची उत्तरे बायबल मध्येंच आहेत आणि ती शोधून काढता येतात.
ताकींद : “ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे” (होशे 4:6).“मी त्यांच्याविषयी साक्ष देतो कीं, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाहीं” (रोमकरांस10:2). म्हणून अज्ञानाच्या घातक परिणामांविषयी सावध असा.
उत्तेजन : “चला, आपण परमेश्वरास ओळखू; परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू” (होशे 6:3).
म्हणून आपल्यांसाठीं ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले तसेच तुम्हींही तेच मनोवृत्तिरूपी शस्त्र धारण करा; कारण ज्यानें देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे. (1 पेत्र 4:1)
प्राथमिक दृष्ट्या हे वचन आपल्यांला पेचांत टाकते. ख्रिस्ताला पापापासून निवृत्त व्हावें लागले का? नाहीं! “त्यानें पाप केलें नाहीं” (1 पेत्र 2:22).
मग अचानक उमजते. जेव्हां आम्हीं स्वतःला या विचाराचे मनोवृत्तिरूपी शस्त्र धारणकरतो कीं ख्रिस्ताने आमच्यासाठीं दुःख सहन केलें, तेव्हां आम्हांला कळून येते कीं आम्हीं त्याच्यासोबत मेलो. “त्यानें स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठीं कीं, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठीं जगावे.” जेव्हां आम्हीं त्याच्यासोबत मरतो, तेव्हां आम्हीं पापापासून निवृत्त होतो.
हे अगदी रोमकरांस 6 प्रमाणें आहे : हे आपल्यांला ठाऊक आहे कीं, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यांतील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे..... तसे तुम्हींही ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याद्वारें स्वत:स पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना” (रोमकरांस 6:6–7, 11).
पेत्र म्हणतो, “तुम्हींही तेच मनोवृत्तिरूपी शस्त्र धारण करा!”
पौल म्हणतो, “स्वत:स पापाला मेलेले असे माना!”
पापाविरूद्ध आमचे जे युद्ध आहे त्यासाठीं आमचे शस्त्र म्हणजे हीच ‘मनोवृत्ति’– ‘असेच मानने.’
जेव्हां सैतानाच्या परीक्षा येतात – वासनेची, चोरी करण्याची, खोटे बोलण्याची, लोभ धरण्याची, हेवा करण्याची, सूड घेण्याची, अपमान करण्याची, घाबरुन जाण्याची – तेव्हां हेच मनोवृत्तिरूपी शस्त्र धारण करा: जेव्हां प्रभूने मला पापापासून मुक्त करण्यासाठीं दुःख सहन केलें आणि तो मेला, तेव्हां मीहि पापास मेलो!
जेव्हां सैतान तुम्हांला म्हणतो, तू वासनेच्या सुखाचा नकार का करतोस? जी भानगड तू खोटे बोलून टाळू शकतोस त्या भानगडीत का पडतो? तू धाडस करून त्या हानिरहित सुखविलासाचा आनंद का घेत नाहीं? तुला जी दुखापद झाली त्याबद्दल सूड घेऊन न्याय मिळविण्याचा प्रयत्न का करित नाहींस?
त्याला असे उत्तर द्या : देवाच्या पुत्राने मला पाप करण्यापासून सोडविण्यासाठीं दुःख सहन केलें (खरोखर दुःख सोसले!). त्यानें मला आणखी कष्टी बनविण्यासाठीं दुःख सोसले असें मी मानत नाहीं. म्हणून, जे विकत घेण्यासाठीं तो मेला ते पापाच्या सुखापेक्षा अधिक मौल्यवान असले पाहिजे. मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, म्हणून माझा तो दुर्बळपणा ज्यामुळे मी तुझ्या परीक्षेला बळी पडत असें तो आता कोमजून ठार झाला आहे. हे सैताना, चालता हो! तुझ्या कॅन्डीच्या दुकानाजवळून जातांना आता माझ्या तोंडाला पाणी सुटत नाहीं.
