
Sign up to save your podcasts
Or


“इस्राएलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्यानें ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांची ‘खंडणी भरून सुटका’ केली आहे; आणि आपल्यासाठीं त्यानें आपला दास ‘दावीद’ ह्याच्या घराण्यात ‘बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे; हे त्यानें युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते;’ म्हणजें आपल्या ‘शत्रूंच्या’ व आपला ‘द्वेष करणार्या’ सर्वांच्या ‘हातून’ सुटका करावी.” (लूक 1:68-71)
लूक 1 मधील अलीशिबेचा पति, जखऱ्या याच्या शब्दांतून निघालेल्या दोन अद्भुत गोष्टींकडें लक्ष द्या.
पहिली, नऊ महिन्यांपूर्वी, जखऱ्याला विश्वास नव्हतां कीं त्याच्या पत्नीला मूल होईल. परंतु आता, पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन, त्याला येणाऱ्या मशीहात देवाच्या मुक्तीच्या कार्याविषयी एवढा विश्वास आहे कीं तो ते भूतकाळात मांडतो: “त्यानें ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांची ‘खंडणी भरून सुटका’ केली आहे.” विश्वास ठेवणाऱ्या मनासाठीं, देवाचे अभिवचनदत्त कार्य जणू ते पूर्ण झाल्याइतकेच उत्तम आहे. जखऱ्या हा देवाच्या शब्दावर विश्वास करावयास शिकला आणि म्हणून त्याला ही अद्भुत खात्री पटलीं : देवानें “भेट घेऊन...सुटका केली आहें!” (लूक 1:68).
दुसरी, येशू ख्रिस्ताचे येणें हे देवानें जगाची घेतलेली भेट आहे : इस्राएलाच्या देवानें भेट घेऊन सुटका केली. अनेक शतके, यहूदी लोक या विश्वासाखाली खितपत पडले होते कीं देव हा पाठमोरा झाला होता : संदेशाचा आत्मा थांबला होता; इस्राएल रोमी लोकांच्या हातात दास्यांत पडले होते. आणि इस्राएलातील सर्व भक्तिमान लोक देवाच्या भेटीची प्रतीक्षा करीत होते. लूक आम्हांला सांगतो कीं आणखी एक वृद्ध पुरुष, भक्तिमान शिमोन, होता जो “इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता” (लूक 2:25). त्याचप्रमाणें, प्रार्थनाशील हन्ना ही देखील “यरूशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत” होती (लूक 2:38).
हे मोठ्या आशेनें भरलेलें दिवस होते. जिची ते दीर्घकाळ प्रतीक्षा करित आलें होते ती देवाची भेट आता घडून येणार होती – कोणीही अपेक्षा केली नव्हती अशाप्रकारे तो खरोखर येण्याच्या मार्गावर होता.
“माझा जीव प्रभूला’ थोर मानतो, आणि ‘देव जो माझा तारणारा’ त्याच्यामुळें माझा आत्मा ‘उल्लासला आहे.’ कारण ‘त्यानें’ आपल्या ‘दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केलें आहे.’ पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील! कारण जो समर्थ आहे, त्यानें माझ्याकरता महत्कृत्ये केली आहेत; आणि ‘त्याचे नाव पवित्र आहे.’ आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’ त्यानें आपल्या ‘बाहूने’ पराक्रम केला आहे; जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने ‘गर्विष्ठ आहेत त्यांची त्यानें दाणादाण केली आहे.’ ‘त्यानें अधिपतींना’ राजासनांवरून ‘ओढून काढले आहे’ व ‘दीनांस उंच केलें आहे.’ ‘त्यानें भुकेलेंल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केलें आहे,’ व ‘धनवानांस रिकामे लावून दिलें आहे.’ ‘आपल्या पूर्वजांस’ त्यानें सांगितले ‘त्याप्रमाणें अब्राहाम’ व त्याचे ‘संतान ह्यांच्यावरील दया’ सर्वकाळ स्मरून त्यानें आपला सेवक इस्राएल ह्याला साहाय्य केलें आहे.” (लूक 1:46-55)
मरीया देवाविषयी स्पष्टपणें एक अतिशय उल्लेखनीय गोष्ट पाहते: तो संपूर्ण मानव इतिहासाचा क्रम बदलणार आहे; इतिहासातील अत्यंत महत्वाची तीन दशके सुरू होणार आहेत.
