Solid Joys

Solid Joys

By Alethia4India
Download on the App Store

Solid Joys episodes

  • 14 March : विजय निश्चित आहे

    "यास्तव आडदांड लोक तुझे गौरव करितील, बलात्कारी लोकांची शहरे तुझे भय धरितील."  - (यशया 25:3)

    यशया तो दिवस पाहत आहे जेव्हां सर्व राष्ट्रे - सर्व लोक गटांचे प्रतीनिधीं - इस्राएलचा देव याव्हे व त्याचा मसीहा, ज्याला आपण येशू म्हणून ओळखतो, यांच्या बरोबर त्यांचे शत्रुत्व असणार नाहीं.

    ते या पुढे बआल किंवा निबो किंवा मोलेख किंवा अल्लाह किंवा बुद्ध किंवा काल्पनिक आदर्श जग निर्माण करण्या करिता असलेले सामाजिक कार्यक्रम किंवा आर्थिक विकास किंवा पूर्वजांची किंवा निसर्गाची भक्ति करणार नाहींत. या ऐवजी ते विश्वासाने देवाच्या पर्वतावर मेजवानीकरिता येतील.

    आणि त्यांच्या दु:खाचा पडदा काढून टाकींलेला असेल आणि मरण नाहींसे झालेलें असेल आणि देवाच्या लोकांची निंदा काढून टाकली गेलेली असेल आणि त्यांचे अश्रु कायमचे पुसून टाकलेले असतील.

    यशया 25:3 मधील द्रुष्टांत समजून घेण्याकरिता त्याची ही पार्श्वभूमी समजणे गरजेचे आहे. "यास्तव आडदांड लोक तुझे गौरव करितील, बलात्कारी लोकांची शहरे तुझे भय धरितील." दुसर्‍या शब्दात, देव हा "आडदांड" लोकांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे, आणि तो इतका बलवान आणि कृपाळू आहे कीं शेवटी तो निर्दयी अशा राष्ट्रांना देखील त्याची भक्ति करायला भाग पाडील.

    यशया जे चित्र दाखवत आहे त्यात, सर्व राष्ट्रे देवाची भक्ती करित त्याचाकडें वळाली आहेत, जे त्याचें लोक झाले आहेत त्या सर्व लोकांकरिता मोठी मेजवानी ठेवली आहे, राष्ट्रांमधून सर्व यातना, दु:ख आणि अपमान नाहींसा केला गेला आहे, आणि शेवटी मरण कायमचे नाहींसे केलें गेले आहे. 

    हा विजय निश्चित आहे, कारण देवच  हे सर्व करीत आहे. त्यामुळे आपण याची खात्री बाळगू शकतो.

    जगात सुवार्ता प्रसाराकरिता खर्च केलें गेलेले एकही जीवन व्यर्थ ठरणार नाहीं, देवाच्या राज्याच्यावाढीसाठीं केलेंली एकही प्रार्थना किंवा खर्च केलेंला एक रुपया किंवा एक संदेश किंवा उत्तेजनासाठीं लिहिलेले एक पत्र किंवा अंधारात प्रकाशणारा एक लहानसा दिवा देखील व्यर्थ ठरणार नाहीं. विजय हा निश्चत आहे.

    3 min
  • 13 March : येशू हा देवाचा आमेन आहे

    "देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे; म्हणून आम्हीं देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो. ( 2 करिंथकरास पत्र 1:20 )"

    प्रार्थना ही अशी गोष्ट आहे जिथे आपल्यां जीवनातला भूतकाळ व आपला भविष्यकाळ सातत्यानें जुळत असतो. मी इथे ह्या गोष्टीचा उल्लेख करतो कारण पौल ह्या वचनात प्रार्थनेला, देवाच्या "होय" सोबत एका विलक्षण रीतीने जोडत आहे.

    2 करिंथकरास पत्र 1:20 मध्यें तो म्हणतो, "देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे; म्हणून आम्हीं देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो." ह्याचा अर्थ सुलभपणे समजून घेऊया.

    इथे तो म्हणत आहे कीं "यास्तव, ख्रिस्तामुळे, आपण प्रार्थनेमध्यें देवाला आमेन हे दाखवण्यासाठीं म्हणतो कीं आपण देवाच्या ज्यां भावी कृपेसाठीं प्रार्थना करितो व जिचसाठीं त्याच्यावर अवलंबून राहतो तेव्हां सर्व गौरव त्यालाच दिलें जाईल."