ज्यानें आपल्यां स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्यां सर्वांकरता समर्पण केलें, तो त्याच्याबरोबर आपल्यांला सर्वकाहीं कसे देणार नाहीं? (रोम 8:32)
देवाच्या भविष्यातील कृपेचे सर्वात दूरगामी अभिवचन रोम 8:32 मध्यें आढळून येते. माझ्यासाठीं हे पवित्रशास्त्रातील सर्वात मौल्यवान वचन आहे. काहीं अंशी याचे कारण हे आहे कीं त्यात दिलेलें अभिवचन इतके सर्वसमावेशक आहे कीं ते माझ्या जीवनाच्या आणि सेवेच्या प्रत्येक वळणावर खरोखर माझ्या मदतीसाठीं तत्पर उभे असते. माझ्या जीवनात अशी परिस्थिती कधीही राहिलेली नाहीं आणि पुढेहि असणार नाहीं जेथे हे अभिवचन अप्रासंगिक ठरले किंवा ठरेल.
स्वतःहून हे सर्व-समावेशक अभिवचन कदाचित या वचनास सर्वात मौल्यवान ठरविणार नाहीं. स्तोत्र 84:11 सारखी इतर दूरगामी वचनें आहेत : “जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यांवाचून तो राहणार नाहीं.” आणि 1 करिंथ 3:21-23 : ”म्हणून माणसांविषयी कोणी अभिमान बाळगू नये. कारण सर्वकाहीं तुमचे आहे; पौल असो, अपुल्लोस असो, अथवा केफा असो, जग असो, जीवन असो, अथवा मरण असो, वर्तमानकाळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकाहीं तुमचे आहे; आणि तुम्हीं ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.“ या अभिवचनांचा ठळक दिसून येणारा भरमसाटपणा आणि विस्तार याविषयी अतिरेकपणे बोलणे कठीण आहे.
पण जे वास्तव रोमकरांस 8:32 ला या उच्च दर्जांत मांडते तो एक असा तर्क आहे जो या अभिवचनास महत्व देतो आणि त्यास इतका मजबूत व अटळ ठरवितो जितका कीं देवाच्या अतिशय प्रशंसनीय पुत्रासाठीं देवाची प्रीति.
रोम 8:32 मध्यें एक पाया आणि आश्वासन आहे जे इतके मजबूत आहे आणि इतके खंबीर आहे आणि इतके सुरक्षित आहे कीं हे अभिवचन कधी तोडले जाईल याची मुळीच शक्यता नाहीं. याच कारणस्तव मोठ्या संकटाच्या समयी ते सदैव-उपस्थित बळ ठरते. इतर कोणतीही गोष्ट मोडकळीस येते, इतर कोणतीही गोष्ट निराश करते, इतर कोणतीही गोष्ट अपयशी ठरते, पण भविष्यातील कृपेचे हे सर्व समावेशक अभिवचन कधीही अपयशी ठरू शकत नाहीं.
“ज्यानें आपल्यां स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्यां सर्वांकरता समर्पण केलें, तो...” हाच तो पाया आहे. स्वर्गाचा तर्क म्हणतो कीं जर हे खरे असेल, तर मग देव त्या लोकांस ज्यांस त्यानें आपला पुत्र दिला, निश्चितच सर्वकाहीं देईल!
“मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि मी जगतो असे नाहीं, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्यें जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्राच्या विश्वासाच्या योगाने आहे, त्यानें माझ्यावर प्रीति केलीं व स्वत:ला माझ्याकरिता दिले." (गलतीकरास पत्र 2:20)
आज सकाळी 4:59 वाजता जेव्हां अलार्म वाजला, माझ्या मनात क्षणार्धात एक विचार आला, मला मरणाची वास्तविकता आणि पूर्णतः पवित्र देवासमोर उभे राहण्याचा विचार आला, जिथे माझ्या जीवनाशिवाय प्रशंसनीय माझ्याकडें काहींच नाहीं.