आणि देव कोठे आहे? तो आपलें सर्व लक्ष अप्रसिद्ध व दीन अशा दोन स्त्रियांवर केंद्रित करतो - एक म्हातारी आणि वांझ (अलीशिबा), एक तरुण आणि कुमारीका (मरीया). आणि मरीया देवाच्या या दृष्टांताने, जो दीनांवर प्रीति करणारा आहे, इतकीं भारावून जाते कीं तिच्या अंतःकरणातून गीत उचंबळून येते - असे गीत ज्यास “मरीयेचे स्तोत्र” म्हटलें जाते.
मरीया आणि अलीशिबा लूकाच्या वृत्तांतातील दोन महान नायिका आहेत. त्याला या दोन स्त्रियांचा विश्वास आवडतो. असें दिसून येतें कीं त्यां दोघींच्या बाबतीत ज्यां गोष्टीचा त्याच्यावर जास्त प्रभाव पडला, आणि जी गोष्ट तो त्याच्या शुभवर्तमानाचा कुलीन वाचक थियोफिलस याच्या मनावर ठसवू इच्छितो ती गोष्ट आहे अलीशिबा आणि मरीया ज्या त्यांच्या प्रतापी देवाला समर्पित होतात त्याबाबतीत त्यांचा दीनपणा आणि हर्षयुक्त नम्रपणा.
अलीशिबानें म्हटलें, (लूक 1:43) माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडें यावे हा मान मला कोठून? आणि मरीयेनें म्हटलें (लूक 1:48) “त्यानें’ आपल्या ‘दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केलें आहे”
ज्यांचा जीव खरोखर प्रभूला थोर मानतो असें एकमेव लोक अलीशिबा आणि मरीयेसारखे लोक आहेत - जे लोक त्यांची दीन दशा कबूल करतात आणि प्रतापी देवाच्या नम्रतेने भारावून जातात.
“तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना त्यांचा देव प्रभू ह्याच्याकडें वळवील. बापाची अंतःकरणें मुलांकडें’, व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडें वळवून प्रभूसाठीं सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल.” (लूक 1:16-17)
बापतिस्मा करणाऱ्या योहानाने इस्राएलसाठीं जे केलें ते नाताळाचा आगमनोत्सव आमच्यासाठीं करू शकते. तुम्हीं नाताळासाठीं तयार नाहीं असे दिसता कामा नये. माझ्या म्हणण्याचा अर्थ आध्यात्मिक तयारी न केलेंलें. जर तुम्हीं तयार राहता तर नाताळाचा आनंद आणि परिणाम कितीतरी मोठा असेल!
यासाठीं कीं तुम्हीं तयार असावें...
पहिले, तुम्हांला तारणाऱ्याची गरज आहे या सत्यावर विचार करा. नाताळ हा आनंदाचा विषय होण्यापूर्वी तो एक लेखी आरोपपत्र आहे, म्हणजें, “तुमच्यासाठीं आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे” (लूक 2:11). जर तुम्हांला तारणाऱ्याची गरज नसेल, तर तुम्हांला नाताळाचीहि गरज नाहीं. जोवर तुम्हांला तारणाऱ्याची नितांत गरज भासत नाहीं तोवर नाताळाचा मूळ उद्देश सार्थक होणार नाहीं. नाताळाच्या आगमनोत्सवासमयीची ही जी कांही संक्षिप्त चिंतने आहेंत ती तुमच्यात तारणाऱ्याच्या गरजेचा कडू-गोड अनुभव जागे करण्यासाठीं आहेत.