    जर तुम्हांला कधी हा प्रश्न पडत असेल कीं ख्रिस्ती लोक प्रार्थनेनंतर आमेन का म्हणतात किंवा ही प्रथा कुठून आली, तर त्याचें उत्तर हे आहे कीं. आमेन हा शब्द कोणते ही भाषांतर न करता हिब्रू मधून ग्रीक मध्यें घेतला गेला आहे, अगदी जसा तो कोणत्या ही भाषांतराशिवाय इंग्रजीमध्यें व इतर भाषांमध्यें घेतला गेला आहे.

    हिब्रू मध्यें, हे एक खात्रीपूर्वक सांगितलेले अनुमोदन आहे ( नहेम्या 5:22, नहेम्या 5:13; 8:6) - हे एक औपचारिक, आस्थापूर्वक "मी मान्य करतो" किंवा "मी जे बोललो त्या बद्दल मला खात्री आहे" किंवा "हे सत्य आहे" असं म्हणणे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, "आमेन" म्हणजे देवा संदर्भात केलेंले विधान आस्थेने "होय' असे मानणे.

    आता 2 करिंथकरास पत्र 1:20 या वचनातील दोन भागामधील संबंध पाहूया. यातील पहिल्यां भागामध्यें लिहले आहे  कीं "देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे" व दुसर्‍या भागामध्यें लिहिले आहे, "म्हणून आम्हीं देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो."

    जेव्हां आपल्यांला हे समजते कीं "आमेन" आणी "होय" याचा अर्थ सारखाच आहे, तेव्हां हे वचन असे होईल : येशू ख्रिस्तामध्यें, त्याच्या अभिवचनांद्वारें देव आपल्यांला होय असे म्हणतो; आणि ख्रिस्ता मध्यें आपण प्रार्थनेद्वारें देवाला होय असे म्हणतो.

    3 min
  • March 12 : जेव्हां घडविणारा आपल्यां बाजूनें असतो

    "जो आपल्यां उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो त्यास धिक्कार असो! तो मातीच्या खापर्‍यापैकीं एक आहे. तू काय करतोस असे माती आपल्यां घडणा-याला म्हणेल काय? तुला हात नाहींत असे तुझे कृत्य तुला म्हणेल काय?" ( यशया 45:9)

    देवाचा प्रतापीपणा अधिक उंचविला जातो जेव्हां आपण त्याच्याकडें एक निर्माणकर्ता ज्यानें शून्यातून हे विश्व निर्माण केलें, या दृष्टीने पाहतो. देव शून्यतेला आज्ञा करतो, आणि ती त्याची आज्ञा पाळते आणि शून्यातून विश्व निर्माण होते.

    शून्यातून त्यानें माती घडवली, व त्या मातीतून त्यानें आपल्यांला घडवले- देवाची कलाकृती (यशया 45:9) - त्याच्या मालकींचे लोक, त्याच्या  गौरवाकरिता नेमून ठेवलले व त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले. "परमेश्वर हाच देव आहे हे जाणा ; त्यानेंच आम्हांला उत्पन्न केलें; आम्हीं त्याचेंच आहों, आम्हीं त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहों" (स्तोत्र 100:3). दुसर्‍याच्या मालकींचे मेंढरू व पात्र असणे ही एक नम्र करणारी गोष्ट आहे.

    आज सकाळी मी यशयाचे पुस्तक वाचत असताना मला देवाच्या प्रतापीपणाविषयीं आणखी एक वचन सापडले. जेव्हां मी ते वचन देवाच्या संपूर्ण सामर्थ्याशी व उत्पन्नकर्त्याच्या असलेल्यां अधिकाराशी एकत्र केलें, तेव्हां त्याचें एक ज्वलंत मिश्रण होऊन माझ्या मनात एक स्फोट झाला. धडाम!

    यशया 33:21 म्हणते, "प्रतापी परमेश्वर आम्हांसाठीं असेल!"

    आम्हांसाठीं! आम्हांसाठीं! निर्माणकर्ता आम्हांसाठीं आहे, आमच्या विरुद्ध नाहीं.   सर्व शक्तिनिशी आणि जे त्यानें घडवले आहे त्यावर संपूर्ण अधिकारासह - तो आम्हांसाठीं आहे!

    “हे देवा, तुझी आशा धरून राहणार्‍यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाहीं, त्याचें नाव आलेले नाहीं, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाहीं” (यशया 64:4). “देव आपल्यांला अनुकूल असल्यांस आपल्यांला प्रतिकूल कोण?” (रोम 8:31). 