या गोष्टीचे भय केवळ एका वास्तविकतेच्या प्रकाशाने नाहींसे झाले : येशू ख्रिस्त याच क्षणासाठीं मरण पावला.
मग तो विचार निघून गेला.
याचा तत्काळ अर्थ मी अश्याप्रकारे घेतला : एखाद्याचे तारण होते तेव्हां जे होते त्याचें हे सार आहे. अश्या प्रकारेच येशू हा खरा आहे याचा शोध लागतो. अश्याच प्रकारे एखादा व्यक्ति ख्रिस्ताची प्रीति त्याच्या अंतकरणांत जतन करून ठेवतो. अचानक, पाहिल्यांदाच त्यांना विचार येतो आणि दोष-भावनेसह देवाला भेटायचे निर्विवाद सत्य, ते त्यांच्या हृदयाच्या नेत्राने पाहू व समजू शकतात.
त्या दृष्टांताचा दणका अंत:करणाला छिन्नभिन्न करणारा आहे. यामुळे आपल्यांला जाणीव होते कीं आपली एकमेव आशा केवळ एक मध्यस्थच आहे. आपण जर स्वतःच्या बळावर एकटे उभे राहतो, तेहि स्वतःची वाखाणी किंवा कौतुक करण्यासारखे आपल्यांत काहींही नसतांना, आहे ते केवळ पापी जीवन, तर आपण पूर्णपणे हरवलेलो आहोंत. जर या देवाच्या सान्निध्यात अनंतकाळाची काहीं आशा असेल, तर आपल्यांला एका उद्धारकर्त्याची, आपले स्थानापन्न म्हणून उभा राहानार्याची, तारणकर्त्याची गरज लागेल.
ह्या भयानक अडचणीच्या वेळी, ख्रिस्ताच्या सुवार्तेवांचून कोणतीच गोष्ट प्रकाशमान वाटत नाहीं- "त्यानें माझ्यावर प्रीति केलीं व स्वत:ला माझ्याकरिता दिले" (गलती 2:20). एका क्षणार्धात तो तिथें प्रकट होण्यापूर्वी, मला न्यायाच्या वेळेचा सर्व गिळंकृत करणारा अंधकार आणि त्याची भयानकता दिसून आली- हा ईश्वरविज्ञानी निष्कर्ष नाहीं, एक तर्कशुद्ध निष्कर्ष नाहीं, किंवा एक विचार नाहीं, पण अंत:करणाच्या नजरेतून पाहिलेली एक झलक, एक भावना आणि खात्री आहे.
आपला देव हा भस्म करणारा अग्नि आहे. तो दुष्टता सहन करणार नाहीं. आपण पूर्णपणे हरवलेले आहों. माझे अपराध इतके मोठे, इतके खरे होते कीं क्षणार्धात मला जाणवले कीं यासाठीं मी कोणतीच सबब पण देऊ शकत नाहीं. सर्व काहीं अचानक, गुंतागुंतीचे आणि आशाहीन वाटू लागले.
अशा क्षणी, केवळ येशूच महत्वाचा आहे. हे ख्रिस्ता! हे ख्रिस्ता! ही उपकाराची लाट माझ्या हृदयात समावेल का? तू जो देवाचे दान, हीच माझी तातडीची आणि एकमेव गरज!
"कारण आपल्यांला देवाजवळ नेण्यासाठीं ख्रिस्तानेहि पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले." (1 पेत्र 3:18)
इथे सुवार्तेचा सारांश नमूद केला आहे, जो तुम्हांला सुवार्ता समजण्याकरिता, त्याचा आनंद घेण्याकरिता व इतरांना सांगण्याकरिता उपयुक्त ठरील!
"माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या; ज्यांस माझे नाम ठेविले, ज्यांस माझ्या गौरवासाठीं उत्पन्न केलें, निर्माण केलें आणि घडिले त्या सर्वास घेऊन या." (यशया 43:6-7) देवानें आपल्यां सर्वांना त्याच्या प्रतिमेमध्यें बनवले आहे यासाठीं कीं आपण त्याचें चरित्र व नैतिक सौंदर्य प्रतिबिंबीत करावे.
2. यासाठींच प्रत्येक मनुष्याने देवाच्या गौरवासाठीं जगावे
"म्हणून तुम्हीं खाता, पिता किंवा जे काहीं करता ते सर्व देवाच्या गौरवासाठीं करा" (1 करिंथ 10:31). देवाच्या गौरवाकरिता जगण्याचा मार्ग म्हणजे त्याच्यावर प्रीति करणे (मत्तय 22:37), त्याच्यावर विश्वास ठेवणे ( रोमंकरास पत्र 4:20), त्याचें उपकार मानणे (स्तोत्र 50:23), त्याच्या आज्ञा पाळणे (मत्तय 5:16) आणि त्याला प्रथम स्थान देणे व आपले धन मानणे ( फिलिप्पैकरास पत्र 3:8; मत्तय 10:37). आपण जेव्हां हे करतो तेव्हां आपण देवाचे गौरव प्रतिबिंबीत करतो.
3. तरीही, आपण सर्वांनी पाप केलें आणि देवाच्या गौरवाला उणे पडलो.
कारण सर्वांनी पाप केलें आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत (रोमकरांस 3:23). देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाहीं किंवा त्याचें आभार मानले नाहींत..... आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केलीं (रोमकरांस 3:23 1:21–23). आपण कुणीच देवावर जशी करायला पाहिजे तशी प्रीति केलीं नाहीं, विश्वास ठेवला नाहीं, उपकार मानले नाहींत, आज्ञा पाळल्यां नाहींत किंवा त्याला धन मानले नाहीं.
“कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्यां प्रभू येशू ख्रिस्तामध्यें सार्वकालिक जीवन आहे.” (रोमकरांस 6:23). ज्यांनी प्रभू येशूची आज्ञा पाळली नाहीं “त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल” (2 थेस्सल 1:9). “ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील” (मत्तय 25:46).
5. तरी, त्याच्या महान दयेनुसार, देवानें त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, याला जगात पापी लोकांसाठीं सार्वकालिक जीवनाचा मार्ग देऊ करण्याकरिता पाठवले.
“देवानें जगावर एवढी प्रीति केलीं कीं, त्यानें आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठीं कीं, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे” (योहान 3:16). “आपल्यांबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्यानें आपल्यांला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले” (गलती 3:13). “कारण आपल्यांला देवाजवळ नेण्यासाठीं ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले” (1 पेत्र 3:18).
6. म्हणून सार्वकालिक जीवन ही त्या सर्वांसाठीं एक दान आहे जे येशूवर प्रभू व तारणारा म्हणून विश्वास ठेवतात व त्याला त्यांच्या जीवनातले सर्वोच्च धन मानतात.
“प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” (प्रेषित16:31). “कीं, येशू प्रभू आहे असे जर ‘तू आपल्यां मुखाने’ कबूल करशील आणि देवानें त्याला मेलेल्यांतून उठवलें असा ‘आपल्यां अंत:करणात’ विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल” (रोमकरांस 10:9). कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारें तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाहीं, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्यांने हे झाले नाहीं. (इफिस 2:8–9). “मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाहीं, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्यें जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्यानें माझ्यावर प्रीति केलीं व स्वत:ला माझ्याकरता दिले” (गलती 2:20). “इतकेच नाहीं, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाहीं हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठीं कीं, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा” (फिलिप्पै 3:8).
म्हणून आपल्यां संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेषत्वाने दाखवावी ह्या इच्छेने देव शपथेच्या द्वारें मध्यें पडला, ह्यासाठीं कीं, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणांला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारें चांगले उत्तेजन मिळावे. (इब्री 6 : 17-18)
पौलाचा जीव घेतल्यांशिवाय आम्हीं काहीं खाणार किंवा पिणार नाहीं असा संकल्प करून दबा धरून बसलेल्यां लोकांचे काय?