दुसरे, गांभीर्याने आपलें आत्म-परीक्षण करा. ख्रिस्ताचे प्रथम आगमन नाताळसाठीं अगदी तसेच आहे जसा चाळीस दिवसाचा उपवासाचा काळ ईस्टरसाठीं असतो. “हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायीं दुष्टपणाकडें काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालव” (स्तोत्र 139:23-24). प्रत्येक अंतःकरण त्याच्यासाठीं जागा तयार करो... घर स्वच्छ करण्याद्वारे.
तिसरे, तुमच्या घरात देव-केंद्रित अपेक्षा आणि उत्कंठा आणि उत्तेजन यांनी युक्त वातावरण तयार करा - विशेषतः लहान लेकरांसाठीं. जर तुम्हीं ख्रिस्ताविषयी उत्साहित असाल, तर ते सुद्धा असतील. जर तुम्हीं नाताळाचा उत्सव केवळ भौतिक गोष्टींनी उत्साहपूर्ण बनवित असाल, तर लेकरांच्या मनात देवासाठीं तहान कशी निर्माण होईल? तुमच्या कल्पना घेऊन लेकरांसाठीं राजाच्या आगमनाच्या चमत्काराचे प्रात्यक्षिक तयार करा.
चौथे, पवित्र शास्त्र-मननांत अधिक वेळ घालवा, आणि मोठमोठे शास्त्र-पाठ मुखपाठ करा! “परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडें-तुकडें करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय?” (यिर्मया 23:29)! या ख्रिस्तागमनाच्या हंगामांत अग्नीभोवती एकत्र व्हा. हा अग्नी उबदार आहे. तो कृपेच्या रंगानी चकाकत आहे. तो हजार दुखापतींसाठीं आरोग्य आहे. तो अंधाऱ्या रात्रींसाठीं प्रकाश आहे.
आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेंलें रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करायचे नव्हते; तसे असते तर जगाच्या स्थापनेंपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागलें असते; पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहींशी करण्यासाठीं प्रकट झाला आहे. (इब्री 9:25-26)
आपण हे गृहीत धरता कामा नये कीं स्वर्गात पापी लोकांचा मोठ्या स्वगोस्तवाने प्रवेश होत असावा.
देव पवित्र आणि शुद्ध आणि पूर्णपणें न्यायप्रिय आणि नीतिमान असा आहे. तरीही संपूर्ण बायबलची गोष्ट अशी आहे कीं असा पवित्र आणि थोर परमेश्वर तुमच्यां आणि माझ्यासारख्या घाणेंरड्या आणि अमंगळ लोकांचे त्याच्या कृपेत कसे स्वागत करू शकतो. हे कसे शक्य आहे?
इब्री 9:25 म्हणते कीं पापासाठीं ख्रिस्ताचा आत्मयज्ञ यहूदी महायाजकांच्या बलिदानांसारखा नव्हता. ते दरवर्षी लोकांच्या पापांसाठीं प्रायश्चित करण्याकरिता पशूंचे अर्पण घेऊन पवित्र स्थानी जात असत. पण ही वचनें म्हणतात कीं ख्रिस्तानें “वारंवार दुःख सोसण्यासाठीं” स्वर्गात प्रवेश केला नाहीं... “तसे असते तर जगाच्या स्थापनेंपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागलें असते” (इब्री 9:26).
जर ख्रिस्तानें याजकांच्या नमून्याचे अनुसरण केलें असते, तर त्याला दरवर्षी मरावे लागलें असते. आणि जी पापे झाकावयाची होती त्यात आदाम आणि हव्वेच्या पापांचा समावेश होता, म्हणून त्याला त्याच्या वार्षिक मरणाचा आरंभ जगाच्या उत्पत्तिच्या सुरूवातीलाच करावा लागला असता. परंतु लेखकाच्या दृष्टिने हे अशक्य आहे.