    तुम्हीं आणखी कोणत्या गोष्टीचा विचार करू शकता का, जी  इतकीं सांत्वन देणारी, खात्री देणारी व आनंद देणारी आहे कीं, हा प्रतापी परमेश्वर तुमच्यासाठीं आहे?

    3 min
  • March 11 : दोन अमर्याद सबळ आणि मृदु सत्य

    "मी आरंभीच शेवट कळवितो. होणार्‍या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे; माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन . " ( यशया 46:10 )

    "सार्वभौमता" हा शब्द ("ट्रिनिटी"- त्रेकय ह्या शब्दाप्रमाणेच) पवित्र शास्त्रात आढळत नाहीं. आपण त्याचा उपयोग हे सत्य सांगण्यास करतो कीं, देवच ह्या जगाचा सर्वोच्च नियंत्रक आहे, मोठ्यातल्यां मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी व जंगलातील लहानातील लहान पाखराचे झाडावरून पडणे, ह्या सर्व गोष्टींवर त्याचें सर्वोच्च नियंत्रण आहे.

    बायबल हा सिद्धांत अशाप्रकारे मांडतो : ...मीच देव आहे, दुसरा कोणी नव्हे, माझ्यासमान कोणीच नाहीं...... ‘माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. (यशया 46:9–10.) आणि : तो (देव) आकाशातील आपल्यां सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाहीं” (दानीएल 4:35). आणि : “तो न बदलणारा आहे, त्याला त्यापासून कोण फिरवणार? आपल्यां मनास येते ते तो करतो; जे मला नेमले आहे ते तो घडवून आणत आहे; अशा पुष्कळ गोष्टी त्याच्याजवळ आहेत” (इयोब  23:13–14). आणि : “आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो” (स्तोत्र 115:3).

    ही शिकवण विश्वासणा-या करीत खूप मौल्यवान असण्याचे एक कारण हे आहे कीं, जे देवावर विश्वास ठेवतात त्यांचावर दया व कृपा करणे हा देवाचा मनोरथ आहे (इफिस 2:7, स्तोत्र 37:3-7, नीति 29:25).  देवाच्या सार्वभौमतेचा अर्थ असा होतो कीं आपल्यांकरिता असलेली त्याची योजना कधीच विफल होत नाहीं ती अपयशी होऊंच शकत नाहीं.

    "जे देवावर प्रीति करतात" व " जे त्याच्या संकल्पा प्रमाणे बोलाविलेलें" आहेंत, त्यांच्या बरोबर अशी कोणतीच गोष्ट घडत नाहीं जी सखोलपणे, दीर्घपणे व त्यांच्या सर्वोच्च कल्यांणाकरिता कार्य करीत नाहीं ( रोम 8:28 ; स्तोत्र 84:11 ). 

    यासाठींच मी म्हणतो कीं देवाची दया व त्याचें सार्वभौमत्व हे माझ्या जीवनाचे दोन स्तंभ आहेत. ते माझ्या भविष्याची आशा आहेत, माझ्या सेवाकार्याचे बळ आहेत, माझ्या ईश्वरविज्ञानाचा केंद्रबिंदू आहेत, माझ्या विवाहाचा बंध आहेत, माझ्या सर्व रोगांचे औषध आहेत आणि माझ्या सर्व निराशेचा उपाय आहेत.

    आणि जेव्हां मी मृत्युच्या पायरीवर येईन ( आता किंवा कालांतराने ) तेव्हां ही दोन सत्य माझ्या मृत्यूशय्येच्या बाजूला उभी असतील आणि अमर्याद बळाने आणि कोमलतेने मला उंचावून देवाकडें नेतील.

    4 min
  • March 10 : आपण कोकर्‍याची भक्ति करूया

    "ही गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास योग्य असा कोणी आढळला नाहीं म्हणून मला फार रडू आले ". (प्रकटीकरण 5:4)

    तुम्हीं कधी असा विचार केला आहे का, कीं तुमच्या प्रार्थना स्वर्गामधील सुवासा सारख्या आहेत?  प्रकटीकरण 5 वाचल्यांवर हेच चित्र समोर तयार होते. स्वर्गामधील जीवनाची ही एक झलक आहे.