देवच्या ठायी विसंगतपणा नाहीं. तो अभिवचनें, शपथा व त्याच्या पुत्राचे रक्त यांद्वारें स्वत:चे सामर्थ्य यासाठीं प्रकट करत नाहीं कीं आपल्यां सुरक्षेची एक बाजू घट्ट धरून, दुसरी बाजू हवेत आधांतरी ठेवावी.
ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने मिळवलेले तारण, हे त्याच्या लोकांना केवळ अर्धवट नाहीं तर संपूर्णपणे वाचवते.
म्हणून आपण हा प्रश्न विचारावयांस उत्तेजित होतो कीं, इब्री 6:18 मध्यें लेखक आपल्यांला, आपल्यां आशेला हस्तगत करण्यास का सांगत आहे? जर आपले हस्तगत करणे येशूच्या रक्ताद्वारें मिळवलेले आहे व त्याची सुरक्षा अपरिवर्तनीय आहे (हाच जुना करार व नवीन करारातील फरक आहे ) - मग देव आपल्यांला का बरे आशा हस्तगत करण्यास सांगतो?
याचे उत्तर आहे :
तो मरण पावला यासाठींच कीं पौल जे फिलिपै 3:12 मध्यें करतो, आपणहि तेच करावे, "तर ज्यासाठीं ख्रिस्त येशूनें मला आपल्यां कह्यांत घेतले ते मी आपल्यां कह्यांत घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागलो आहे." आपण जे पापी जनांस सांगतो कीं देवानें दिलेली आशा हस्तगत करा, ज्याच्यासाठीं केवळ येशूच आपल्यांला सक्षम करू शकतो, तर हा मूर्खपणा नाहीं, तर शुभवर्तमान आहे. यासाठींच मी पूर्ण अंत:करणाने आपणास बोध करतो कीं : जे ख्रिस्ताने तुमच्या करिता हस्तगत केलें आहे, ते तुम्हीं हस्तगत करा, आणि त्याला घट्ट पकडून ठेवा – ती महान कृती तोच तुमच्यात करत आहे.
"देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे; म्हणून आम्हीं देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो." ( 2 करिंथकरास पत्र 1:20 )
प्रार्थना ही देवाच्या अभिवचनाला, म्हणजे भविष्यातील त्याच्या खात्रीदायक कृपेला दिलेला प्रतिसाद आहे.
प्रार्थना ही देवाच्या खात्यातून त्यानें आपल्यां करिता जमवलेली भविष्यातील कृपा काढून घेणे हे आहे.
प्रार्थना म्हणजे असा अंधविश्वास नाहीं कीं, कदाचित चांगले हेतु असलेला एक देव असू शकतो. प्रार्थना देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवते, आणि देवाच्या भविष्यातील कृपेच्या खात्याकडें दररोज जाते आणि गरजेच्या वेळी लागणारी कृपा काढून घेते.
ह्या महान वचनातील दोन भागांमध्यें जो दुवा आहे तो लक्ष्यांत घ्या. "म्हणून" या शब्दाकडें लक्ष द्या.
“देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे. म्हणून (यास्तव) आपण देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो."
आपल्यां ते लक्ष्यांत आले याची खात्री करण्याकरिता ह्या दोन भागांकडें पाहूया : आपण प्रार्थना करतो तेव्हां आपण देवाला ख्रिस्ता द्वारें आमेन म्हणतो, कारण देवानें ख्रिस्तामधील त्याच्या सर्व अभिवचनांना खात्रीपूर्वक आमेन म्हंटले आहे. प्रार्थना ही देवाकडें केलेलीं भरवशाची विनवणी आहे कीं त्यानें ख्रिस्तामध्यें भविष्यासाठीं देऊ केलेल्यां अभिवचनांनी आपल्यांला आशीर्वादित करावे. प्रार्थना आपल्यां भविष्यातील कृपेवरील विश्वासाला सर्व गोष्टींच्या पायाशी जोडते, जो येशू ख्रिस्त आहे.