हे अशक्य का आहे? कारण त्यामुळें परमेश्वराच्या पुत्राचे मरण दुर्बळ आणि निष्प्रभ दिसलें असते. जर अनेंक शतके वर्षानुवर्षे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करावे लागले असते, तर विजय कोठे असता? आपण परमेश्वराच्या पुत्राच्या आत्मयज्ञाचे अमर्याद मूल्य कोठे पाहिलें असते? ते वार्षिक क्लेशात आणि मृत्यूच्या लज्जेत अदृश्य झालें असते.
वधस्तंभाठायीं लज्जा होती, पण ती विजयी लज्जा होती. “(येशूनें) लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” (इब्री 12:2)
ही ख्रिस्त, जो देवाचे प्रतिरूप आहे, त्याच्या गौरवाची सुवार्ता आहे (2 करिंथ 4:4). माझी प्रार्थना आहे कीं तुम्हीं पापानें कितीही घाणेंरडे किंवा अपवित्र का असेनात, त्यां तुम्हांला या गौरवाचा प्रकाश पाहता यावा आणि तुम्हीं ख्रिस्तावर विश्वास ठेवावा.
तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्यानें निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केलें, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठीं निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील? (इब्री 9:14)
आपण आधुनिक युगात आहों - इंटरनेंटचे, स्मार्ट फोन्सचे, अंतराळयात्रेचे आणि हृदय प्रत्यारोपणाचे युग - आणि आमची अग्रगण्य अडचण आजही नेंहमीसारखीच आहे : आमची सदसदविवेकबुद्धी आम्हास दोष लावते आणि आम्हीं परमेश्वरासाठीं धिक्कारलेले आहों याची सतत जाणीव करून देते. आम्हीं परमेश्वरापासून परके असें आहों. आणि आमची सदसदविवेकबुद्धी तशी साक्षहि देते.
आम्हीं स्वतःस जख्मी करू शकतो अथवा आपल्या मुलांना पवित्र नदीत फेकू शकतो, अथवा लक्षावधी रूपये दान म्हणून देऊ शकतो, किंवा एखाद्या लंगरला जाऊन तिथें लोकांसाठीं ताटे वाढू शकतो, अथवा शेकडो प्रकारचे पत करू शकतो, पण परिणाम आहे तोच असेल. आमचे डाग जसेच्या तसे राहतांत आणि मृत्यू घाबरवून सोडतो.
आम्हीं जाणतो कीं आमची विवेकबुद्धी भ्रष्ट झाली आहे – प्रेत-स्पर्श, घाणेंरडे डायपर किंवा डुकराचे मांस यासारख्या बाह्य गोष्टींनी नव्हे. येशूनें म्हटलें कीं माणसातून जे बाहेर येते तेच त्याला अशुद्ध करते, जे आत जाते ते नाहीं (मार्क 7:15-23). आम्हीं गर्व, बिचारेपणा, कटुत्व, वासना, हेवा, मत्सर, लोभ, उदासीनता आणि भीती यासारख्या प्रवृत्तींनी अशुद्ध झालो आहों.
प्रत्येक युगाप्रमाणेंच आजच्या युगातही एकमेव उत्तर आहे, ख्रिस्ताचे रक्त. जेव्हा तुमची सदसदविवेकबुद्धी उठून तुम्हांला दोष लावते, तेव्हां तुम्हीं कोठे वळाल? इब्री 9:14 आम्हांला उत्तर देतो: “तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्यानें निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केलें, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठीं निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील?”
उत्तर आहे: ख्रिस्ताच्या रक्ताकडे वळा. विश्वातील एकमेव शुद्धीकरण करणाऱ्या मध्यस्थाकडे वळा जो तुम्हांला जीवनात विसावा, आणि मरणात शांती देऊ शकतो.
देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाहीं किंवा त्याचे आभार मानलें नाहींत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झालें आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकारानें भरून गेलें. (रोम 1:21)
जेव्हा मनुष्याच्या अंतःकरणात परमेश्वरासाठीं कृतज्ञता उसळून येते, तेव्हा आमच्या आशीर्वादाचा समृद्ध स्रोत म्हणून त्याचे गौरव होते. त्याला दाता आणि परोपकारी, आणि त्यामुळें तो किती गौरवी आहे असा त्याचा अंगीकार केला जातो.
पण जेव्हा आम्हांसाठीं परमेश्वराच्या थोर चांगुलपणाविषयी आमच्या अंतःकरणात कृतज्ञता उसळून येत नाहीं, तेव्हा त्याचा शक्यतः असा अर्थ असतो कीं आम्हीं त्याची वाखाणणी करू इच्छित नाहीं; आम्हीं आमचा परोपकारकर्ता म्हणून त्याचा गौरव करूं इच्छित नाहीं.
आणि मनुष्य प्राणी हा स्वभावतः त्यांचा उपकारकर्ता म्हणून उपकारस्तवनाद्वारे परमेश्वराचे आभार मानूं इच्छित नाहीं किंवा त्याचा गौरव करूं इच्छित नाहीं. त्याचे कारण हे कीं आपण जर त्याचा गौरव केला तर मग आमचा स्वतःचा गौरव होत नाहीं, आणि सर्व लोकांस स्वभावतःच परमेश्वराच्या गौरवापेक्षा स्वतःचे गौरव करणें आवडते.
या सर्व कृतघ्नतेचे मुळ म्हणजें स्वतःच्या मोठेपणावर प्रीति करण्यांस प्राधान्य दिलें जाते. कारण खरी कृतज्ञता कबूल करते कीं आम्हास असा वारसा प्राप्त झाला आहे जो आम्हीं स्वतः कमाविलेला नाहीं. आम्हीं असें लंगडे लोक आहोत जें येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या आकाराच्या कुबडीच्या आधारे चालतांत. आपण असें पक्षाघाती लोक आहोत जे परमेश्वराच्या कृपेच्या लोखंडी फुप्फुसात क्षणोक्षणी जगत आहोत. आम्हीं स्वर्गाच्या बाबागाडीमध्यें झोपी गेलेलीं बालकें आहोत.
तारणाऱ्या कृपेवाचून, स्वाभाविक वृत्तीच्या मनुष्याला आपण अशा रूपांचे आहों असा स्वतःविषयी विचार करणें आवडत नाहीं : म्हणजें अयोग्य लाभार्थी, लंगडा, पक्षाघाती, एक असहाय बालक. उलट देवच असा आहे असें म्हणत ते त्याच्या गौरवावर दरोडा टाकतांत.
म्हणून, जोपर्यंत मनुष्याला स्वतःचे गौरव करणें आवडते, आणि ‘माझा मी समर्थ आहे’ असें समजतो, आणि आपण पापाच्या असाध्य रोगाने ग्रस्त आहों हे ओळखत नाहीं आणि आपणांस असहाय्य समजण्याचा तिटकारा करतो, तोपर्यंत तो खऱ्या परमेश्वरासाठीं कधीही खरी कृतज्ञता अनुभवू शकणार नाहीं आणि परमेश्वराचे जसे गौरव केलें पाहिजे तसे तो कधीही करणार नाहीं, तर केवळ स्वतःचे गौरव करील.
येशूनें म्हटलें, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते; मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना पश्घ्चात्तापासाठीं बोलावण्यास आलो आहे” (मार्क 2:17)
येशू अशा लोकांची सेवा करावयास आला नाहीं जे हा आग्रह करतात कीं ते निरोगी आहेत. तो कांहींतरी मोठा कबुलीजबाब मागतो : म्हणजें असें कीं आम्हीं आमचे समर्थ नाहीं हे आम्हीं कबूल करावें. ही गर्विष्ठांसाठीं कुवार्ता आहे, पण ज्यांनी आत्मसंतुष्टतेचे ढोंग त्यागलें आहे आणि परमेश्वराचा शोध करीत आहेत त्यांच्यासाठीं ती मधासारखी गोड वचनें आहेत.
गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन. त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन. (स्तोत्र 69:30)
दोन प्रकारचे भिंग आहेत: सूक्ष्मदर्शक भिंग आणि दुर्बिणीचे भिंग. सूक्ष्मदर्शक भिंगामुळें लहान वस्तू तिच्या आकारापेक्षा मोठी दिसते. दुर्बिणीच्या भिंगामुळें मोठी वस्तू तितकींच मोठी दिसते जितकीं मोठी ती प्रत्यक्षात आहे.
जेव्हा दावीद म्हणतो, “त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन,” तेव्हा त्याचा अर्थ असा नाहीं कीं, “मी लहान परमेश्वरास तो जसा आहे त्यापेक्षा मोठा करीन.” याचा अर्थ, “मी मोठ्या परमेश्वराचे गौरव त्यामानाने वर्णीन जितकी मोठी त्याची महती प्रत्यक्षात आहे.”
आम्हास सूक्ष्मदर्शक होण्यासाठीं पाचारण करण्यात आलेंलें नाहीं. आम्हास दुर्बिण होण्यासाठीं पाचारण करण्यांत आलें आहे. ख्रिस्ती लोकांस ठग होण्यासाठीं बोलावण्यात आलेंलें नाहीं ज्यांना हे माहीत असतांनाहीं कीं त्यांच्या प्रतिस्पर्धीची वस्तू अतिशय उत्तम प्रतीची आहे, ते त्यांची वस्तू तिच्या वास्तविकतेपेक्षा सर्व प्रमाणांनी वाढवितात. परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ कांहींही नाहीं आणि कोणीही नाहीं. आणि म्हणून परमेश्वरावर प्रीति करणाऱ्यांचे पाचारण आहे त्याची महानता इतकीं मोठी दाखविणें जितकीं ती खरोखर आहे.
म्हणूनच आम्हीं अस्तित्वात आहोत, आमचे तारण यासाठींच झालें होते, जसे पेत्र 1 पेत्र 2:9 मध्ये म्हणतो, “पण तुम्हीं तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असें आहात; ह्यासाठीं कीं, ज्यानें तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केलें ‘त्याचे गुण तुम्हीं प्रसिद्ध करावेत.’”
ख्रिस्ती व्यक्तीचे संपूर्ण कर्तव्य यां शब्दांत सारगर्भित केलें जाऊ शकते : ओळखा, चिंतन करा, आणि तसेच आपलें आचरण ठेवा ज्यामुळें परमेश्वर खरोखर जितका थोर आहे तितके थोर त्याला दाखविता यावें. जगासाठीं परमेश्वराच्या गौरवाच्या अमर्याद तारांकित संपत्तीची दुर्बिण बना.
ख्रिस्ती व्यक्तीसाठीं परमेश्वराचे गौरव करण्याचा हाच अर्थ आहे. पण तुम्हीं जे पाहिलें नाहीं अथवा जे तुम्हीं लगेच विसरून जाता त्याची तुम्हीं वाखाणणी करू शकत नाहीं.
यास्तव, आमचे पहिलें काम परमेश्वराची महानता आणि त्याचे चांगुलपण पाहणें आणि ते आठवणीत ठेवणें हे आहे. म्हणून आम्हीं परमेश्वराजवळ प्रार्थना करतो, “माझे अंतश्चक्षू प्रकाशित कर!” (इफिस 1:18), आणि आम्हीं आपल्या जीवास उपदेश देतो, “हे माझ्या जिवा, त्याचे सर्व उपकार विसरू नको” (स्तोत्र 103:2).