    प्रकटीकरण 5 मध्यें आपण पाहतो कीं, सर्वसमर्थ देव हातामध्यें गुंडाळी घेऊन राजासनावर बसला आहे. या गुंडाळीवर सात शिक्के आहेत. ती गुंडाळी उघडण्यासाठीं हे सात शिक्के फोडावे लागणार आहेत.

    मला असे वाटते कीं गुंडाळीचे उघडणे हे मुक्तिच्या इतिहासाच्या शेवटच्या दिवसाचे दर्शक आहे, आणि शिक्क्यांचे फोडले जाणे हे आपली त्या दिवसाकडील वाटचालीच्या इतिहासाचे दर्शक आहे.

    प्रकटीकरण 5:4 मध्यें सुरवातीला, योहान रडत असतो कारण ती गुंडाळी उघडण्यास कोणी योग्य नाहीं. तेव्हां स्वर्गातील वडीलमंडळापैकीं एक जण योहानाला म्हणतो कीं, "रडू नकोस; पाहा, ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’, दाविदाचा ‘अंकुर’ ह्याने जय मिळवला; म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे" ( प्रकटीकरण 5:5).

    क्रूसावरील मरण स्वीकारून, येशूनें  मुक्तिच्या इतिहिसातील होऊ घातलेल्यां घटनां उघडण्याचा व त्याच्या लोकांना त्यातून विजयी वाटचाल करीत नेण्याचा अधिकार मिळवला.

    पुढच्या वचनामध्यें, सिंहाचे चित्रण कोक-या प्रमाणे करण्यात आले आहे, "ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता, असा कोकरा उभा राहिलेला मी पहिला" (प्रकटीकरण 5:6). येशूच्या क्रूसावरील विजयाचे हे सुंदर चित्रण आहे, नाहीं का? वधला असला तरी, उभा असलेला, खाली झोपलेला नाहीं!

    हे तितक्याच खात्रीचे आहे जसे सिंहाने त्याच्या शत्रूला गिळंकृत केलें आहे - पण त्यानें हा विजय त्याच्या शत्रूंकडून स्वत:चा वध करून प्राप्त केला आहे !

    त्यामुळे, कोकरा आता देवाच्या हातातून मुक्तीच्या इतिहासाची गुंडाळी घेऊन उघडण्यास समर्थ झाला आहे. हा किती राजेशाही क्षण आहे, जेव्हां स्वर्गामधील चोवीस वडील भक्ति करण्यास त्याच्या पाया पडत आहेत.

    तुम्हांला ठाऊक आहे का, कीं धुपाने भरलेल्यां सोन्याच्या वाट्या काय आहेत? प्रकटीकरण 5:8 सांगते कीं "त्या पवित्र जनांच्या ‘प्रार्थना’ होत." याचा अर्थ असा होत नाहीं का, कीं आपल्यां प्रार्थना स्वर्गातल्यां सुगंधा प्रमाणे आहेत, देवाच्या राजासना समोर व कोक-या समोर एका सुवासा प्रमाणे आहेत?

    जेव्हां मी विचार करतो कीं माझ्या प्रार्थना साठवून ख्रिस्ताच्या स्वर्गातील भक्तिमध्यें सादर केल्यां जातात, तेव्हां मला अधिक जोमाने प्रार्थना करण्याचे सामर्थ्य व उत्तेजन प्राप्त होते.

    तर आपण खाली आपल्यां प्रार्थनांद्वारें ख्रिस्ताला मान, गौरव व आपली भक्ति सादर करू, आणि आपल्यां प्रार्थना स्वर्गीय मंडळीद्वारें ख्रिस्त, जो वधला गेला होता, त्याला सुंगधी धुपाप्रमाणे सादर केल्यां जातात यात दुहेरी आनंद मानू.

    4 min
  • March 9 : देव तुमची काळजी घेतो

    "म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठीं कीं, त्यानें योग्य वेळी तुम्हांला उंच करावे. त्याच्या वर तुम्हीं 'आपली' सर्व 'चिंता टाका' कारण तो तुमची काळजी घेतो." (1 पेत्र 5:6-7)

    भविष्याबद्दल काळजी करणे हे गर्व करण्यासारखे का आहे ?