हि गोष्ट आपल्यांला आपल्यां शेवटच्या मुद्दयाकडें आणते : "आमेन" हा प्रार्थनेतील एक संपूर्ण आणि मोलवान शब्द आहे. याचा अर्थ असा होत नाहीं कीं , "होय, मी ही प्रार्थना केलीं आहे." याचा प्रामुख्याने अर्थ असा आहे कीं, "होय, देवानें ही सर्व अभिवचनें देऊ केलीं आहेत."
आमेन म्हणजे, "होय, प्रभू तू हे करू शकतोस." "होय, प्रभू तू सामर्थ्यशाली आहेस. होय, प्रभू तू ज्ञानी आहेस. होय, प्रभू तू दयाळू आहेस. होय, प्रभू भविष्यातील सर्व कृपा तुझ्याकडून येते आणि त्याची खात्री ख्रिस्ता द्वारें आम्हांला प्राप्त झाली आहे."
"आमेन" हा सादर केलेंल्यां प्रार्थनेच्या आशेचा उद्गार आहे, आणि साहाय्यासाठीं केलेंल्यां प्रार्थनेच्या भरवश्याची खात्री आहे.
"सर्व राष्ट्रांना साक्षीसाठीं म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हां शेवट होईल." (मत्तय 24 : 14 )
मला सुवार्ताप्रसाराविषयीं येशूच्या ह्या अभिवचनापेक्षा इतर कोणतेच शब्द प्रेरणादायी वाटत नाहींत.
तो असे म्हणत नाहीं कीं : ही सुवार्ता गाजवली पाहिजे.
असे म्हणत नाहीं कीं : ही सुवार्ता कदाचित गाजवली जाईल.
पण तो म्हणतो : ही सुवार्ता गाजवली जाईल.
ही महान कामगिरी नाहीं किंवा महान आज्ञा नाहीं. तर ही महान निश्चितता आहे, महान भरवसा आहे.
कोणी अश्याप्रकारे बोलायचे धाडस कसे काय करू शकते? त्याला कसे ठाऊक आहे कीं असेच होईल? त्याला कशी खात्री असू शकते कीं मंडळी सुवार्ता कार्यात अपयशी ठरणार नाहीं?
उत्तर : सुवार्ताप्रसार कार्याची कृपा ही पुनरुज्जीवनाच्या कृपेप्रमाणेच आहे, कोणी त्याचा प्रतिकार करू शकत नाहीं. ख्रिस्त वैश्विक घोषणेचे वचन देऊ शकतो कारण तो सार्वभौम आहे. त्याला भविष्यातील सुवार्ता कार्याच्या यशाबद्दल ठाऊक आहे कारण तोच भविष्य ठरवतो. सर्व राष्ट्रे ऐकतील!
"राष्ट्र" म्हणजे आधुनिक "देश" नव्हे. जुन्या करारात जेव्हां इतर राष्ट्रांचा उल्लेख केला जातो, तेव्हां तें वांशिक लोक गटांबद्दल बोलले गेले आहे, जसे कीं यबुसी, हित्ती, अमोरी, मवाबी, कनानी आणि पलिष्टी. "राष्ट्र" म्हणजे स्वत:ची विशिष्ट भाषा आणि संस्कृती असणारे विविध वंशाचे लोक. ( स्तोत्र 117:1 ) : "सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा, अहो सर्व लोकांनो, त्याचें स्तवन करा." राष्ट्र म्हणजे लोक - विविध लोक गट, जसे कीं आपण त्यांना संबोधतो.