ह्यामुळें ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणें तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठीं मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. (इब्री 7:25)
हा शास्त्रलेख म्हणतो कीं ख्रिस्त पूर्णपणें तारण्यास समर्थ आहे - सर्वदा - कारण तो आमच्यासाठीं मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. दुसऱ्या शब्दांत, जर तो आमच्यासाठीं सर्वदा मध्यस्थी करित नाहीं, तर तो आम्हास सर्वदा तारावयास समर्थहि असणार नाहीं.
याचा अर्थ असा कीं आमचे तारण तितकेच सुरक्षित आहे जितके ख्रिस्ताचे याजकपण अविनाशी आहे. म्हणूनच आम्हास कोणत्याही मानवी याजकापेक्षा अति श्रेष्ठ अशा याजकाची गरज होती. ख्रिस्ताचे ईश्वरत्व आणि मेलेल्यांतून त्याचे झालेलें पुनरूत्थान आमच्यासाठीं त्याचे अविनाशी याजकपद सुरक्षित करते.
याचा अर्थ हा कीं आपण आपल्या तारणाविषयी निष्क्रिय शब्दांत बोलता कामा नये जसे आम्हीं बरेचदा बोलतो - जणू कांहीं मी माझा एकदाचा निर्णय घेऊन माझे कर्तव्य केलें, आणि ख्रिस्तानें मरण सोसून व परत जिवंत होऊन त्यानें एकदाचे त्याचे काम संपविलें, बस इतकेच काय ते. परंतु ते इतकेच नाहीं.
स्वर्गात येशूच्या सार्वकालिक मध्यस्थीद्वारे मी आजहि तारला जात आहे. येशू आमच्यासाठीं प्रार्थना करीत आहे आणि हे आमच्या तारणासाठीं आवश्यक आहे.
आम्हीं आमचा महायाजक म्हणून स्वर्गातील येशूच्या सर्वदा सक्रिय असलेल्यां प्रार्थनांद्वारे (रोम 8:34) आणि मध्यस्थीद्वारे (1 योहान 2:1) सार्वकालिकरित्या तारण पावतो. तो आमच्यासाठीं प्रार्थना करतो आणि त्याच्या प्रार्थनांची उत्तरे मिळतात कारण तो त्याच्या सिद्ध बलिदानाच्या आधारे सिद्धपणें प्रार्थना करतो.
हे सर्व तुम्हांसाठीं आहे, जितके अधिक लोक त्याच्या कृपेने त्याच्याजवळ येतील, तितके त्याच्या अपार दयेबद्दल त्याचे आभार मानतील आणि परमेश्वराचे अधिक गौरव होईल. (2 करिंथ 4:15)
देवाचे कृतज्ञ असणें ही एक आनंदी भावना आहे. त्याच्या कृपेसाठीं आम्हांमध्ये आनंदाने भरलेली उपकार-स्तुतीची जाणीव आहे. म्हणून एका अर्थानें जर पाहिलें तर आभारप्रदर्शनाच्या भावनेंतच, आम्हीं आजही लाभार्थी आहोत. पण आभारप्रदर्शनाचा गुणच असा आहे कीं त्यामुळें कृपा करणाऱ्याचे गौरव होते. आम्हीं आभारप्रदर्शन करतो तेव्हा आम्हीं आमची गरज आणि परमेश्वराचा दानशील गुण, परमेश्वराची पूर्णता, व त्याच्या गौरवाच्या संपत्तीची कबूली देतो.
ज्याप्रकारे मी रेस्टॉरेंटमध्ये अन्न वाढणाऱ्यास, “धन्यवाद” म्हणतो, तेव्हा मी स्वतःस नम्र करतो आणि त्याची वाखाणणी करतो, त्याचप्रमाणें जेव्हा मी परमेश्वरासाठीं आभारप्रदर्शनाची जाणीव बाळगतो तेव्हा मी स्वतःस नम्र करतो आणि त्यास गौरव देतो. अर्थात फरक हा आहे कीं देवानें मजवर जी कृपा केलीं त्याबद्दल मी त्याचा अतिशय ऋणी आहे, आणि जे कांहीं तो माझ्यासाठीं करतो ते सर्व तो विनामूल्य करतो ज्यांस मी पात्र नाहीं.