    देव अशा प्रकारे उत्तर देईल ( यशया 51:12  - दुसर्‍या शब्दात ):

    मी- परमेश्वर, तुझा निर्माणकर्ता - तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे, तुझी काळजी घ्यायचे मी वचन देतो; जे तुला धमकावतात, ते तर मर्त्य लोक आहेत. त्यामुळे तुझ्या भयाचा असा अर्थ होतो कीं तुझा माझ्यावर विश्वास नाहीं - आणि तुझी काळजी घेण्याकरिता तुझा, तुझ्या स्वत:च्या संसाधनांवर देखील विश्वास नाहीं, तरी तू माझ्या भविष्यातील कृपेवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत: च्या कमकुवत स्वयंपूर्णेतेवर अवलंबून आहेस. त्यामुळे तुझे सर्व थऱथऱ कापणे- कितीही कमकुवत असेल तरी - ते तुझा गर्व प्रकट करते.

    यावर उपाय? स्वतावर विसंबून राहण्याऐवजी देवावर विसंबून रहा, आणि भविष्यातील कृपेसाठीं देवाच्या स्वयंसिद्ध अभिवचनांच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवा.

    1 पेत्र 5:6-7 मध्यें, तुम्हीं पाहू शकता कीं, चिंता करणे हे एक प्रकारच्या गर्वा प्रमाणे आहे, "देवा च्या.... पराक्रमी हाताखाली.... लीन व्हा" (आणि वचन 7)" त्याच्यावर तुम्हीं आपली सर्व चिंता टाका"  यातील व्याकरण पहा. वचन 7 हे नवीन वाक्य नाहीं, ते संयुक्त वाक्य आहे, ते एकमेकाला जोडलेले आहे. ते आपण अशा शब्दांत मांडू शकतो : “त्याच्यावर तुम्हीं ‘आपली’ सर्व ‘चिंता टाकून लीन व्हा.”

    याचा अर्थ देवावर आपल्यां सर्व चिंता टाकणे म्हणजे त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन होणे असा होतो. हे असे म्हणण्यासारखे आहे कीं, "नम्रपणे जेव.... आपले तोंड बंद ठेवून," किंवा, "लक्षंपूर्वक गाडी चालव .... तुझी दृष्टि रस्त्यावर ठेवून," किंवा, "दानशूर हो.... कोणाला तरी घरी भोजनाला आमंत्रित करून," किंवा,  स्वत:ला लीन कर.... सर्व भय देवावर टाकून."

    स्वत:ला नम्र करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्यां सर्व चिंता देवावर टाकणे. याचा अर्थ, देवावर सर्व चिंता टाकण्यामध्यें आपला गर्व अडथळा निर्माण करतो. याचा अर्थ, आपली गैरवाजवी चिंता एक प्रकारचा गर्वच आहे. कितीही कमकुवत वाटला किंवा दिसला तरी.

    तर मग, आपली चिंता देवावर टाकणे हे गर्वाच्या विपरीत कसे आहे ? कारण गर्व हे मान्य करीत नाहीं कीं त्याला चिंता आहेत. किंवा आपण त्यांची काळजी स्वत: घेऊ शकत नाहीं. जर गर्वाला हे मान्य करायचे असेल कीं आपले भयावर नियंत्रण नाहीं, तरी देखील त्याला यावरील उपाय, कीं आपण दुसर्‍या कोणावर तरी विसंबून राहायचे जो आपल्यांपेक्षा जास्त सामर्थ्यशाली आणि ज्ञानी आहे, ते मान्य करायचे नसते.  

    दुसर्‍या शब्दात सांगायचे झाले तर, गर्व हा एक प्रकारचा अविश्वास आहे, ज्याला देवाच्या भविष्यातील कृपेवर विश्वास ठेवायचा नसतो. पण याउलट, विश्वास हे मान्य करतो कीं त्याला सहाय्याची गरज आहे. गर्व हे मान्य करीत नाहीं. विश्वास देवाच्या सहाय्यावर भरवसा ठेवून राहतो, गर्व हे नाहीं करत. विश्वास सर्व चिंता देवावर टाकतो, गर्व टाकींत नाहीं.

    ह्यास्तव, गर्वाच्या अविश्वासावर लढा द्यायचा असेल तर हे कबूल करावें कीं मला चिंता आहेत, आणि देवाचे भविष्यातील कृपेचे अभिवचन "तो तुमची काळजी करतो" याचे मनात जतन करा. आणि मग सर्व चिंता त्याच्या सामर्थ्यशाली बाहुंवर सोपवून द्या.