देवाचा सार्वभौम पुत्र आणि मंडळीचा प्रभू या नात्यानें, येशूनें हा दैवी उद्देश हाती घेतला आणि संपूर्ण खात्रीने तो बोलला कीं, "सर्व राष्ट्रांना साक्षीसाठीं म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हां शेवट होईल" ( मत्तय 24 : 14 ).
जगाच्या सुवार्ताप्रसाराचे कार्य यशस्वी होणार याबद्दल खात्री दिली गेली आहे. ते अपयशी ठरू शकत नाहीं. मग हे रास्त नाहीं का, कीं आपण मोठ्या विश्वासाने प्रार्थना करू व मोठ्या भरवश्याने गुंतवणूक करू आणि यशाच्या खात्रीने पुढे वाटचाल करू ?
मग तो (येशू) पलीकडें गदरेकरांच्या देशात गेल्यांवर दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असताना त्याला भेटले, तेव्हां पाहा, ते ओरडून म्हणाले, " हे देवाच्या पुत्रा, तू मध्यें का पडतोस ? नेमलेल्यां समयापूर्वी तू आम्हांला पीडण्यास येथे आला आहेस काय ?" मत्तय 8:29
दुरात्मे इथे एक रहस्य शिकत आहेत. त्यांना ठाऊक आहे कीं त्यांचा नाश होणार आहे. त्यांना ठाऊक आहे कीं देवाचा पुत्र हा विजयी होईल. पण त्यांना हे ठाऊक नव्हते कीं त्यांच्या अंतिम पराभवाच्या आधीच ख्रिस्त प्रकट होणार होता.
ख्रिस्त लढाई करिता त्याच्या सैन्य दलाचे पुढारीपण करण्यासाठीं शेवटच्या युद्धा पर्येंत थांबणार नाहीं. त्यानें सैतानाच्या प्रदेशामध्यें विध्वंसक शक्तीला दाखल केलें आहे. त्यानें जीवन वाचवण्यासाठीं त्याच्या “बचाव पथकाला” प्रशिक्षण दिले आहे. ख्रिस्ताने शेवटच्या विजयापूर्वी, विजयी होण्याकारिता अनेक रणनीती आखल्यां आहेत.
त्यामुळे आता युद्धनीती अशी आहे कीं – ज्याअर्थी आता सैतानाचा नाश ठरलेलाच आहे, व हे त्याला पण ठाऊकहि आहे, त्याअर्थी जेव्हां पण तो आपल्यांला त्याचा मागे जाण्यासाठीं मोहात टाकू पाहतो तेव्हां आपण त्याला ह्या गोष्टीची आठवण करून द्यायची आहे. आपण त्याचावर हसून म्हणायचे, "तुझे डोके ठिकाणावर आहे का, तू हरला आहेस आता तुला कोण साथ देणार?"
मंडळी ही “ ह्या युगाच्या दैवतापासून” मुक्त केलीं गेली आहे ( 2 करिंथ 4:4). आपण गनिमी काव्यातले सैनिक आणि योद्धे आहोंत. आपण आज्ञा मोडण्यार्या राज्याचा "अंतरिक्षातील अधिपतीच्या" विरुद्ध बंडखोरी करणारे असे सैनिक आहोंत (2 इफिस 2:2).
हे सुरक्षित नाहीं. पण हे थरारक आहे. खूप लोकांचा जीव यात गेला आहे. सैतानाचे दूत त्याच्या विरुद्ध कारवाया करणारांच्या सतत शोधात असतात. जे जीव जाईपर्यन्त लढा देतात ख्रिस्ताने त्यांना पुनरुत्थानाची खात्री दिली आहे. पण त्यानें शत्रूंच्या प्रदेशामध्यें शांती, जगाकडून स्विकृती किंवा समृद्धीची खात्री दिली नाहीं.
पुष्कळांनी आपल्यां सेनापतिच्या आज्ञा पाळत त्यांच्या जीवाचे बलिदान दिले आहे. आणि मी यापेक्षा चांगल्यां जीवनाचा विचार देखील करू शकत नाहीं - आणि मरणाचा देखील नाहीं!