मुद्दा हा आहे कीं आभारप्रदर्शन देणाऱ्याचे गौरव करते. त्यामुळें परमेश्वराचे गौरव होते. पौलाच्या सर्व परिश्रमात त्याचे हेच अंतिम ध्येय होते. होय, त्याचे परिश्रम मंडळीसाठीं होते - मंडळीच्या उन्नतीसाठीं. पण मंडळी सर्वोच्च ध्येय नाहीं. पुन्हा ऐका: “हे सर्व तुम्हांसाठीं आहे, जितके अधिक लोक त्याच्या कृपेने त्याच्याजवळ येतील, तितके त्याच्या अपार दयेबद्दल त्याचे आभार मानतील आणि परमेश्वराचे अधिक गौरव होईल.” सर्व तुम्हांसाठीं - परमेश्वराच्या गौरवासाठीं!
सुवार्तेविषयी अद्भुत गोष्ट ही आहे कीं परमेश्वराच्या गौरवासाठीं आमच्याकडून तिला जो प्रतिसाद हवा आहे तो असा प्रतिसाद देखील आहे जो अतिशय स्वाभाविक आणि आनंदाने भरलेला असतो; अर्थात, कृपेसाठीं उपकारबुद्धी किंवा आभार. कृपा करण्यांत परमेश्वराचे सर्व-संपन्न गौरव आणि प्राप्त करण्यात आमचा विनम्र आनंद यांत तोड नाहीं. आनंदानें आभार मानण्याद्वारे परमेश्वराचे गौरव होते.
त्याच्या कृपेसाठीं परमेश्वरास गौरव देणारे जीवन आणि अतिशय आनंदाचे जीवन हे एकच जीवन आहे. आणि यांस जे एकत्र करते ते म्हणजें आभारप्रदर्शन अथवा कृतज्ञता.
म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेषत्वानें दाखवावी ह्या इच्छेनें देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला, ह्यासाठीं कीं, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेंली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणांला ज्याविषयी खोटे बोलणें देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारे चांगलें उत्तेजन मिळावे. (इब्री 6:17-18)
आपण आपली आशा हस्तगत करून ती आम्हीं दृढ धरून राहावी असें उत्तेजन इब्रीलोकांस पत्राचा लेखक आम्हांला का देतो? जर आमच्या आशेचा अंतिम आनंद आपण येशूच्या रक्ताद्वारे प्राप्त केला आणि मिळवला, तर परमेश्वर आम्हास दृढ धरून राहण्यास का सांगतो?
उत्तर येणेंप्रमाणें आहे :
तो यासाठीं मेला कीं तुम्हीं अगदी तेच करावे जे पौल फिलिप्पै 3:12 मध्ये म्हणतो, “ज्यासाठीं ख्रिस्त येशूनें मला आपल्या कह्यात घेतलें ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागतो आहे.” हा मूर्खपणा नाहीं, ही सुवार्ता आहे, पापी व्यक्तीस ते करावयास सांगणें जे करण्याचे सामर्थ्य केवळ ख्रिस्त त्याला देऊ शकतो; म्हणजें परमेश्वराठायीं आशा.
म्हणून, मी तुम्हांला संपूर्ण अंतःकरणानें असें उत्तेजन देतो : पुढे जा आणि ज्यासाठीं ख्रिस्तानें तुम्हांला आपल्या कह्यात घेतलें आहे ती गोष्ट आपल्या कह्यात घेण्यासाठीं तिच्या मागे लागा. आपल्या संपूर्ण शक्तीनें ती दृढ धरून राहा - जे त्याचे सामर्थ्य आहे, म्हणजें त्यानें आपल्या रक्तानें विकत घेतलेंलें तुमच्यां आज्ञापालनाची देणगी.