    5 min
  • March 8 : तुमच्या मनाची कवाडे उघडा

     “चेपलेला बोरू तो मोडणार नाहीं, मिणमिणती वात तो विझविणार नाहीं.” (यशया 42:3)

     बर्‍याच आठवड्यानंतर मनाला उत्तेजन देणारे शब्द माझ्या वाचनात आले, जे यशया 42:1-3 यातून होते, जे येशू त्याच्या आत्मिक शक्तीचा वापर कशाप्रकारे करेल याविषयीं सांगतात. 

    तुम्हांला एखाद्या चेपलेल्यां बोरू प्रमाणे वाटते का - ईस्टर लिलीच्या फुलाप्रमाणे, ज्याची फांदी चेपलेली आहे व त्यामुळे काहींच सत्व न मिळाल्यांमुळे ते फूल खाली पडले आहे. तुम्हांला कधी असे वाटते का, कीं तुमचा विश्वास जळत्या ज्वालेमध्यें एका लहान ठिणगी प्रमाणे आहे- वाढदिवसाच्या विझवीलेल्यां मेणबत्तीच्या वातेतील लहानश्या ठिणगी प्रमाणे?

    धीर धरा! ख्रिस्ताचा आत्मा हा उत्तेजनाचा आत्मा आहे, तो तुमचे फूल तोडून टाकणार नाहीं, तो तुमच्यातील ठिणगी विझविणार नाहीं.

    “परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्यानें मला अभिषेक केला” (लूक 4:18). “तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल” (मलाखी 4:2). “[तो] मनाचा सौम्य व लीन आहे......‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल” (मत्तय 11:29). “परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतीक्षा कर” (स्तोत्र 27:14).

    आपल्यांला दु:ख वाटू शकते कीं, आपण एक मोठी ज्वाला नसून, केवळ एक ठिणगी आहोंत. पण ऐका! आणि उत्तेजन प्राप्त करून घ्या: होय, मोठ्या आगीमध्यें व ठिणगीमध्यें खूप मोठा फरक आहे. पण ठिणगी असण्यामध्यें आणि ठिणगी नसण्यामध्यें देखील खूप मोठा फरक आहे. विश्वासच नसणे या पेक्षा मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास, हा डोंगरा एवढा विश्वास होण्यापेक्षा जास्त सोयीस्कर आहे.

    देवाच्या अभिवचनाची कवाडे उघडा आणि पवित्र आत्म्याला तुमच्या मनाच्या प्रत्येक खोलीमध्यें फुंकर घालू द्या. देवाचा पवित्र आत्मा कधीच मोडणार नाहीं किंवा विझवीणार नाहीं. तो तुमचे मस्तक उंच करील, व तुमच्यातील ठिणगीला वारा देऊन एक ज्वाला बनवेल. तो उत्तेजनाचा आत्मा आहे.

    3 min
  • 7  March : मी पवित्र आत्म्याने स्वत:ला कसे भरू शकतो?

    "धीराच्या व शास्त्रापासून मिळणार्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काहीं शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्यां शिक्षणाकरिता लिहिले " ( रोम 15:4)

    आपण पवित्र आत्म्याने कसे भरले जाऊ शकतो? आपण आपल्यां मंडळीवर व स्वत:वर पवित्र आत्म्याचा वर्षाव कसा अनूभवू शकतो, कीं जेणेकरून तो आपल्यांला अदम्य अश्या आनंदाने भरून टाकींल आणि आपल्यांला स्वतंत्र करील, सामर्थ्य देईल ज्याच्या द्वारें आपण इतरांवर अश्याप्रकारे प्रीति करू शकू कीं त्यांना आपण ख्रिस्तासाठीं जिंकून घेऊं?

    उत्तर : यासाठीं देवाच्या अतुलनीय, आशा देणार्‍या वचनांवर दिवस-रात्र मनन करा. जसे रोमकरास पत्र 15:4 सांगते, "धीराच्या व शास्त्रापासून मिळणार्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काहीं शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्यां शिक्षणाकरिता लिहिले" ह्याच्याद्वारें पौल त्याचें अंत:करण आशा, आनंद आणि प्रीतिने भरत असे.

    आपल्यांला आशेची संपूर्ण खात्री देवाच्या अभिवचनांवर मनन केल्यांने येते. आणि रोम 15:13 मध्यें सांगितल्यां प्रमाणे पवित्र आत्मा आशा देऊ करतो, या वचनाबरोबर विरोधाभास होत नाहीं. याचे कारण हे कीं, पवित्र आत्मा हा शास्त्राचा दैवी लेखक आहे. त्याचें कार्य हे त्याच्या शब्दाद्वारें होते. आपल्यांला त्याच्या अभिवचनांनी भरून तो आपल्यांला आशेने भरतो ह्या त्याच्या पद्धतीमध्यें कुठेच विरोधाभास नाहीं.

    आशा ही एखादी संदिग्ध भावना नाहीं, जी पोटदुखी प्रमाणे अचानक उदभवेल. आशा हा एक प्रकारचा भरवसा आहे कीं पवित्र आत्म्याने त्याच्या वचनाद्वारें आपल्यां उज्ज्वल भविष्याबद्दल जे अभिवचन दिले आहे, ते खरे होईल. तर पवित्र आत्म्याने भरण्याचा मार्ग म्हणजे त्याच्या वचनाने भरणे. आणि आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवणे.

    कारण देवाचे वचनच आहे जें आपल्यांला आशेने भरते, आणि आशा आपल्यांला आनंदाने भरते, आणि आनंद आपल्यां शेजार्‍यावर प्रीति करण्याच्या सामर्थ्याने आणि स्वातंत्र्याने ओसंडून वाहतो. आणि हेंच पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणे आहे.   

    3 min
  • 6 March : देव दीनांकडें लक्ष्य देतो

    "अनादि देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहुंचा तुला आधार आहे."  (अनुवाद 33:27)

    तुम्हीं कदाचित ह्या क्षणी अश्या काहीं परिस्थितीतून जात असाल जी तुम्हांला वेदनादायक रीतीने येशूच्या व त्याच्या लोकांच्या मौल्यवान सेवेकरिता तयार करत असेल. जेव्हां एखादा व्यक्ति शून्यतेने किंवा असहाय्यपणे रसातळास जातो, तेव्हां त्याला ह्या गोष्टीची जाणीव होईल कीं तो अनादि आश्रय दुर्गाला येऊन पोचला आहे.

    मला माझ्या कुटुंबासोबतच्या सकाळच्या भक्तिच्या वेळी वाचलेले स्त्रोत्र 138:6 यातील एका सुंदर वचनाची आठवण झाली, "परमेश्वर थोर आहे, तरी तो दीनांकडें लक्ष देतो."

    तुम्हीं निराशेमध्यें इतकेपण खोल बुडून जाऊ शकत नाहीं कीं देव तुम्हांला पाहत नाहीं किंवा तुमची काळजी करत नाहीं. खरं तर, तो त्या तळाशी तुम्हांला धरण्याकरिता वाट पहात असतो. जसा मोशे म्हणाला, "अनादि देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहुंचा तुला आधार आहे" ( अनुवाद 33:27 ), अगदी त्या प्रमाणे.

    होय, तो तुम्हांला थरथरतांना व घसरतांना पहात असतो. तुम्हीं तळाशी पोचण्यापूर्वी तो तुम्हांला पकडू शकतो ( जे तो नेहमी करतो ). पण या वेळी त्याला तुम्हांला कदाचित काहीं नवीन गोष्टी शिकवायच्या असतील.

    स्त्रोत्रकर्ता स्त्रोत्र 119:71 मध्यें म्हणतो, "मी पीडित झाल्यांमुळे माझे बरे झाले; कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो."  तो असे म्हणत नाहीं कीं त्याला त्यात आनंद वाटला किंवा त्याला बरे वाटले. गत गोष्टींचा विचार करून तो केवळ हे म्हणतो कीं, "त्यामुळे माझे बरे झाले."

    मागील आठवडी मी जेम्स स्टुअर्ट ह्या स्कॉटलँड मधील पाळकाचे पुस्तक वाचत होतो. ते असे म्हणतात कीं, "प्रीतिच्या सेवेमध्यें, केवळ जखमी सैनिकच सेवा करू शकतात." यासाठींच माझा असा विश्वास आहे कीं तुमच्या पैकीं काहीं जणांची कोणत्या तरी प्रीतिच्या मौल्यवान सेवेकरिता तयारी होत आहे. कारण तुम्हीं जखमी आहात.

    असे समजू नका कीं तुमची जखम ही देवाच्या कृपेच्या रचने शिवाय आली आहे. ह्या वचनाचे स्मरण करा, "आता पाहा, मी, मीच तो आहे, माझ्याशिवाय कोणी देव नाहीं; प्राण हरण व प्राण दान करणारा मीच आहे."  ( अनुवाद 32:39 )

    जे तुम्हीं कोणत्या तरी ओझ्या खाली दु:ख सोसत आहात, त्यां तुम्हांला देव विशेष कृपा देऊ करो. देव तुम्हांला सौम्यतेने जी नवी प्रीति देऊ करत आहे तिचा आतुरतेने शोध करा.

    3 min
  • 5 March : तुमच्या आनंदाकरिता येशूकडें पहा

    "आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात....जेवणावळतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थांनातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणवून घेणे त्यांना आवडते." ( मत्तय 23 : 5-7)

    लोकांकडून स्वतःचे वाखाण करून घेण्याच्या लालसेला शमवण्यासाठीं केवळ स्वीकृतीचा लोभ असतो. जर आपल्यांला स्वावलंबी बनून आनंद मिळत असेल तर, इतरांनी आपल्यां स्वावलंबीपणाची प्रशंसा केल्यांशिवाय देखील आपल्यांला आनंद वाटणार नाहीं.

    यासाठीं मत्तय 23:5 मध्यें येशू परुशी लोकांचे वर्णन करित असें म्हणतो, "आपली सर्व कामे लोकांनी पहावीत म्हणून ते ती करतात."

    हा चेष्टेखोरपणा आहे. आपल्यांला असे वाटत नाहीं का कीं स्वावलंबीपणा हा गर्विष्ठ व्यक्तिला इतरांच्या मतांपासून मुक्त करायला पाहिजे? यालाच "स्वत: मध्यें संतुष्ट" म्हणतात. तसे पहायाला गेले तर या आत्मसंतुष्टीमध्यें किंवा स्वावलंबीपणामध्यें एक रिक्तता आहे.

    स्वत्वाची निर्मिती स्वत: मध्यें संतुष्ट होण्यात किंवा स्वत: वर अवलंबून राहण्याकरिता केलीं गेली नव्हती. स्वत्व कधीच स्वयंपूर्ण होवू शकत नाहीं. आपण परमेश्वर नाहीं. आपण परमेश्वराच्या प्रतिमेमध्यें बनवले गेलोय. आणि जी गोष्ट आपल्यांला देवाची "प्रतिमा" बनवते ती गोष्ट म्हणजे आपण स्वतःमध्यें संतुष्ट राहणे ही नाहीं. आपण सावली व प्रतिध्वनि आहोंत. त्यामुळे जो आत्मा स्वत: मध्येंच संतुष्टी शोधण्याकरिता झटत असेल,  तर त्यात एक रिक्तपणा असणारच.

    इतरांकडून प्रशंसा मिळविण्याची ही भूक गर्वाचे अपयश व देवाच्या सतत मिळत असलेल्यां कृपेच्या कार्यावरील अविश्वासाचे चिन्ह आहे. येशूनें  मनुष्याचा स्व-गौरवाच्या लोभाचा अनिष्ट परिणाम पाहिला. त्यानें योहान 5:44 मध्यें ह्या गोष्टीचा उल्लेख केला आहे, "जे तुम्हीं एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याचाकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाहीं, त्या तुम्हांला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?" याचे उत्तर आहे, तुम्हीं विश्वास ठेवू शकत नाहीं. जे इतरांकडून प्रशंसेची लालसा करीत असतांत त्यांना विश्वास ठेवणे शक्य नाहीं. का?

    कारण विश्वास स्वत:कडून दृष्टी हटवून देवाकडें पाहतो. कारण विश्वास म्हणजे येशूमध्यें देव जे सर्व काहीं आहे त्यात संतुष्ट असणे. आणि जर तुम्हीं तुमची लालसा इतरांच्या प्रशंसेद्वारें शमवण्याचा हट्ट करीत असाल तर, तुम्हीं येशूपासून दूर जाणार. येशू असा नाहीं. तो त्याच्या पित्याच्या गौरवा करिता जगतो. आणि आपल्यांला पण तो हेच करण्यास सांगतो.

    पण जर तुम्हीं तुमच्या स्वतःमध्यें संतुष्ट राहण्यापासून वळाल (पश्चाताप कराल), आणि येशूकडें, देव जे सर्व काहीं आहे त्या सर्वाचा आनंद घेण्याकरिता येशूकडें (विश्वासाने) याल, मग त्या लालसेच्या रिक्ततेची बदल पूर्णतेने होईल- यालाच येशू "सार्वकालिक जीवनासाठीं उपळत्या पाण्याचा झरा” असे संबोधतो.   ( योहान 4:14).

    4 min